पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. ( ४३ ) आपल्यास यापेक्षां ती कोणत्या अनर्थपाताच्या प्रमाणाची गरज राहिली आहे? स. याजीराव महाराज यांस गादीवरून काढून गोविंदराव यास राजपद देण्याची मसल- त झाल्याबद्दल सयाजीराव यांची समजूत चुकीची असेल, पण महाराजांस कैद करून त्यांच्या मुलास गादीवर बसविण्याची मसलत झाली होती, व त्या कुटुंबांत त्यांच्या बा- यकांस देखील अनुकूल करून घेतले होते, यांत तर कांहीं भ्रांती नाहींना ? नियमानें नियंत्रित केलेला रेसिडेंट अशा दुष्ट मसलतीत पडतो कसचा, आणि पडण्याची त्याची ताकद काय, पण तो राजास अनुकूल नाहीं एवढ्यावर किती भयंकर परिणामा- वर गोष्ट येते त्याचें उत्तम रीतीने वरील गोष्टीने प्रदर्शन होत आहे. सर जान मालकम यांची कारकीर्द तीन वर्षांत संपली आणि त्यांच्या जागेवर लार्ड क्लैर या नयनिपुण सद्गृहस्थाची नेमणूक झाली. सयाजीराव महाराज यांनी लार्डसाहेब यांस अशी विनंती केली, की आपण मा- इया राजधानीत येऊन माझे काय म्हणणें आहे तें ऐकावें. लार्ड साहेब यांनी बडोद्यास येऊन महाराजांचे बोलणे ऐकिलें आणि अमदाबादेस जाऊन सावकार लोकांस आपले समक्ष आणून त्यांचा पैका गायकवाड यांजपासून एकदम घेण्यास कोणती हरकत आहे तें त्यांस विचारिलें. सावकारांनी कबूल केलें कीं, आह्मी आपला पैसा एकदम घेण्यास फार खुषी आहोत. बडोदें सोडल्यामुळे आझांस पैशासंबंधी मनस्वी नुकसान लागले आहे; यास्तव महाराज आह्मांस वाईट रीतीनें वागविणार नाहींत असा आपण बंदोबस्त कराल तर आझी मोठ्या खुषीनें बडोद्यास जाऊं. लार्ड साहेब यांनीं त्यांस असे सांगितले, की तुमच्या कर्जाची फेड झाल्यावर ज्यांस खाजगत जामिनगिरी इंग्रज सरकारांनी दिली नाहीं त्यांचा कोणताही हक्क आह वर नाही. परंतु महाराजांनीं तुम्हांस चांगल्या रीतीने वागवावे यासाठीं आह्मी आपके वजन खर्च करूं. महाराज नीतिकुशल आणि हुशार राजा आहे, त्यास आपल्या राजधानीतून धनसंपन्न प्रजा जाऊं देण्यांत किती तोटा व त्यांची विद्यमानता किती हितकारक आहे, हे चांगले कळते. सबब ते तुम्हांस गैर रीतीने वागविणार नाहींत. वर जो मजकूर लिहिला आहे तो लार्ड साहेब यांनी तारीख १८ जानेवारी सन १८३२ रोजी एक मिनिट लिहिले त्यांत आहे. सदई मिनिटांतच लॉर्डसाहेब यांनी असें लिहिलें आहे की सावकार लोकांबरोबर केलेल्या मसलतीपासून मला फार स- माधान झालें. माझा असा हेतु नव्हता की त्यांस एकाएकी एखाद्या हुकुमी करारांक गुंतवून द्यावे. त्यांचे मनांत काय आहे हें जाणण्याची माझी इच्छा होती यासाठीं मी त्यांस माझ्या रूबरू आणिलें. मला असें सांगण्यास आनंद वाटतो की त्यांनी आपला पैका एकदम घेण्याचे कबूल केलें इतकेंच नाहीं पण त्यांनी असें सांगितलें कीं नेव्हां समाधानकारक ठराव करण्यांत येईल तेव्हां अमदाबादेस आह्मी हल्लीं ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षां विशेष चांगली स्थिति बडोद्यांत आम्हांस प्राप्त होईल. मला विल्यम्स साहेब यांनी असे कळविलें, की हरिभक्ती यांच्या दुकानाचा मुनीम याने मला असे सांगितलें कीं बडोदें सोडल्यामुळे आमची फार खराबी झाली आहे. आमचे लोकांकडे