पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (३५) आश्रय दिला तर फार वाईट परिणाम होतात. बडोद्याच्या दिवाणानें रेसिडेंटाच्या आश्रयबळावर राजाची पराकाष्ठेची अमर्यादा केली होती, व त्यास गादी- वरून काढून टाकून दुसऱ्यास गादीवर बसविण्याचे देखील कारस्थान केलें होतें. अ- सें पुढील हकीकतीवरून आपणांस कळोन येईल. 'गायकवाडाचा ब्रिटिश सरकाराबरोबरचा संबंध' ह्मणून बडोद्याचे माजी रेसिडेंट कर्नल वालिस साहेब यांनी एक बूक छापिले आहे. त्यामध्ये विठ्ठलराव देवाजीच्या संबंधानें आणि सात वर्षांच्या कराराने गायकवाड सरकारचे परगणे इस्तव्यानें दि- ले होते त्यांबद्दल रेसिडेंट साहेब यांबरोबर गायकवाडांचा वादविवाद ह्मणून एक भाग आहे. त्यांत विठ्ठलराव देवाजी यांचा रेसिडेंट यांनी पक्ष स्वीकारिल्यामुळे बडोद्यांत काय काय कारस्थाने झाली होतीं, व सयाजीराव महाराज यांजवर किती मोठी संकटे गुदरलीं होतीं, त्यांबद्दल उत्तम रीतीनें स्पष्टीकरण केले आहे. हा ग्रंथ मराठी भाषेत नाहीं, सबब जरूरीपुरता विषय घेतल्यावांचून ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंट ने राजाच्या दिवाणास वाजवीपेक्षां ज्यास्त आश्रय दिला तर व्यापासून किती वाईट परिणाम होतात याबद्दल मराठी वाचणारांची चांगली समजूत होणार नाहीं. सयाजीराव महाराज यांच्या पूर्वजांनी सावकार लोकांपासून कर्ज घेतले होतें, व त्याच्या फेडीस इंग्रजसरकाराकडून जामिनी करविली होती. या कर्जाचा सात वर्षांत निकाल व्हावा ह्मणून गायकवाड सरकारचे परगणे सात वर्षांच्या कराराने सावकार लोकांस इस्ताव्याने दिले होते. हा सर्व व्यवहार गायकवाड सरकारचे दिवाण विठ्ठलराव देवाजी यांच्या द्वारे रेसि- डेन्सीमध्ये झाला होता. सयाजीराव महाराज यांचें ह्मणणें असें होतें की रेसिडेंट साहेब, माझा दिवाण आणि नेटिव एजंट साराभाई यांनी मजवर दात्र घालून मजकडून तो ठराव कबूल करून घेतला आणि त्या त्रिकुटाच्या वजनापुढे माझे कांहीं चाललें नाहीं. परंतु त्यांत माझे फार नुकसान झाले आहे. यासाठी तो करार मला मान्य नाहीं. व विठ्ठलराव देवाजी यांनीं विश्वासघात केला यासाठीं तो दिवाण मला नको. रेसिडेंट यांनी असा आग्रह धरिला कीं, तो ठराव सयाजीराव यांचे संमतीनें झाला आहे, सबब फिरणार नाहीं. आणि विठ्ठलराव देवाजी यांनी या कामांत म ला मन:पूर्वक साहाय्य केलें. सबब त्यास महाराजांच्याने दिवाणगिरीवरून काढ- वणार नाहीं. सात वर्षांच्या कराराने परगणे इस्ताव्याने देण्यांत कांहीं दगलबाजी झाली आहे असे उघडकीस आणून दिल्यावांचून तो करार रद्द करण्याविषयीं मुंबईचे गवरनर स- रमाउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब यांनी आपलें अनुमत देण्याचें नाकबूल के - लें. परंतु त्यांनी विठ्ठलराव देवाजी यांस महाराजांच्या मर्जीवांचून दिवाणगिरीवरु कायम ठेवण्याचा आग्रह धरण्याचा आपणास हक्क नाहीं, असें रेसिडेंट यांस कळ. वून महाराजांस ही त्याबद्दल एका पत्रांत लिहिलें.