पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. न्या वाक्याचे तात्पर्य असे आहे की राजाकडेस कायदा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांत कांही अर्थ नाहीं. दोन्ही सभांनी जो कायदा मंजूर केला तो राजाकडून मंजूर व्हावयाचाच. राजाची संमति हा एक विधि मात्र आहे. त्याचप्रमाणे येथेही राजाच्या संमतीचे महत्व तसेंच आहे. ब्रिटिश सरकारच्या रोसे- डेटाने व दिवाणाने जो कायदा मंजूर केला तो राजानें निमूटपणे कबूल केलाच पा- हिजे. या संबंधाने राजाकडे अधिकार असून नसून सारखेच आहे; आणि व्याखे- रोज राजाकडेस ' राजा' या दोन अक्षरांच्या एका पोकळ शब्दाखेरीज कांहीं उरूं दिले आहे असे दिसून येत नाहीं.

  • हाउस ऑफ लॉर्डस्स्थानी रेसिडेंटसाहेब आणि हाउस ऑफ कामन्स स्थानापन्न दिवाणसाहेब अशी या नियमाची एकंदर रचना आहे. स्थापित नियमां- प्रमाणे राजाचा कारभार चालतो किंवा नाहीं याजवर देखरेख ठेवण्याचा अधिकार रेसिडेंटाकडे असावा असे सदर्ह नियमांत लिहिले आहे. राजानें जर स्थापित निय मांचें उल्लंघन केले तर त्यास गादीवरून काढून टाकून त्याच्या वारसास राज्यपद द्यावें हें राजास शासन ठरविलें आहे. स्थापित नियमांप्रमाणे राजा वागत नाहीं व त्याने अमुक एक नियम मोडला असें रेसिडेंटसाहेब यांनी ठरविले ह्मणजे राजाच्या अधिकाराचे आयुष्प संपलें. रेसिडेंटाची अगोदर संगति घेतल्यावांचून दिवाणास कोणताही कायदा अखेर मंजुरीकरितां राजापुढे आणण्याचा अधिकार नाही. रेसि- डेंट पसंत करील त्यातच राजाने दिवाण नेमावें व त्यांच्या मंजुरीवांचून त्यास दूर करूं नये. वरिष्ट अदालतीच्या न्यायाधिशास सुद्धां दूर करावयाचे असल्यास रेसि डेटाची सल्ला विचारली पाहिजे. राजाने मरणाची शिक्षा तिडेंटाच्या अनुमता - वांचून देऊं नये. याप्रमाणे राज्यकारभारांतील मुख्य मुख्य गोष्टींत रेसिडेंट साहेब यांचा मोठा अधिकार ठेविला आहे. त्यांच्या विचारावाचून दिवाणास व दिवा- णाचे विचारावांचून राजात कांहीं एक करण्याचा अधिकार नाहीं. अशी योजन केली असून रेसिडेंट साहेब यांचे वाजवीपेक्षां राज्यकारभारांत फाजील वजन ठेविलें नाहीं असें लटलें आहे. हें एक विलक्षण धारिष्ट आहे.

देशी राज्याच्या दरबारांत ढवळाढवळ करण्याचा रेसिडेंटास अधिकार दिल्यानें राजांचे तेज कमी पडते आणि त्या योगानें त्याची प्रजा त्याचा तितका मान ठेवीत नाहीं व त्यापासून वाईट परिणाम घडतात असे बडोद्याच्या राज्यकारभारामध्यें रेसि- डेटा वाजवीपेक्षा जास्त मध्यस्ती केल्यामुळे अनुभव आलेले आहेत. आणि सर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब यांनी सयाजीराव महाराज यांचे कारकीर्दीत रेसिडेंट यांस अशी ताकीद दिली होती कीं, जरूरीच्या प्रसंगी महाराजांस सल्ला

  • हाऊस् ऑफ् लॉर्डस् = बडेलोकांची सभा.

+ हाऊस ऑफ कॉमन्स = प्रजेच्या प्रतिनिधींची सभा.