पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करसाहेब यांच्या मिनिटाविषयीं गणावगणविवेचन. ( १९ ) वलेल्या बंडाची शांति करण्यासाठी देखील इंग्रज सरकारांनी मदत केली पाहिजे असा मुळीच करार केलेला नाहीं व असा कधीं प्रसंगही आला नाहीं. आमची अशी पूर्ण खात्री आहे कीं, इंग्रज सरकारांनी गायकवाड सरकारास त्यांच्या आंतील राज्य व्यवस्थेच्या संबंधानें जेव्हां जेव्हां मदत केली आहे तेव्हां तेव्हां त्यानी तहनाम्यांतील अटींकडे पूर्ण लक्ष्य दिले आहे, आणि यावरून असे सहजच सिद्ध होते कीं, गायकवाड सरकारानी प्रजेवर असा जुलूम कधींही गुजरला नाहीं कीं, त्या प्रसंगी आम्ही सहाय्य करीत नाहीं असे इंग्रज सररकारास म्हणतां आलें असतें. गायकवाडांच्या वंशामध्ये जे राजे झाले त्यांमध्ये मल्हारराव महाराज यांची राज्य सर्वांहून वाईट होती; परंतु त्यांच्या अमलांत तरी असे कोणते दंगे उद्भवले होते कीं, दाबून टाकण्याकरितां इंग्रज सरकारास परिश्रम करावे लागले. इंग्रज सरकारच्या दाबा- मुळे कोणी दंगे करण्यास धजले नाहीत असे म्हणावे तर इंग्रज सरकारच्या तर्फे महारा- जांस असें देखील कळविलें होतें कीं, तुम्ही अनीतीने राज्य कराल तर त्यापासून उद्भ- वलेल्या दंग्यांपासून तुमचें जीवित, अब्रू आणि राज्य संरक्षण करण्यास इंग्रज सरकार बां- धले गेले नाही.* याप्रमाणे बडोद्याच्या राजा अन्यायवर्ती झाला असतां त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपण पतकरली नाहीं, ही गोष्ट इंग्रज सरकारांनी ध्यानांत धरून वर लिहिल्याप्रमाणें सूचना केली असतां आपल्या मताच्या दाढर्यार्थ टकरसाहेब यानी इंग्रज सरकारच्या राज्यनीतीवर उगीच मिथ्यारोप आणिला आहे कीं, त्यानी आपल्या आश्रयांतील राजांबरोबर मागील वर्तनांत निर्बल आणि दुष्ट राजांविषयीं विशेष कारुण्य दाखविले अ- सून त्या राष्ट्रांतील रहिवासी लोकांच्या हिताकडे अगदीच दुर्लक्ष्य केलें होतें. अद्यापपर्यंत अशी राज्य कारभाराची रीति शोधून काढतां आली नाहीं कीं, प्रजेस गाऱ्हाणें सांगण्यास जागा नाहीं. इंग्लंडमध्ये तीन राज्यपद्धतींचें एकीकरण करून राज्य- व्यवस्थेचे नियम केले आहेत तेथे देखील प्रजेची कुरकूर आहेच. तेव्हां राज्यसत्ताक राजाच्या प्रजेस गाऱ्हाणी सांगण्यास पुष्कळ जागा असतील यांत तें नवल काय आणि त्यांत आमच्या देशांतील राजांचीं राज्ये बोलून चालून एक राजसत्ताक आहेत.

+ यास्तव बुद्धिपुरःसर जुलूम केला आहे की काय, याविषयीं संशय आहे व बुद्धिपुरः- सर जुलूम केला आहे हे सिद्ध आहे; परंतु तो सह्य आहे तर अशा प्रकारचे जुलूम राजाच्या प्रजेनी सहनशीलपणाने सोसले पाहिजेत : कारण न्यायाधिशाच्या निवाड्यावर अवलंबून राहण्याविषयीं एक वेळा कबूल केल्यावर आपणास आपल्या हक्काबद्दल न्याया- धीश होऊन बसतां येत नाहीं. यासाठी संशयीत जुलमावद्दल रयतेस कांहीं बोलण्याचा हक्क नाहीं आणि दुसऱ्या प्रकारचे जुलूम, राष्ट्रामध्ये शांति आणि सुरक्षीतपणा राहण्यासाठीं

  • पहा ब्ल्यु बुक नंबर १ पान

A subject ought patiently to suffer from the prince doubtful wrongs and wrongs that are supportable; the former, because whoever has submitted to the de- cision of a judge, is no longer capable of deciding his own pretensions; and as to those that are supportable, they ought to be sacrificed to the peace and safety of the state, on account of the great advantages obtained by living in society. (Vattel's Law of Nations, Book I, Chapter IV., Page 22.)