पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. ( ३९ ) दुसऱ्या दोन गाहाण्यांबद्दलही मुंबई सरकारांनी रोसडेंटाची सामोपचाराने अशी- च कानउघाडणी केली होती. आपणास दिवाणाचा अधिकार अगदी स्वतंत्र के- ल्याने काय परिणाम होतात ते पुढें दाखवावयाचे आहेत; सबब त्या दोन गान्हाण्यांबद्दल मुंबई सरकारांनी रेसिडेंट यांस काय लिहिले ते येथे सांगितले नाहीं. सयाजीराव महाराज यांस मुंबई सरकारांनी जरी योग्य आश्रय दिला होता तरी रेसिडेंट साहेब याजपासून त्यांस जास्त उपद्रव होऊं लागला. रोसिडेंट साहेब यांची राजावर मर्जी अप्रसन्न झाली ह्मणजे राजाच्या प्रतिप- क्षांस आश्रय देऊन त्यांजकडून त्यांचा उपमर्द करवावयाचा आणि त्याबद्दल राजानें कां- ही गाहाणे सांगितले ह्मणजे त्या प्रतिपक्षकाराच्या दोषाचें गोपन करून उलटें 'जाचेच दोष काढावयाचे हें अप्रबुद्ध र सेडेंटाचे एक ठरीव कारस्थानच बनून राहिलें आहे. त्याप्रमाणे सयाजीराव महाराज यांचे प्रतिपक्षी फत्तासंगराव गायकवाड यांचे दत्तपुत्र गोविंदराव गायकवाड यांचा रोसडेंट साहेब यांनी पक्ष उचलला. त्यांत सया जीराव महाराज बरोबर नेमणुक देत नाहींत, व शिंदे सरकाराच्या घराण्यांतील एका मुलीबरोबर लग्न करण्याची मागणी घातली असतां त्यांचे लग्न करीत नसल्यामुळे हा राजपुत्र आणि ती कन्या अविवाहित राहिली आहेत असे असे अनेक दोष रेसिडेंट यांनी सयाजीराव महाराज यांजवर आणून मुंबई सरकारचे मन विटविण्याचा यत्न केला. गोविंद- राव गायकवाड हेही रेसिडेंटाच्या बळावर सयाजीराव महाराज यांची राजसत्ता तुच्छ मानून त्यांजबरोबर लढाई करण्यास तयार झाले, व त्यांनी आपल्या बंगल्यावर झेडा लावून नवी शिबंदी चाकरीस ठेविली; आणि सयाजीराव महाराज यांच्या चाक- रांस कैद करून शहरांत अगदी धांदल उडवून दिली. सयाजीराव महाराज यांनीं रोसेडेंट साहेब यांस एक लांब यादी लिहिली होती; पण त्यांनी गोविंदराव गायकवाड यांच्या अतिक्रमाचा उद्भव सयाजीराव महाराज यांच्या द्वेषयुक्त आचरणापासून झाला असा त्यांजवरच उलट दोष स्थापन केला होता. याप्र- माणे रोसिडेंट साहेब गोविंदराव यांच्या अपराधाचें गोपन करून सयाजीराव यांजवरच उलटे दोष आणीत होते. सयाजीराव महाराजांनीं गोविंदराव गायकवाड यांस वाईट रीतीने वागविल्यामुळे ते इतके निकरावर आले होते कीं रोसेडेंट साहेब यांचे त्यांस पाठबळ आणि सयाजीराव यांस प्रातिकुल्य असल्यामुळे ते सयाजीराव यांची अमर्यादा करण्यास प्रवृत्त झाले होते, याबद्दल प्रशस्तपणे विचार करून निश्चय करण्याचा या गृहस्थाचा उद्देश नाहीं. रेसिडेंट साहेब यांनी विठ्ठलराव देवाजीचा पक्ष स्वीकारिल्यामुळे विठ्ठलराव देवाजी गोविंदराव गायकवाड यांस अनकूल झाले होते की काय इतकें आपल्यास पाहण्याचे आहे. सर जान मालकम यानी रेसिडेंट साहेब यांस एक पत्र लिहिलें होतें. त्यांत अ- सें लिहिलें होतें कीं, सरकारात माहित झाले आहे की, विठ्ठलराव देवाजी यांनी त्रि- टिश सरकारची ज्या लोकांस जामीनकी आहे, त्यांस व नेटिव एजंट साराभाई यां