पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. रून आपल्या अभिरुचीप्रमाणे काळाची व देवाची अनुकूलता साधून तो सोईवार आणि सुशोभित केलेला आहे. याप्रमाणे इंग्लंडची राज्यरचना सोईवार आणि सुखावह करण्यास फार सायास पडले आहेत. प्रसंगी राजावर बलात्कार करून, प्रसंगी त्याची खुषामत करून, प्रसं- गीं त्यास पैशासाठी अडवून धरून, आणि प्रसंगी त्याच्या संकटकालीं त्यास मदत करून प्रजांनी काळ, देश, वर्तमान, यांच्या अनुकूलता साधून, तो राजनीति आपणां- स केवळ सुखाचें माहेर घर करून ठेविली आहे. या इंग्लंडच्या राजनीतीशीं ब्रिटिश इंडियांतील राजनीतीची तुलना करून पाहिली झणजे आपल्यास सहज कळेल की हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकाराचे राज्य एक- राजसत्ताक आहे. इंग्लंडची महाराणी विक्कोरिया या भरतखंडाची बादशाहीण आहे. त्यांच्या मुल- खाचा त्यांचे नांवें राज्यकारभार चालविण्यासाठी गव्हरनर जनरल यांची नेमणूक करण्यांत येते. आणि ते त्यांच्या हाताखालील कांहीं मंडळींच्या विचाराने सगळा राज्यकारभा- र चालवितात. इंग्लंडच्या राज्यरचनेप्रमाणें या ब्रिटिश इंडियाच्या राज्यकारभारांत बडेलोक स्थानापन्न आणि लोकप्रतिनिधी स्थानापन्न कोणीच नाहींत. अर्थात हैं। राज्य एकराजसत्ताक आहे हें उघड आहे. इंग्लंडांतील बडेलोकांच्या सभेचा आणि लोकप्रतिनिधींच्या सभेचा येथील राज्य- कारभाराशीं कांहींसा संबंध आहे, पण त्या दोन्ही सभांचा आमच्या देशांतील बडेलो- कांशी व प्रजेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीं. त्यांस हिंदुस्थानवासी लोकांच्या रितीभाती काय आहेत, लोकांच्या इच्छा काय आहेत, व त्यांचे हालहवाल काय आ त यांविषयीं अगदीं माहिती नाहीं. आमच्या लोकांवर पाहिजे तसे जुलमी कर ब- सविले तरी त्यांच्या पदरात कांहीं खार लागत नाही. अशा सभेचा हिंदुस्थानांतील राज्यकारभाराशी संबंध असण्यांत आह्मांस फायदा काय ? तारिख १ डिसेंबर सन १८७७ रोजी ब्राईटसाहेब यांणीं म्यांचेस्टर येथे भाषण केलें त्यांत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की * ह्या मोठ्या लोकसमूहाचा त्यांच्या राज्य- कारभाराशीं कांहीं संबंध नाहीं. ते वशीकृत लोक सत्तेपुढे अगदीं जेर आहेत. त्यांच्या राज्यकारभाराच्या संबंधानें त्यांची कधी कोणीही सल्लामसलत घेत नाही. + याच विख्यात पुरुषानें एके प्रसंगी स्पष्ट असें झटलें आहे की हिंदुस्थानांतील "But you must remember that all this great population has no voice on its own affairs. It is dumb before the power that has subjected it. It is never consulted upon any matter connected with its Government." (Public Addresses by John Bright M. P. Page 435). "You are in the habit of hearing constantly that Russia is a despotic country and the Czar the greatest of despots. Our Indian Empire contains a population nearly three times as great as that of the Russian Empire, and it is an Empire also that is governed by a despotism-that is, a government which has no representative institu- tions, and in which a few men with some one at the top of them-an Emperor in Russia, in India a Governor-General representing the Queen of England-administer the whole Government of the Empire.” (Public Addresses by John Bright Page 499).