पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देकर साहेब यांच्या मिनिटाविषयों गुणावगुणविवेचन. (२३) आम्ही वर लिहिलें आहे की, देशी राजांच्या प्रजेपेक्षां आमची प्रजा विशेष सुखी आहे असे इंग्रज लोकांपैकी पुष्कळांचे अभिमानपूर्वक म्हणणे आहे त्यांस वरील प्रमाण मिळते. कितीएक गोष्टीत देशी राजांच्या प्रजेपेक्षां ब्रिटिश सरकारच्या राज्यांतील प्रजा सुखी असेल हे आम्हास कबूल आहे. परंतु देशी राज्यांतील प्रजेनीं इंग्रज सरकारच्या प्रजेचें सुख पाहून त्यासाठी लाळ घोटावा आणि इंग्रज सरकारच्या प्रजेन देशी राजांच्या प्रजेची दुःखरूप स्थिति कल्पून त्यांजविषय करुणा करावी अशी स्थिति आज नाहीं आणि त्यास अनेक कारणे आहेत. पार्ल- त्यांतील मुख्य इंग्रज सरकारच्या प्रजेस दरिद्राने पराकाष्ठेने व्यापिले आहे. त्यांचा देश सुपीक आहे, ते स्वतः मेहेनती आहेत, त्यांच्या देशामध्ये लढाई व दंगेधोपे नाहींत, आणि जीवित, अब्रू व मालमत्ता यांचे रक्षण चांगल्या रीतीनें होतें, परंतु त्यांस पोटापुर्ते साधारण भरडे अन्न आणि थंडी वाऱ्यापासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यापुर्ते जाडे वस्त्र देखील मिळत नाहीं, आणि ते पदार्थ दिवसानुदिवस त्यांस फारच दुर्मिळ होत चालले आहेत. एकाद्या वर्षी दुष्काळ पडला म्हणजे लक्षावधी लोक अन्नावांचून मरतात. हिंदुस्थानवासी लोकांच्या दारिद्र्याविषयीं आम्हींच ह्मणतों असें नाहीं. मेटांतील प्रख्यात सभासद ब्राईट साहेब यानी ता० १६ एप्रिल सन १८७९ रोजी बरमगाम येथे भाषण केलें त्यास नुकतीच दोन वर्षे होऊन गेला. त्यांत त्यानी असे सांगितलें कीं, *हिंदुस्थानांतील वीस कोटी प्रजा इतकी दरिद्री आहे की, इंग्लंड देशांतील अति दरिद्री लोकांस देखील त्यांच्या दारिद्र्याविषयीं कल्पना करवणार नाहीं, व त्यांजवर असे जुलमी कर बसविले आहेत की, अतिशय वाईट दिवसांत देखील इंग्लंडच्या प्रजेना तसे कर दिल्याचे त्यांस स्मरत नाही. + आणि दुसरें न्याय हा फार महाग झाला आहे. न्याय फार लवकर आणि अतिशय कमी खर्चाने मिळाला पाहिजे. हें ने न्यायाचे मूलतत्व आहे ते तर कायदे करणार जसे काय अगदीच विसरून गेले आहेत; आणि राज्यकारभाराची पद्धत अशी आहे की, राज्यकर्त्याच्या हितास कांहीएक उणेपणा न येऊ देतां त्यांत जें कांही प्रजेचे हित होईल तेवढे मात्र करावयाचें. They are poor to an extremity of poverty of which the poorest class in this country has no conception, and to which it affords no kind of parallel. They are over- taxed to a degree of which in the worst days of taxation in this country knowledge. ( Public Adresses by John Bright, Page 499.) Next to the care of religion, one of the principal duties of a you had no nation relates to justice. They ought to employ their utmost attention in causing it to prevail in the state and to take proper measures for having it dispensed to every one in the most certain, the most speedy, and the least burthensome manner. (Vattel's Law of Nations, Book I, Chapter XIII., Page 76.)