पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ( ४० ) स आपल्या मसलतीन घेऊन व त्या मसलतीस रेसिडेंट साहेब यांची संमति मिळ.. वून गोविंदराव गायकवाड यांस गादीवर बसविण्याचे कारस्थान रच होते असे सयाजीराव महाराज यांच्या मनाचा चुकीचा पण बळकट ग्रह झाला होता. आणि गुजराथेंतील आणि कांठेवाडांतील लोकांच्या मनांत देखील ही गोष्ट बळकट भरली होती. * वरील लेखाच्या तात्पर्यावरून आपल्यास असें दिसून येतें कीं, आपल्यास गादी- वरून काढून टाकून गोविंदराव गायकवाड यास राज्यपद द्यावे अशीं विठ्ठलराव देवाजी कारस्थानें करीत होते, व त्यांस रेसिडेंट साहेब अनुकूल झाले होते, असे सयाजीराव यांसच वाटले नव्हते; पण सगळ्या गुजराथेंतील आणि कांठेवाडांतील लोकांस देखील तसें वाटले होते. अशा दुष्ट मसलतींत रेसिडेंट साहेब यांचे अंग होते असे गृहीत करण्यांत सयाजीराव यांची चूक झाली असेल यांत संशय नाहीं; कारण मुंबई सरकारचा रुकार घेतल्यावांचून अशा मसलतींत पडण्याचा रेसिडेंट साहेब यांचा मगदुर नव्हता; परंतु विठ्ठलराव देवाजीच्या संबंधाने देखील सयाजीराव यांची समजूत चुकीची होती असे मानतां येत नाहीं; कारण ज्यापेक्षां गुजराथ आणि कां- ठेवाड या दोन्ही देशांतील सर्व लोकांच्या मनाचा तसा ग्रह झाला होता त्यापेक्षां यास कांहीं प्रचळ कारण असलेच पाहिजे. गोविंदराव गायकवाड हे फार गैरचालीचे होते. त्यांच्या संबंधाने सयाजीराव यांज- बरोबर आपले काय भाषण झालें तें कर्नल क्लैर यांनी आपल्या मिनिटांत लिहिले आहे. त्यांतील तात्पर्य असें आहे कीं ब्रिटिश रेसिडेंटच्या बंगल्याजवळ राहून गोविंदराव यां- नी शिपाई लोकांच्या टोळ्या चाकरीस ठेविल्या होत्या आणि आपल्या राजधानीत त्याने आपला अधिकार तुच्छ मानिला होता याबद्दल जसे आपल्यास वाईट वाटते तसे मलाही वाटतें असें मीं सयाजीराव यांस सांगितले आहे. गोविंदराव यांची वर्तणुक फार गैरशिस्त होती. सबब सर जान मालकम यांनी त्यांस लागलीच बडोद्याच्या बाहेर काढून देऊन राजधानींत स्वस्थता केली. या वरील लेख|वरून देखील गोविंदराव यांचा दोष दिसून येतो.. याप्रमाणे सयाजीराव यांजवर अनेक संकटे आली होतीं आणि कर्जाचे फेडीस इंग्रज सरकारची जामिनगिरी असल्यानें त्यांस पराकाष्ठेचा वास सोसावा लागत अ- से. त्यांचे परगणे सात वर्षांच्या कराराने इस्ताव्याने दिले होते. व तो ठराव फिरवू नये अता रोसिडेंट साहेब यांचा आग्रह पडल्यामुळे मुंबई सरकारांनी सयाजीराव यांचे ह्मणणें ऐकिलें नव्हतें. “ The Government was aware that a very powerful, though erroneous, motive of action with Sayaji had been that Vittalrao Devaji, with the principal holders of the British guarantee, and Sarabhai, the native agent, had formed a conspiracy against him, that they proposed to elevate Govindrao and that their plans were ap- proved of by the Residency. This impression, it was certain, was very prevalent through- out Guzerat and Kathiawar." (The Gaekwar and his relations with the British Go- vernment, by Colonel Wallace. Page 897.)