पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (३१) यावरून आमच्या देशांतील राजांत इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांची किती भीड- मुरवत आहे व ते त्यांचा किती मुलाजा ठेवतात हे समजते. ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्याच्या मनांत अमुक एक गोष्ट आली आहे असे तर्काने त्यांचे मनांत आले की लागलेच त्या विषयाकडे त्यांचे लक्ष्य लागते. मग समक्ष त्यांत एखादी सला दि- ली किंवा सदुपदेश केला तर त्या गोष्टीविषयी ते किती तत्पर होतील बरें ! टकर साहेब यांच्या मिनिटास जोडलेल्या राजकारणांनयमाच्या मूलतत्वांविषयीं निराळा विचार करण्याचे काही प्रयोजन राहिलें नाहीं. कारण इंग्रज सरकाराबरो- बर तहनामे करून आपल्या देशांतील ज्या राजांनी आपले खातंत्र्य कायम ठेविलें आहे त्यांच्या राज्यकारभाराचे सर्व सूत्र ब्रिटिश रेसिडेटाच्या हातांत रहावें, असा ज्या नियमांचा परिणाम आहे ते नियम तहनाम्यास बाधक आहेत सबब अमलांत आण- ण्यास योग्य नाहींत असे आह्मीं प्रतिपादन केलेच आहे. तथापि त्या नियमांतील कांहीं कलमांबद्दल विचार केला पाहिजे. कारण ते नियम रचणाराने दोन देशी राज्यामध्ये कारभार केला आहे व त्यांत त्यांस मोठे यश मिळाले आहे असें टकर साहेब यांनी लिहून त्यांची फार प्रशंसा केली आहे. व त्या गृहस्थाने देशी राजाचे आपण परम उत्सुक आणि सानुराग अभीष्टचिंतक आहोत असे स्वतांस ह्मणून घेतले आहे. व तारतम्य ज्ञान व व्यवहारिक अनुभव यांस अनुलक्षून हे नियम रचिले आहेत आणि ते सर्व राष्ट्रांस लागू पडतील असें त्यांनी निश्चयपूर्वक सांगितलें आहे. त्यासाठी त्यांच्या नियमांत असा तो कोणता चांगलेपणा आहे की ज्या नियमाला अनुसरल्यानेंच देशी राजांचें परम हित होणार आहे तें लक्षपूर्वक पाहिलें पाहिजे. राजाच्या कल्याण करण्याच्या हक्कास कांही एक हात न लावतां ब्रिटिश सरकाराच्या रेसिडेंटाचें राज्यकारभारामध्ये फाजील वजन ठेविलें नाहीं असे या नियम रचणाराचें ह्मणणें आहे तें किती खरें आहे याचा आपण अगोदर विचार करूं. एकंदर नियम लक्षपूर्वक वाचून पाहतां राजाकडेस अधिकार तरी कोणता ठेविला आहे हेंच आपल्यास कळत नाहीं. ब्रिटिश रेसिडेंटाचें संगत घेऊन जो कायदा मंजूर करण्याकरितां दिवाणसाहेब राजास विनंती करतील तो कायदा राजानें मंजूर न केला तर त्यास कायद्याचें रूप यावयाचें नाहीं असा एक या निय मांमध्ये नियम केला आहे. त्याखेरीज राजाकडे कोणचाही अधिकार ठेवला आहे असे मुळींच नाहीं. इंग्लंडांमध्ये हा अधिकार राजाकडेस आहे. तोच नमुना देशी राजांच्या राज्यांत उतरण्याचा प्रयत्न केला आहे. पण राजाच्या संमतीमध्ये किती महत्व आहे हें आह्मीं टिपेत एक वाक्य लिहिले आहे त्यावरून कळेल.* “Though the king has a negative in framing laws, yet this, in fact, is esteemed of so little moment that whatever is voted by the two Houses is always sure to pass. into a law; and the royal assent is little better than a form." (Hume's Essays, Volume 1 Page 39. )