पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३० ) मल्हाररावं महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आपल्या मनाच्या मोठेपणाची सीमा करून सोडली आहे. अमलांत आणणें त्यांस पराकाष्ठेचें जड वाटत आहे. परंतु आतां त्याप्रमाणे उत्तम कारागिराने तयार केलेल्या चित्रामध्ये आणि साधारण कारागिराने तयार केलेल्या चित्रामध्ये जसा चांगलेवाईटपणा असावयाचा तसा इंग्रज सरकारच्या हि- दुस्थानांतील राज्यपद्धतीमध्ये असावयाचाच. त्याबद्दल त्यांचे उर्णे काढून त्यांजवर टीका करणे यांत पुरुषार्थ तो काय? राजांची राज्यसत्ता कमी न करितां त्यांच्या- विषय अंतःकरणांत खरें ममत्व बाळगून व त्यांस वारंवार सदुपदेश करून त्यांची राज्ये त्यांच्याच हातांनी सुधारणुकीस आणावी हैं इंग्रजसरकाराचे कर्तव्यकर्म आहे. आणि त्यापासून जितकी कीर्ति आणि यश त्यांस मिळेल व देशी राज्यांच्या प्रजेविषयीं जी ते दया दाखवितात तिचें जितकें सार्थक होईल तितकें तहनामे आणि वचने मोडल्याने कधीही होणार नाहीं. सर रिचर्ड मीड यांच्या कमिशनांनी सुचविलेले उपाय सक्त असूनही टकर सा- हेब यांस अपूर्ण व सौम्य वाटले. यावरून या देशांतील कोणत्याही राजाच्या दरबा राशी अधिकाराच्या नात्याने त्यांचा निकट संबंध घडला होता असे दिसत नाहीं. व त्यामुळे इंग्रज सरकाराच्या अधिकाऱ्याच्या नुझ्या उपदेशानें किती कार्य होतें त्याचा त्यांस अगदीं अनुभव नव्हता. ब्रिटिश रेसिडेंटाच्या उपदेशानें जसें कार्य होतें त दुसऱ्या कोणत्याही उपायाने होत नाहीं. उपदेश कसा करावा याचें मात्र रेसिडेंट यांस चांगले ज्ञान असले पाहिजे. अथवा त्याच्या वरिष्टांनी त्यांस तें शिकविलें पाहिजे. कर्नल फेर साहेबासारख्या स्वभावाचा रेसिडेंट मात्र असतां कामा नये. मोठे सयाजीराव महाराज यांनी जान महंमद जमादार यांस प्रतिबंधांत ठेविलें होतें. मुंबईचे गवरनर नामदार लार्ड क्लैर साहेब बहादूर बडोद्यास गेले तेव्हां जमादार यां नीं आपली सुटका होण्याकरितां साहेब बहादुर यांनीं महाराजांस शिफारस करावी असा यत्न केला. परंतु गायकवाड सरकारच्या प्रजेसाठीं आपण मध्यस्थी करावी हैं। वाजवी नाहीं असें लार्डसाहेब यांस वाटून त्यांनी जमादार याची विनंती साफ नाकबूल केली. ही बातमी महाराजास समजली तेव्हां त्यांनी जमादार यांची सुटका लार्ड साहेब यांस संतोषकारक होईल असें जाणून जमादार यास बंधमुक्त केलें. याबद्दल लार्डसा- हेब यांनी आपले मिनिटांत उल्लेख केला आहे. तो आली टिपेत लिहिला आहे.* “ In proof of his good feeling, I may mention an occurrence which hap- pened the day but one before I left Baroda which afforded me a good deal of pleasure. I allude to the release of John Mohammud, Jamadar, one of the principal officers of the Contingent, and a Sardar of rank, who had been placed in confinement by Sayaji (as I think has been reported to Government by Mr. Williams) during a visit to his friends at Baroda. John Mohammud had resorted in vain to every means of ob- taining his liberty, and had even induced the Political Commissioner's representative (Captain Iredell) to intercede with His Highness in his behalf. The Jamadar made daily representations to me, which I steadily refused to listen to (conceiving that I ought not to interfere between the Gaekwar and his subjects), when I ascertained that His Highness, thinking that his release would be agreeable to me, had, of his own accord, removed the guard placed over the Jamadar's house, and I instructed Lieutenant Colonel Burford to use his best endeavours to induce His Highness to allow him to return to the Contingent." (The Gaekwar and his relations with the British Government Page 414.)