पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. व जन समूहांत राहण्यापासून जे मोठे नफे आहेत त्यांचा उपभोग घेण्यासाठी प्रजेनी सोसले पाहिजेत असा न्याय आहे. प्रजेला सोसवणार नाहीत असे त्यांजवर राजांनी जुलूम केले असतां त्यांची राज्ये कधी- ही कायम ठेवू शकणार नाहींत प्रजेचा त्याविषयी एकदां निग्रह झाला म्हणजे पुरें मग त्यांस युद्धोपयोगी साहित्याची देखील गरज नाहीं. जुलूम आणि बलात्कार यांजपासून मुक्त होण्याची सत्ता प्रजेच्या हातात आपण राहूं दिली नाही यामुळे राज्यांतील स्वाभाविक दाब कमी झाला आहे, हें टकरसाहेबांचे म्हणणे अभिमानमूलक व चुकीचें आहे. म. जेची स्वाभाविक आणि कधीही हरण करतां न येणारी शक्ति त्यानी कशी हरण करून घेतली आहे हे आपणास कळत नाहीं. या आमच्या म्हणण्यास एक मोठे प्रमाण आहे, आणि तें अशा तशा सामान्य लेखांत नाहीं. राणीसाहेब यांच्या सन १८५८ च्या सालांतील जाहिरनाम्यास हिंदुस्थानचा म्या- गना च्यारटा ह्मणतात त्यांत आहे. 59 " त्यांचा संतोष तीच आमच्या राज्याची मजबुती. असे त्या जाहिरनाम्याच्या शे- एक वाक्य आहे. इंग्लिश राष्ट्रासारख्या प्रबळ राष्ट्रास देखील ही गोष्ट मान्य आहे की, प्रजेचा संतोष नसेल तर राजाचा टिकाव कधीही लागणार नाहीं. मग आमच्या देशांतील देशी राजांची प्रजा त्यांजवर असंतुष्ट झाली असतां त्यांची राज्ये टिकतील असें तर स्वप्न देखील आणण्यास नको. खरोखर या जगावर इंग्लिश राष्ट्रासारखे थोर मनाचे राष्ट्र कोणतेही नाहीं अशीं आ- पणास अनेक प्रमाणें सांपडतात. हा जाहिरनामा ज्या राज्यनीति विशारद पुरुषाच्या सल्ला मसलतीने राणी साहेब यानी प्रसिद्ध केला, त्यानी या हिंदुस्थानच्या राजेरजवाड्यांवर व ब्रिटिश सरकारच्या अधिकाराखालच्या मुलुखांतील प्रजेवर किती मोठे उपकार केले आहेत त्याचें वर्णन देखल करतां येत नाहीं. या जाहिरनाम्याची भाषा अशी कांहीं सुंदर आहे कीं, त्यांत भ्रांतीवट अथवा द्वयर्थी असा एकही शब्द नाहीं. हिंदुस्थानवासी लोकांच्या वास्तवीक हक्कांचे जितके स्पष्टीकरण करणे योग्य होते तितकें त्यांत केलें आहे. हा जाहिरनामा हिंदुस्थानांतील राजेरजवाडे यांस आणि प्रजेस जीविताप्रमाणे प्रिय आहे. जो लेख वारंवार लोकांच्या नजरेपुढे येणारा, ज्याचे आयुष्य फार दीर्घ, प्रत्येक मनुष्यास त्यांत काय लिहिले आहे त्याचे शब्दशः ज्ञान करून घेण्याची उत्कट इच्छा अशा प्रका- रच्या राजकीय लेखांत 'तुमचा संतोष तोपर्यंतच आमचे राज्य' अशा अर्थाचें वाक्य लि- हिर्णे ही त्या राष्ट्राची केवढी थोरवी. प्रजेचा संतोष ठेवणें हेंच आपले कर्तव्य कर्म असे ज्या राष्ट्राच्या मनांत पक्के भरले असेल त्यासच असे प्रसिद्धपणे बोलतां येईल.

  • लिमपेली या ग्रंथकाराने एके ठिकाणी असे म्हटले आहे कीं, राज्याधिकार हा
  • Yet civil Governors learn hence to respect their subjects; let them be admo- nished that the physical strength, resides in the governed; that this strength wants only to be felt and roused, to lay prostrate the most ancient and confirmed dominion that civil authority is founded in opinion; that general opinion, therefore ought always (to be treated with deferences and managed with delicacy and circumspection. Paley's works, Page 622,)