पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेबांच्या मिनिटाचें गुणदोषविवेचन. (२५) इंग्लंडच्या राज्यकारभाराची रचना फारच उत्तम आहे. राजसत्ताक, प्रजासत्ता- क, आणि महाजनसत्ताक राज्यरीतीचें संयोगीकरण करून राज्यकारभार चालवि- ण्याचे नियम केले आहेत. राजा, राष्ट्रांतील बड़े लोक, आणि प्रजेनें निवडलेले प्रति- निधी, या तिघांच्या विचाराने राज्यकारभार चालतो. प्रत्येक पौरजन राज्यसभेचा सभासद होण्यास लायक आहे, आणि प्रत्येक सभा- सदास असा अधिकार आहे कीं त्यास आवडेल त्या कायद्याचा मसुदा त्यानें कायदे- कौन्सिलापुढे विचारासाठी रुजू करावा. 1. प्रत्येक प्रांताच्या प्रजेस असा हक्क आहे कीं त्यांच्या रीतीभाती, त्यांच्या हिताचे मार्ग, त्यांचे हालहवाल व त्यांच्या इच्छा ज्यांस पूर्णपणे माहीत आहेत व राज्यसभे- पुढे त्यांच्यातर्फे माहिती देण्यास जे योग्य आहेत त्यांस त्यांनीं प्रतिनिधी नेमावे. कॉमन्स सभेचे सभासद पाहिजे त्या वर्गाचे व धंद्याचे निवडण्याविषयीं प्रजेस मोक- ळीक आहे; यामुळे राजनीति जाणणारे मुत्सद्दी, शिष्टजन, वैद्य, वकील, व्यापारी, कारागीर, योद्धे, आणि दर्यावर्दी या सर्वांस पार्लमेंट सभेच्या सभासदाचा हुद्दा मि- ळतो, आणि त्या योगाने प्रत्येक वर्गाच्या आणि धंद्याच्या लोकांचा राज्यसभेश प्रत्यक्ष अथवा परंपरेनें संबंध असतोच. अगदी हलक्या प्रतीच्या रयतेस देखील त्याचें गाहाणें राज्यसभेपुढे नेण्यास कोणी ना कोणी असतोच. दरबारामध्ये ज्या- ची हिमायत नाहीं असा निराश्रित मनुष्यच सर्व राष्ट्रामध्यें नाहीं. याप्रमाणें लोकस्थिति, लोकांच्या गरजा व निरनिराळे प्रसंग जाणणारे लोक चोहींकडून एकत्र जमल्यामुळे व एकाच विषयावर अनेक विचार व युक्त्या प्रगट हो. त असल्यामुळे कोणा ना कोणाला तरी सर्वमान्य अशी काहीं तजवीज किंवा उपाय सुचतोच. आणि कोण शहाणपणाची मसलत दिली किंवा एखादा लोकहितकारक नियम करण्याविषयीं सूचना केली ह्मणजे राज्यसभेतून बहुमताने नव्याण्णव वांढयाने ती मंजूर व्हावयाचीच. प्रजेवर अन्यायाचे व जुलमाचे कर बसूं नयेत ह्मणून करासंबंधी कायदा करण्याचा विचार कामन्स सभेतूनच निघाला पाहिजे व त्यांनीं तो कायदा अगोदर पास केला पाहि- ने. हा अधिकार प्रजेच्या प्रतिनिधीकडेस ठेविण्याचा हेतु असा आहे की पैशाची पराकाष्ठेची जरूर असल्यावांचून ते आपण होऊन आपल्यावर व आपल्या देशबांध- वांवर कधींही कर बसविणार नाहींत. अशा प्रकारची इंग्लंडच्या राज्यरीतीची घटना आहे. या राज्यरचनेत एखाद्या पुरातन राजवाड्याची जर उपमा दिली तर बरोबर साजे- ल. सांप्रतच्या पाहणाराला तो राजमहाल अगोदर एक नमुना तयार करून हल्ली जें शिल्पशास्त्र प्रचारांत आहे त्या नियमाने एकदम फार सुंदर बांधला आहे असें दिसेल; परंतु तो तसा बांधलेला नाहीं. पुरातन काळामध्ये निरनिराळ्या वेळेस त्या त्या काळच्या शिल्पशास्त्राप्रमाणें तो बांधलेला आहे आणि व्याजमध्ये वारंवार फेरफार करून त्याची रचना सुधारलेली आहे. व वारंवार उस्तवारी करून व जीर्णोद्धार क