पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंडेराव महाराज यांच्या कृपेंतोल मंडळीवर जुलूम. होता व पुष्कळ चतुर व गुणी लोक यांस राजाश्रय करून दिला होता. त्यांचे बसावयाचे घोडे व हत्ती अति उत्तम प्रतीचे असत, व त्यांजवरील सामान उत्तम कारागिरांनी तयार केलेले अति मौल्यवान व सुबक असे. त्यांची स्वारी निघाली ह्मणजे तो थाट पाहण्यास लोकांचे नेत्र तिकडे लागत असत. भाऊ शिंदे यांच्या सौजन्याविषयों आह्मी वर लिहिले ते सौजन्य स्वभावसिद्ध नव्हते असे पुढे दिसून आले. जेव्हां ते दिवाण झाले तेव्हां त्यांच्या वृत्तीत महदांतर पडलें. पूर्वी जितके ते लोकप्रिय होते तितके ते दिवाण झाल्यावर नावडते झाले. लोकहितासाठी जे परम तत्पर होते ते दिवाण झाल्यावर अति उदासीन झाले, आणि दुसऱ्याचा उत्कर्ष पाहतांना ज्यांस आनंद वाटत असे ते दिवाण झाल्यावर अतिशय हेवखोर झाले. ह्या त्यांच्या वृत्तींत हा विलक्षण फेर पडलेला पाहून त्यांच्या मित्रांनी व हितेच्छु लोकांनी त्यांस पुष्कळ उपदेश केला, परंतु तो त्यांस रुचला नाहीं. ललू आशारामा च्याच तंत्राने ते चालत होते. जेव्हां त्यांजला दिवाणगिरीवरून काढले तेव्हांपासून तर ते विशेष दुष्ट होत चालले. जे त्यांचे मित्र तेच त्यांस शत्रु भासूं लागले. ज्या आरो- पावरून ते पदभ्रष्ट झाले होते ते त्यांचें केवळ स्वताचे कृत्य नव्हते. ते त्या आरोपांत त्यांच्या अहित पक्षाच्या कावेबाजपणामुळे सांपडले होते, या कारणाने त्यांचा कोणावरच विश्वास बसेना. कोणाचा नाश करावयाचा असला ह्मणजे ते विलक्षण तरकट रचीत असत, आणि त्या कृत्यास त्यांचा मित्र हबीबुल्ला मुनसी सहाय्य असल्यामुळे त्यांचा बेत सहज सिद्धीस जाई. सर्वांस माहित आहे कीं, खंडेराव महाराज यांची मुसलमानी धर्मावर फार श्रद्धा होती. ते गादीवर बसल्यावर लवकरच एका फकीराच्या इतके नादी लागले होते की, ते धर्मांतर करितात की काय असे सुद्धां लोकांस भय वाटले होतें. फकीर लोकांसाठी त्यानीं मोती- बागेजवळ एक मोठी भोजन शाला बांधली आहे ती, आणि शहरच्या प्रत्येक दरवाज्याला कुराणांतील पवित्र वाक्ये फारसी अक्षरांनी कोरून बसविलेले चिरे, व महमदाच्या कबरीवर घालण्यासाठी त्याणीं हिरे, मोती व माणिकें जडून तयार केलेली एक बहुमोल चादर ह्या वस्तु त्या गोष्टीस प्रमाणदर्शक आहेत. महिन्याच्या अकरावे तारखेस बडोद्यांत व महालोमहालीं फकीरांस मोठा खाना देण्यांत येत असे. महाराजांची मुसलमानी धर्मा- वरील श्रद्धा भाऊ शिंदे व हबीबुल्ला मुनसी यांस आपले इच्छित हेतु सिद्धीस नेण्यास फार साधनीभूत झाली होती. मुसलमानी खंडेराव महाराज यांचा असा नेम होता कीं, प्रातःकाळी उठल्याबरोबर अगोदर भाऊ शिंदे यांचें मुख अवलोकन करावयाचें. द्वितीयेच्या चंद्रदर्शनानंतरही तोच क्रम होता. ती वेळ साधण्यासाठी भाऊ शिंदे याणीं स्नान करून अरुणोदयाच्या पूर्वी महाराज यांच्या निद्रागारांत जावें, आणि महाराज उठल्याबरोबर त्यांस आपली मुखश्री दाखवावी असा पाठ होता. नंतर कांहीं वेळपर्यंत उभयतांचा एकांत होई. या एकांतांत हबीबुल्ला मुनसी यांस येण्याची परवानगी होती. खुदाचा आपणास साक्षात्कार आहे असें महाराजांस कोणी म्हटले म्हणजे त्या दुरभिमानी राजास तें मिथ्या प्रशंसन अति प्रिय वाटत असे. भाऊ शिंदे यांचे मनांत एकाद्याचा उत्कर्ष करावयाचा असला किंवा एकाद्या २