पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेब यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुणविवेचन. (२१) प्रजेच्या मानण्यावर आहे. राजांनी हे चांगले ध्यानांत धरून ठेविले पाहिजे कीं, आंग सामर्थ्य हे प्रजेच्याच आंगी आहे. कितीका पुरातन आणि बळकट राज्य असेना ते जमिन- दोस्त करण्यासाठी प्रजेच्या सामर्थ्यास हालवून जागृत करण्याची मात्र गरज आहे, यासाठी राजाने प्रजेशी परम आदराने वागले पाहिजे आणि त्यांचे म्हणणे काय आहे याविषयीं बारीक विचार करून त्याची व्यवस्था मोठ्या भीडमुलाजाने व सावधगिरीने केली पाहिजे, याप्रमाणें प्रजेची शक्ति आहे, त्यांस* आपण जुलूम आणि बलात्काराबद्दल प्रतिक्रिया करूं देत नाहीं, हे टकर साहेब यांचे म्हणणे केवळ विसंगत दिसते. मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील उदाहरण घेऊन विचार केला असतां देखील आपणास असें कळून येईल की, त्यांच्या अमलांत असा प्रजेवर जुलूम मुळींच झाला नव्हता की प्रजेने राजावर फंद फितूर करण्यास उठावे. + प्रजा आपले राजाविषयीं गाऱ्हाणे सांगते, परंतु राजाच्या भाज्ञा खरोखर पाळीत आहे त्या प्रजेस फितूर उठविण्याविषयीं उत्तेजन देणे हा मोठा अपराध आहे. कर्नल फेर यांनी मल्हारराव महाराज यांच्या सरदारांस व प्रजेस फितूर उठविण्याविषयी स्पष्ट शब्दोच्चार करून सांगितले नाही इतकेंच आमचे म्हणणे नाहीं, परंतु गर्भित रीतीने त्यानी त्यांस उत्तेजन दिले असे देखील आम्ही म्हणत नाहीं, परंतु त्यांचे वर्तन असे कांहीं चमत्कारिक होतें कीं, अविचारी लोकांस दंगा करण्यास प्रत्यक्ष सल्ला दिल्याप्रमाणे त्या वर्तनाचा परिणाम व्हावा, मल्हारराव महाराज यांच्या जुलमामुळे प्रजा इतकी त्रासली आहे कीं, त्या योगाने एक मोठा दंगा उत्पन्न होईल, आणि तेणेंकरून गुजरातील इंग्रज सरकारच्या मुलखास व त्यांच्या आश्रयाखालील संस्थानास अविचारी लोकांस उपद्रव होण्याचा संभव आहे असे प्रसिद्धपर्णे म्हणणे हे अविचारी लोकांस दंगाव फितूर करण्याविषयीं सूचना देण्याप्रमाणे नव्हें कीं काय ? मुंबई सरकारानी देखील कर्नल फेर यांच्याद्वारे मल्हारराव यांस कळविले होते की, तुम्ही जर न्यायानें राज्य करणार नाहीं तर तुमचे जीवित, तुमची अब्रू आणि तुमचे राज्य सुरक्षित ठेवण्यास इंग्रज सरकार बांधले गेले नाहीत. मुंबई सरकार यानी मल्हारराव महाराज यांच्या जीविताविषयी देखील औदासिन्य स्वीकारले होते, असें करण्यांत त्यानी पराकाष्ठेचा अविचार केला होता. ते मानतात असा मल्हारराव महाराज वाईट राजा होता

  • When we practically restrain to repress oppression and tyranny. (Blue Book, Page 70, article 22. )

It is a violation of the law of nations to invite those subjects to revolt who actually pay obedience to their sovereign, though they complain of his government, (Vattel's Law of Nations, Book II, Chapter IV., Page 156.). The monstrous and absurd doctrine, that a private person is permitted to kill a bad prince, deprived the French, in the beginning of the last century, of a hero who was truly the father of his people. (See Vattel's Law of Nations, Book I, Chapter IV., Section V., Page 17,) ४