पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. यामुळे इंग्रज सरकारच्या राज्यापासून प्रजेस जे कांही दुसरे फायदे झाले आहेत ते सर्वे कमीज्यास्त प्रमाणानें लोपून गेले आहेत, आणि त्यामुळे देशी राजांची प्रजा दुःखी आणि आपण सुखी असे त्यांस मुळींच वाटत नाहीं.. आणखी आम्ही प्रतिज्ञापूर्वक सांगतों कीं, देशी राजाची प्रजा इंग्रज सरकारची प्रजा होण्यास अगदी इच्छित नाहीं. त्यांस त्यांच्या राजांची राज्ये फार आवडतात. याविषयीं आम्ही मार्गे एका प्रकरणांत बडोद्याचे रेसिडेंट कर्नल बार यांच्या वार्षिक रिपोटांतील एक वाक्य प्रमाणास दिले आहे. मला चांगले स्मरते की, लार्ड क्यानिंग यान • हिंदुस्थानांतील राजे रजवाडे यांस दत्तक घेण्यास सनदा दिल्या त्याबद्दल स्टेट सेक्रेटरी यांस पत्र लिहिले आहे त्यांत असे लिहिले आहे की, शिंदे सरकारास जेव्हां याबद्दल सनद दिली तेव्हा त्यांच्या प्रजेनी असा मोठा उत्साह केला की, जसा काय महाराजांस खरोखरच पुत्र झाला. अशा प्रकारची देशी राजांविषयीं राज भक्तीची अनेक प्रमाणे दाखवितां येतील. महाराजां शिंदे अलिजा बहादर यांच्या प्रजेनी टकर साहेब यांच्या कल्पनेप्रमाणे आपल्या विपद्दशेचें आयुष्य दीर्घ झाले अशी कल्पना करून त्या प्रसंगी • अनुत्साह प्रदर्शित केला असता तर आम्ही कबूल केलें असतें कीं, त्यांस त्यांच्या राजांची राज्ये नको आहेत. आमच्या राजांची राज्ये जर अतिशय जुलमी आहेत तर प्रजेचा त्यांजविषयीं येवढा कां बरें अनुराग ? आणि इंग्रज सरकारचे राज्य पराकाष्ठेचें न्यायी आहे तर त्या राज्याविषयीं त्यांस येवढी कां बरें अनावड ? टकर साहेब यांचे म्हणणे असे आहे की, एक सत्ताक राज्याधिकार कमी केला पाहिजे; कारण किती जरी राजा शहाणा असला तरी त्याच्या सत्तेस नर कांहीं मर्यादा नसेल तर त्याच्या हातून अन्याय होईलच होईल, हा त्यांचा उल्लेख सर्वमान्य आहे, परंतु देशी राजांच्या एकसत्ताक राज्यरीतीला दोष देतांना आपले हिंदुस्थानांतील राज्य कोणत्या पद्धतीचे आहे याविषयी त्यांस विस्मृती झाली असे वाटते. त्यांस जर त्या समयीं अशी आठवण असती की, आपले राज्य देखील एकसत्ताक राज्याच्याच पद्धतीचे आहे तर देशी राजांचीच एकसत्ताक राज्यसत्ता कमी केली पाहिजे असे त्यानी म्हटले नसते. इंग्लिश लोकांनी हिंदुस्थानांतील आपल्या राज्याबरोबर देशी राज्याचे साम्य करून त्यांच्यापेक्षा आपले राज्य न्यायी आहे असें म्हणण्यांत ती कोणती मोठी प्रौढी आहे. त्यांनी अगोदर इंग्लंडांतील आपल्याच राज्यरीतिशीं हिंदुस्थानांतील आपल्या राज्यरीतिवी तुलना करून पाहावी म्हणजे त्यांस त्यांच्या हिंदुस्थानांतील राज्यरीतिपुढे देशी राजांची राज्ये जशी जुलमी आणि अन्यायी दिसतात तसेच त्यांचे हिंदुस्थानांतील राज्य इंग्लंडच्या राजनीतिपुढे जुलमी आणि अन्यायाची दिसेल, व आपल्या राज्यरीतिमध्ये योग्य रितीचा फेरबदल केल्यावांचून देशी राजांच्या राज्यकारभाराला दोष देणें हे आपणास उचित नाहीं असें त्यांस वाटेल.