पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. हतभाग्य मनुष्याचा घात करावयाचा असला म्हणजे खदानें आपल्यास स्वप्नामध्ये अमुक मनुष्याच्या सदाचरणाविषयों किंवा दुराचरणाविषयों अमुक प्रकार सांगितला असे आम्हास समजले आहे. अशा रीतीनें भाषणाचा ओघ आणून महाराजांचे मनांत त्या मनुष्या- विषयों लोभ किंवा राग आणीत असे म्हणतात की, भाऊ शिंदे याणीं महाराजांचे बिछान्यांत एक मोहोरांनी भरलेली पिशवी ठेविली, आणि खुदाने रात्रीस आपणास एक मोहोरेची पिशवी बक्षीस दिली असे आम्हास स्वप्न पडले, म्हणून महाराजांस सांगून ती पिशवी त्यांच्या बिछान्यांतून काढविली. या युक्तीनें महाराजांच्या मनांत असे ठसविले कीं, त्यांच्या कृपेनें खुदाचा आपणास देखील साक्षात्कार होऊं लागला आहे, व खुदा महाराजांस जे कांहीं सांगतो त्यापैकी थोडेंसें तरी आपणास कळतें. महाराजांच्या ह्या गैर समजुतीविषयों आपण म्हणावे तरी काय हे आपल्यास कांहीं कळतच नाहीं. आपणास खरोखर खुदाचा साक्षात्कार होत आहे असे त्यांस वाटले होते असे म्हणावे तर त्यांच्याच मुखांतून कित्येक वेळां असे उच्चार निघाले होते कीं, तो अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा आम्हासारख्या क्षुद्र प्राण्यास साक्षात्कार देतो म्हणून म्हणणे अगदी खोटें आहे. ज्या फकिरास ते ईश्वराप्रमाणें पूजीत तो फकीर पाठमोरा झाला की, त्याच्या ढोंगाविषयीं ते त्याची निंदा करीत. ते ज्या फकिराच्या नादी लागले होते तो दुराचरणी आहे असे त्यांस वाटले तेव्हां त्यांनी त्यास शहराबाहेर घालवून दिले. ह्या गोष्टी मनांत आणून विचार केला म्हणजे राजे स्वच्छंदानुवर्ती असतात, सबब अशा कृत्यांत त्यांचे गुणदोष काय याचा विचारच करूं नये हेच बरे, अशा परिणामावर गोष्ट येते. खंडेराव महाराज यांचे तीर्थरूप सयाजीराव महाराज हे देखील लाडबा दादांच्या असेच नादी लागले होते. त्यांस देवी भवानी प्रसन्न आहे असे मानीत आणि त्यांस पराकाष्ठेनें भजत व त्यांचें भय बाळगीत. मल्हारराव महाराज पादऱ्यास कैदेत असतां त्यांस भाऊ शिंदे याणी मनस्वी त्रास दिला होता, व एके प्रसंगी महाराजांची प्रत्यक्ष निर्भरछना केली होती असे म्हणतात. ते त्यांचे अपकार विसरून जाऊन महाराज याणी त्यांस दयेनें वागविले असते तर त्यांची या जगांत अलौकिक कीर्ति झाली असती, परंतु त्यांच्या खुनशी स्वभावाला ती गोष्ट शक्य नव्हती. कर्नल बार साहेब यांस भाऊ शिंद्याच्या विटंबनेची खबर लागली तेव्हां ते मल्हारराव महाराज यांजवर अतिशय संतापले. त्याणी एक दोन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा देण्याविषयों रुकार दिला असतां मल्हारराव महाराज याणी त्यांजवर जो जुलूम केला त्याबद्दल महाराजांस त्याणी मोठा टपका दिला, परंतु महाराजानी क्षमा मागितली म्हणजे त्यास त्यांची यामुळे त्यांचा राग आणि लोभ या दोहींमध्ये असे, कांहींच अर्थ नाहीं असें झालें होतें. भाऊ शिंदे याची इतकी विटंबना करूनही मल्हारराव महाराज यांची तृप्ति झाली नाहीं. महाराज यांजला ज्या आरोपावरून पादऱ्यास प्रतिबंधांत ठेविले होते, त्या आरोपांतील विष्णुपंत || नेने, मुकुंदराव मामा, व भगवानदासबोवा यांजकडून भाऊ शिंदे याणी खंडेराव महाराज