पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ही गोष्ट बडोद्याचे रेसिडेंट विलियम्स साहेब यांस पसंत पडली नाहीं. त्यांनी विठ्ठलराव देवाजीचा जास्त पक्ष धरिला, आणि सयाजीराव आदिकरून त्यांचे शत्रू यांजपासून त्यांचे प्राणांस इजा होण्याचें भय आहे असे देखील स्पष्टपणें मुंबईसरकारास कळविलें. त्या यथाश्रुतग्राही रेसिडेंटाने विठ्ठलराव देवाजीच्या प्राणांस इजा होण्याचे भय आहे या ह्मणण्यास खरेपणा काय, याचा कांहीं देखील तपास केला नाहीं. * रेसिडेंट साहेब यांनी एका पत्रांत मुंबई सरकारास असें लिहिलें कीं जर विट्ठ- लराव देवाजी यांस दिवाणगिरीवरून महाराजांनी काढून दिले तर तेणेंकरून इंग्रज सरकारच्या अब्रूस आणि कीर्तीस कलंक लागेल; कारण ब्रिटिश रेसिडेंटाचे वि- चार शेवटास नेण्याकरितां दिवाणाने मदत केली त्यामुळे त्याची अप्रतिष्ठा झाली असें लोक मानतील. + रेसिडेंटाचें ह्मणणें त्यांच्या सरकारास मान्य झालें नाहीं किंवा एखाद्या रा- जावर आपल्या सरकाराने जास्त इतराजी करावी असें त्याच्या मनांत आलें झणजे ब्रिटिश सरकारची अब्रू आणि कीर्ति हिला कलंक लागेल, त्यांचे लोकांत वजन कमी पडेल, आणि त्यांच्या रेसिडेंटाचा कोणी मान ठेवणार नाही, अशी कारणें दाखवून आपल्या सरकारास जास्त राग आणण्याचा प्रयत्न करावयाचा; आणि तसे करून ही जर सरकार ऐकेनासे झाले, तर अमूक एक गोष्टीपासून अमूक प्रकार- चा दंगा उत्पन्न होईल आणि तेणेंकरून देशाच्या सुरक्षितपणाला धोका लागेल असें कांहीं मोठें अवडंबर दाखवून व राजाच्या जवळच्या लोकांस बदसलागार ठरवून त्यांस देशोधडी लावण्याचा प्रयत्न करावयाचा अशा प्रकारचें रेसिडेंट याचें एक ठरीव कारस्थानच बनून राहिले आहे. परंतु कर्नल फेरच्या वेळेस मुंबई सरकारची स्थिति होती तशी त्यावेळेत नव्हती. देशी राज्याविषयीं पूर्ण अनुभवी सर माउंट् स्टुअर्ट एलफिन्स्टन् साहेब हे गवरनर होते. त्यांनी रेसिडेंट यांस जे उत्तर दिलें तें खरोखर प्रशंसेस पात्र आहे. नामदार साहेब यांच्या लेखांतील तात्पर्य असें आहे कीं सर्व प्रकारच्या अनुभ- वावरून असें दृष्टोत्पत्तीस आले आहे की दिवाणास त्याच्या धन्याच्या इच्छेवांचून दिवाणगिरीवर कायम ठेवणें झाल्यास राजाची सत्ता इतकी कमी केली पाहिजे कीं त्यास केवळ टिक्याचा धनी मात्र करून ठेविला पाहिजे. त्यावांचून ही गोष्ट "Mr. Willoughby also proceeded to state that he had issued a message from Withalrao Devaji stating his apprehensions of personal danger from his enemies, (Sayajirao included)." (The Gaekwar and his relations with the British Govern- ment, by Colonel Wallace. Page 346 ). "I cannot avoid the remark that, if successful, the effects will be injurious to the character and fame of the British Government, since it will be notorious that his disgrace can only be attributed to his supporting the views of the British representa- tive with the consent of his own Prince." (The Gaekwar and his relations with the British Government, by Colonel Wallace. Page 348.)