पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. ( ३७ ) शक्य नाहीं. यासाठीं राजाबरोबर करार केले आहेत त्याला प्रतिकूल असा को- णताही विचार सरकार एक पळभर देखील कबूल करणार नाहींत. * . आम्हीं मार्गे लिहिले आहे कीं त्या मुत्सद्याने सादर केलेल्या नियमांत “रा- जा” या दोन अक्षरांच्या एका पोकळ शब्दाखेरीज राजाकडेस कांहीं उरू दिले नाही. त्यास सर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब यांच्या वचनांनी पराकाष्ठेची बळकटी आली आहे. सदहूं मसुदा तयार करणाऱ्याने तारतम्य ज्ञान आणि व्यवहा- रिक अनुभव यांस अनुलक्षून ते नियम तयार केले आहेत असें लटले आहे. आणि एलफिन्स्टनसाहेब यांचा अनुभव तर त्याहून अगदी भिन्न आहे. तेव्हां या दोघांत शहाणा कोण व जास्ती अनुभव कोणाचा हें स्पष्ट सांगण्यापेक्षां लोकांच्याच विचा- रावर ही गोष्ट ठेवावी हें बरें वाटतें. मुंबई सरकारांनी रोसडेंट साहेब यांस निक्षून उत्तर दिलें असतांही पुनः पुनः त्यांन तीच तीच कारणें दाखवून मुंबईसरकारचा पिछा घेतला. सयाजीराव महाराज जर दिवाणास दूर करण्याविषयीं आग्रह धरून बसतील आणि कदाचित् दिवाण यास दगाकरून मारविण्यामध्ये आपली गर्भित संमति देतील तर तेणेंकरून ब्रिटिश सरका- रची प्रतिष्ठा कमी होईल; आणि त्यांच्या रोसेडेंटानें आग्रहपूर्वक विनंति केल्यावरून दिवाणानें आपल्या आंगावर जोखमीचें काम घेतले त्याबद्दल त्यास बक्षिस न देतां व्यास कामावरून काढून टाकण्यांत येईल व त्याची अप्रतिष्ठा होईल तर राजाच्या दरबारांतील रेसिडेंटाचें वजन नाहिसें होईल. असें पुनः रेसिडेंटसाहेब यांनी मुंबई सरकारास लिहिलें. वरील लेखावरून त्या दिवाणाने आपल्या धन्यावर ते मारेकऱ्याकडून आपणास मारविण्याचें उत्तेजन देत आहेत असा देखील आरोप आणिला होता. आणि व्याजबद्दल कांहीं प्रमाण नसतां रेसिडेंटांनी त्या दिवाणाच्या ह्मणण्यावर विश्वास ठेवून आपल्या सरकारास त्याप्रमाणे लिहिलें होतें. गवरनर साहेबांनी त्यास आप- ला आश्रय देण्याविषयीं स्पष्ट नाकबूल केले होते; आणि फक्त रेसिडेंटाचा मात्र न्यास आश्रय होता त्याला आपल्या धन्याचा इतका छळ करण्याची शक्ति आ- ली होती. मग ब्रिटिश सरकारांनी कायदेशीर रीतीनें राजाच्या दिवाणास जर आश्रय दिला तर त्यापासून किती वाईट परिणाम होतील याची तर कल्पनाच क रवत नाहीं. मुंबई सरकार यांनी या पत्राचें उत्तर देखील रेसिडेंट यांस थोडक्यामध्ये फार सुं- "All experience has shown the impossibility of supporting a minister in his employment against the will of his master, without so effectually limiting the power of the latter as to leave him mere pageant. * No plan, therefore, which is inconsistent with the letter of these engagements can now be for a moment entertained." (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 849). + विठ्ठलराव देवाजी फार शहाणा होता. त्याने काही वर्षे राजसेवा फार उत्तम रीतीने केली होती; पण राजाच्या मनात त्याजविषयों संशय आल्याबरोबर तो एकनिष्ठ चाकर देखील राजा- चा शत्रु बनून बसला, असा राजसत्तेचा प्रादुर्भाव आहे. ह्मणून ती नकोशी कोणासच वाटत नाहीं.