पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. ( ३३ ) देण्याचा प्रसंग आला असतां ती देखील तुह्मीं अशी गुप्त द्यावी की प्रजेस असे क- ळू नये कीं अमुक एक काम महाराजांनी रेसिडेंट साहेब यांच्या सल्यावरून केले. राज्यकारभार चालविण्यामध्ये राजाकडे पूर्ण अधिकार असला पाहिजे. व त्याच्या प्रजेच्या दृष्टीने त्याचे महत्व कमी झाले आहे असे किंचितही दिसूं देतां कामास नये. राजास रेसिडेंटाच्या अगदी आधीन करून ठेवलें तर त्यापासून कांहीं चांगला परि- णाम होईल व त्याच्या प्रजेस तता राज्यकारभार आवडेल असे वाटत नाहीं. दिवाणाच्या संबंधाने त्या मसुद्यांत जे कांहीं नियम आहेत ते तर फारच घातक आणि अनर्थोत्पादक आहेत. राजाचा गैरकायदेशीर हुकूम कोणीं ऐकिला तर त्यास शासन करावें असा एक नियम त्या मसुद्यांत आहे. 'गैरकायदेशीर' हा शब्द उगीच पोकळ आहे. दिवा- णाच्या द्वाराखेरीज कोणतेंही काम करण्यास राजास स्वातंत्र्य नसावे हा त्या नियमा चा मुख्य उद्देश आहे. असे त्या नियमाच्या खाली स्पष्ट लिहिले असून राजाचा गैरकायदेशीर हुकूम कोणी ऐकू नये, एवढ्याकरितां त्या नियमाची योजना केली आहे असें मानिलें तरी * दिवाणाच्या परोक्ष राजाने एखादा कायदेशीर हूकुम दिला तरी त्या हुकुमास गैरकायदेशीरपणा दिवाणास आणितां येईल. कारण राजापेक्षां दिवाण जास्त शहाणा असावयाचाच. किंवा राजाने माझा हुकूम कायदेशीर आहे असा आग्रह धरला तर राजाचा हुकूम कायदेशीर आहे कीं नाहीं या वादाचा नि- काल होण्याकरितां ऐसिडेंटाकडे तंटा नेण्याचा प्रसंग यावयाचा. सारांश, एखादा फायदेशीर हुकूम केल्याने देखील नियम मोडल्याचा आरोप राजावर लागू होऊन राजेमहाराज यांजवर पदच्यूत होण्याची पाळी यावयाची. देशी राजाच्या दरबारामध्यें चांगल्या दिवाणाची गरज आहे, आणि त्याच्या मसलतीनें राजाने राज्यकाभार चालवावा हें ही अवश्य आहे. परंतु राजानें दिवाणा- च्या द्वाराखेरीज काहीं हुकूम केला असतां तो विधिपूर्वक केला नाहीं येवढ्यावरूनच त्यास अशास्त्रता यावी इतका राजावर दिवाणाचा दाब असण्याचें तें कोणतें प्रयोज- न आहे ! व त्यापासून चांगले परिणाम होण्याचा संभव काय ? दिवाणाच्या द्वाराखेरीज राजांनी केलेला हुकूम मान्य करून त्याप्रमाणे अमल केल्याबद्दल एखाद्या मनुष्यावर आरोप ठेवून राजाच्या ताब्यांतील न्यायाधीशानें त्यास शासन केले ह्मणजे खरोखर एक मोठी मौज होईल; आणि त्या राजाच्या यो- ग्यतेला, अब्रूला आणि त्याच्या वैभवाला फारच चकाकी येईल. दिवाणाचा अधिकार वाढविण्याकरितां या नियमाची योजना करण्यांत फारच चातुर्य खर्च केले आहे यांत संशय नाही! राजास परोक्ष शासन व्हावे हा उद्देश फार उत्तम रीतीनें साधला आहे !! • राजाची अब्रू, योग्यता, आणि मोठेपणा यांस किती जरी उणेपणा आला तरी तो त्या

  • "It is also intended to give complete effect to the provision that a sovereign shall act through his responsible Minister, the Dewan.” (Blug Book No. 1 Page 77.)