पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तारतम्यज्ञ आणि अनुभवी मुत्सद्यास कबूल आहे. दिवाणाचे वजन तिळमात्र देखी- ल कमी पडणें त्यास आवडत नाहीं आणि हेंच कायतें राज्यकारभाराच्या उत्तम सुधारणेचें मूळ बीज आहे असें त्यास वाटले आहे. अशा प्रकारची अप्रतिष्ठा व दुकिक कबूल करून कोणत्या राजास राजपद आवडेल तें आवडे. प्र- राजा.

  • आह्मीं व्हाटेलकृत राष्ट्राचे धर्मशास्त्र या ग्रंथांतील कांहीं वाक्यें टिपेत लिहिली आहेत. त्यांतील तात्पर्य असें आहे की राजाने आपणास विश्रांति मिळावी यासाठीं कामदारलोक नेमावे अशी त्यास मोकळीक आहे. परंतु त्यानें आपला अधिकार प्रधानमंडळीस कधींही देऊं नये. राष्ट्राने राज्यकारभार चालविण्यासाठी नेमलेल्या राजास आपला अधिकार दुसऱ्याच्या हातांत देण्याचा मुळींच अधिकार नाही. धान हैं एक उपकरण आहे. त्यास उपक्रियमाणस्थानीं बसवितां येत नाहीं. र्ने नेहेमीं त्यास आज्ञा करीत असाव्या आणि आपल्या हुकमाप्रमाणे ते वागतात किं- वां नाहीं याविषयीं त्याजवर निरंतर नजर ठेवावी. राजा वृद्धावस्थेमुळे दुर्बळ झाल असेल किंवा दुसऱ्या कांहीं कारणानें अशक्त झाला असेल तर त्याने राज्यकारभार चालविण्याकरितां राष्ट्राच्या नियमाप्रमाणे एक प्रतिनिधी नेमावा. परंतु जेव्हां तो राजसूत्र हातांत घेण्यास समर्थ होईल तेव्हां त्यानें प्रधानास आपल्या आज्ञा पाळण्या- स भाग पाडावें. त्यास आपल्या डोक्यावर कधींही बसूं देऊ नये.

या राष्ट्राच्या सर्वमान्य शास्त्रांतील वाक्यापुढे त्या एका देशीगृहस्थाचे दिवाणा- च्या संबंधाचे नियम किती क्षुद्र दिसतात हे सांगावयास नको. ज्या राष्ट्राच्या प्र- जांनी राजाच्या हातांत मुळींच कांहीं अधिकार ठेविला नाहीं, त्या राष्ट्राचा राजा कोणास कांहीं हुकूम करीत नाहीं, यामुळे राजाचा हुकूम अमलांत आणल्याबद्दल कोणास शासन करण्याचा न्यायाधिशास प्रसंगही येत नाहीं. अर्थात त्यापासून रा- जाची अप्रतिष्ठाही होत नाहीं. परंतु जेथे सर्व अधिकार राजासच आहे त्या राजांनी केलेला हुकूम मान्य करणारावर त्याबद्दल आरोप ठेवून त्यास त्याच राजाच्या न्याया- धिशापुढे चौकशीसाठी आणून शासन करविणें हा नियम कसा योग्य होईल ? दिवाणास ब्रिटिश सरकारच्या रोसेडेंटाच्या अनुमतीखेरीज बरतर्फ करूं नये या निय सास बळकटी आणण्यासाठी बरीच कारणें दाखविली आहेत. परंतु त्यांत कांहीं अर्थ नाहीं, आणि असें अनुभवास आले आहे की दिवाणाच्या अधिकाराचे संरक्षण होण्याकरितां त्याजवर इंग्रज सरकारची जितकी नेक नजर पाहिजे त्यापेक्षां त्यास जास्त "A sovereign is undoubtedly allowed to employ ministers to ease him in the painful offices of Government; but he ought never to surrender his authority to them. When a nation chooses a conductor, it is not with a view that he should deliver up his charge into other hands. Ministers ought only to be instruments in the hands of the Prince; he ought constantly to direct them, and continually endea- vour to know whether they act according to his intentions. If the imbecility of his age, or any infirmity, render him incapable of governing, a regent ought to be nominated, according to the laws of the State: but when once the sovereign is capable of holding the reins, let him insist on being served, but never suffer himself to be superseded.” ( Vattel's law of Nations Book 1 Chapter 4 Page 23 Section 55.)