पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (२९) व त्यांच्या रितीभाती व त्यांचे धर्म जसे असतील त्यांअन्वये त्यांच्या कुटुंबांमधील सर्व गोष्टींचा निर्णय करावा इतकेंच नाहीं पण इंग्लंडच्या कायद्याने एखादी गोष्ट न्यायानु- सारी होत नसेल तर ते कृत्य त्यांच्या ज्ञातींच्या सांप्रदायाप्रमाणे अथवा कायद्याप्रमा- असल्यास तें बेकायदेशीर आहे असें मानूं नये. लाई दलहौसी यानी इंग्लंडच्या राज्याचा कायदा एकीकडेस ठेवून व हिंदुशास्त्रानें प्रात्प झालेला दत्तकाचा अधिकार तुच्छ मानून कितीएक राज्ये बुडविलीं हैं काय सामान्य विशृंखलपणाचें प्रमाण आहे ? हें येवढे मोठे राज्य एकाच्याच इच्छेप्रमाणे चालत नाहीं तर लीड दुलहौसी यांच्या कारकीर्दीत देशी राज्यावर येवढा भयंकर जुलूम झाला कसा आणि त्यांचे करणे न्याययुक्त होते तर त्या कृत्याबद्दल अनुताप करून त्या जुलमी राज्यरीतीपासून इंग्लिश लोकांस कां बरें पराङ्मुख व्हावे लागलें ? अर्ल क्यानिंग यांच्या कारकीर्दीत त्यांनी या देशांतील राजेरजवाडे आणि प्रजा यांच्या ऊर्जित दशेसाठीं कोणकोणत्या सुंदर योजना केल्या त्या सर्वांस विदित आ- हेत. याप्रमाणे या देशाची राज्यव्यवस्था आहे. गवरनर जनरल जसे निवडतात या प्रमाणानें या देशांतील राजेरजवाडे व प्रजा यांस सुखे किंवा दुःखे होतात. इंग्रज सरकारांनी आपल्या प्रजेस स्वातंत्र्य दिले. राज्यकारभारामध्ये त्यांची सल्ला मसलत घेतली. अधिकाराच्या मोठ्या मोठ्या जागा विद्यादिगुर्णेकरून जे सत्पात्र झाले आहेत त्यांस दिल्या. आणि एकसत्ताक राज्यसत्ता कमी करून महाजन- सत्ताक आणि लोकसत्ताक राज्यपद्धतीचें व्याजमध्ये संयोगीकरण केले ह्मणजे दे- शी राज्यांस आपोआप आपल्या राज्यामध्ये त्याप्रमाणे राज्यरीती सुरू कराव लागेल. आणि ते जर दुराग्रहानें सुरू करणार नाहींत तर त्यांच्या प्रजेची राजनिष्ठा कमी होईल आणि त्यामुळे तीं राज्य स्वतांच लयास जातील. आज जर त्या राज्यांस इंग्लिश राज्यनीतीचे अनुकरण करणे भाग झाले आहे तर इंग्लिश राज्यकारभा- रामध्ये इतका मोठा फेरफार केला असतां तो कित्ता उचलल्यावांचून देशी राज्यां- चा टिकाव कसा लागेल? राणीसाहेब यांच्या सन १८५८ च्या जाहिरनाम्यांत " आमच्या सर्व रयतेविषयीं जे राजधर्म आह्मी अवश्य मानितों तेच राजधर्म हिंदुस्थानांतील आमच्या मुलुखां- तल्या रयतेविषयीं आह्मांस पाळिले पाहिजेत असें आह्मी समजतों. आली ईश्वराच्या कृपेनें ते सर्व वास्तवीक रीतीने व मनःपूर्वक पाळूं” असे प्रसिद्ध केले आहे. या वाक्यांत जें कांहीं करावयाचे ह्मणून लिहिलें आहे त्यांहून ज्यास्त आह्मीं वर कांहींच झटलें नाहीं. आणि तितके त्यांनी केले ह्मणजे पुरें आहे. तेणेंकरून त्यांच्या राज्यांतील प्रजा सुखी होऊन देशी राजांच्या प्रजेविषयीं जी त्यांत दया येते तिचें आपोआप सार्थक होईल. 6 वक्तुं सुकरं अध्यवसितुं दुष्करं ' असे इंग्रज लोकांस झाले आहे. अभिवचनें देण्यांत व प्रतिज्ञा करण्यांत त्यांनी