पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. बल्लाळ रानडे याणी आपल्या सह्यानिशी असा अभिप्राय दिला की, भाऊ शिंदे यांजवर अपराध शाबीत आहे, सबब त्याबद्दल त्यांस सात वर्षेपर्यंत कैदेत ठेवावे.

महाराजांचे मर्जीप्रमाणे कामगार मंडळीनों भाऊ शिंदे यांजवर आरोप तर शाबीत करून दिला, परंतु शिक्षा अमलांत आणण्यासाठी कर्नल बार साहेब यांच्या अनुमताची अपेक्षा होती ती कांहीं केल्या काही दिवसपर्यंत मिळाली नाही. या वेळेस गोपाळराव मैराळ दिवाण झाले होते, व त्याणी बार साहेब यांचे अनुमत मिळवावे असा मल्हारराव यांचा आग्रह होता. शेवर्टी मल्हारराव यांचे अति दुराग्रहामुळे बार साहेब यांनी दोन महिन्याची साधी कैद द्यावी असा रुकार दिला. असे ह्मगतात की, बार साहेबांचा रुकार मिळाला हे वर्तमान मल्हारराव महाराज यांस सांगितल्याबरोबर त्याणी पुढे आलेले ताट एकीकडे सारले, आणि लागलीच भाऊ शिंदे यांस त्यांचे घराहून फौजदारी कचेरीत आणिले. तेथें त्यांचे पायांत बिडया घालून व त्यांस उघडे बोडके करून राजवाडयासमोर आणून त्याचे दंडास काढण्या बांधल्या. त्या दुर्दैवी प्राण्याची ही विटंबना पाहण्यास मल्हारराव महाराज आपले मंडळीसह सज्यांत बसले होते, व जासूद पाठवून शहरवासी लोकांस त्यांची धिंड फजिती पाहण्यासाठी बाजारांत एकत्र करविले होते, असे म्हणतात कीं, मल्हारराव महाराज याणी त्यांची अतिशय निर्भत्सना करवून त्यांस जेव्हां तुरुंगांत नेण्याचा हुकूम केला तेव्हां भाऊ शिंदे याणी महाराजांस मुजरा करून त्या यमसदनरूप तुंरु- गाची वाट धरली. खंडेराव महाराज यांचे कारकीर्दीत भाऊ शिंदे यांचे वैभवांत आणि राजाचे वैभवांत फारसे अंतर नवतें. त्या मनुष्याची मल्हारराव याण अशा प्रकारची विटंबना केली हें पाहून शहरवासी लोकांस अतिशय वाईट वाटले. भाऊ शिंदे यांचे कूळ साधारण होते व ते पूर्व स्थितीत किल्लेदार यांचे पागेतील हवालदार होते. खंडेराव महाराज यांचा व त्यांचा पूर्वीचा स्नेह होता त्यामुळे खंडेराव महाराज याणी आपण गादीनशीन झाल्यावर त्यांस वैभवास चढविले. जेव्हां त्यांस सेनापतीचा अधिकार दिला तेव्हां त्यांचे ऐश्वर्याची सीमा झाली. त्यांचा स्वभाव आनंदी व मनस्वी उदार होता व त्यांच्यांत आगत स्वागत करण्याची रीत फार उत्तम होती. ते सर्वांबरोबर विनयानें वागत असत व कोणाचेही आपले हातून बरे व्हावे यासाठी ते राजाजवळ व दिवाणाजवळ आपली सक्त भीड खर्चीत. या त्यांच्या गुणाने ते फारच लोकप्रिय झाले होते. दिमाखानें बागण्याची त्यांस फार आवड असे. त्याणी उत्तम वस्तूंचा संग्रह केला

  • सुदैवानें ह्मणा किंवा कारस्थानानें लणा. मल्हारराव महाराजांच्या दरबारांतील जे कामदार

लोक इंग्रज सरकारच्या खपा मर्जीस पात्र झाले नाहींत त्यांस आपल्या शहाणपणाचा आणि पवित्रपणाचा खुशाल डौल मारून पुरुषार्थ मिरवूं द्या, पण त्यानीं व सर्वांनी ही गोष्ट पूर्णपणें लक्षांत ठेविली पाहिजे कीं, जेथें राजाचीच सत्ता प्रमाण आहे त्या राज्यांतील कामगार लोकांस राजाच्या' मर्जीप्रमाणे वागलंच पाहिजे. भाऊ शिंदे यांनों पागेच्या नेमणुकांत कांहीं रुपये खाल्ले होते असें मानलें तरी त्याजवर त्यास सात वर्षांच्या कैदेची शिक्षा देण्याविषयी कामगार लोकांनीं अभिप्राय द्यावा काय ? मल्हारराव महाराज येवढे न्यायी होते तर त्याणी खानवेलकर यांस कां शासन के लें नाहीं? सारांश सत्तेपुढे शहाणपण नाहीं हेंच खरें.