पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (२७) ब्रिटिश सरकारचें राज्य राजसत्ताक आहे. आपल्या हिंदुस्थानांतील राज्यामध्यें राश-- याच्या राज्यापेक्षा तिप्पट प्रजा आहे. हें येवढे राज्य केवळ राजसत्तात्मक आहे. लणजे त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये प्रजेनें तिळमात्र ही अंग नसून एक दोन काम- गार व त्यांच्यावर एक मुख्य अधिकारी ( रशियांत बादशाहा आणि हिंदुस्थानांत इंग्लंडच्या राणीचा प्रतिनिधी गव्हरनर जनरल) मिळून सर्व राज्यकारभार चालवितात.

निवडले आहेत. . इंग्रज सरकार या देशांतील राज्य राजसत्ताक आहे ह्मणून तें जुलमी आणि निष्ठुर आहे असे आमचें मुळींच ह्मणणें नाहीं. त्यांचें राज्य त्यांच्या प्रजेस न्यायाचें, करुणाशील, आणि लाभकारक असावे अशी त्यांची पराकाष्ठेची इच्छा आहे; परं तु आपला तोटा करून तर नाहीच, पण फायदा कमी करून आपल्या प्रजेचे हित करावे असें त्यांच्या मनांत येत नाहीं; यामुळे त्यांच्या प्रजेचें जसें कल्याण त्यांच्या रा- ज्यांत झाले पाहिजे होते तसे त्यांच्या हातून होत नाहीं. आह्मी टिपेत जान ब्राईट साहेब यांचे वाक्य लिहिलें आहे त्यांत त्यांनी या जगांत सांप्रत काळीं राजसत्ताक राज्यामध्ये प्रजेच्या हिताविषयीं उत्सुक असे कायते दोनच राजे एक रशियाचा झार आणि दुसरी इंग्लंडची महाराणी विक्टोरिया. आमचें मत तर असे देखील आहे कीं रशियाच्या बादशाहापेक्षां महाराणी विक्टोरिया आपल्या प्र- नेच्या हिताविषयी जास्त उत्सुक आहेत; परंतु रशियाच्या बादशाहाच्या सामान्य कारुण्यापासून त्यांच्या प्रजेचें जसें हित होईल तसें महाराणीसाहेब यांच्या अति- कारुण्यापासन, जोपर्यंत त्यांच्या देशांतील लोकांस सत्तेची आणि द्रव्याची अमर्याद तृष्णा आहे ती कमी होणार नाहीं तोपर्यंत हिंदुस्थानांतील प्रजेचे हित होण्याचा सं- भव नाहीं. कारण रशियाचे बादशाहास आपल्या देशांतील प्रजेचें कल्याण कर- ण्याचे असून महाराणी साहेब यांस परकीय देशांतील लोकांचे हित करावयाचें आ-- हे हा एक मोठा भेद आहे. आपला राजा परदेशस्थ असल्यामुळे राजाच्या हिताशी आपल्या हिताचा असा काहीं विरोध आहे की एकाचा तोटा तो दुसऱ्याचा नफा आहे. आमच्या देशांतील राज्यांचा राज्यकारभार एकाच्याच इच्छेप्रमाणे चालतो; तसाच हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारच्या राज्याचा राज्यकारभार एकाच्याच इच्छेप्रमाणे ' चालत आहे. गव्हरनर जनरल जे ह्मणतील ती पूर्व दिशा असा प्रकार आहे. का-- यदे करणारे निराळे आणि ते अमलांत आणणारे निराळे. अशा निवडा केलेल्या. आहेत; परंतु ते सर्व इंग्लिशलोक असून राजेही तेच. व या सर्वांचाही उद्देश एकच असल्यामुळे त्या निवडणुकीचा फायदा लोकांस जसा व्हावा तसा होत नाहीं.. "It does not follow that because it is a despotism it should be unjust or cruel. There are probably not two potentates in the world at the present time more anxious that their ruling should be just and merciful and beneficial to their populations that the Czar of Russia and the Queen of England." (Public Addresses by John Bright Page 499).