पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. इमानीपणावर आहे, आणि इमानी सत्यप्रतिज्ञा, आणि न्यायी अशा राष्ट्रांवर विश्वास ठेवून त्यानी आपल्या माना त्यांच्या हातांत दिल्या आहेत. त्या राष्ट्राने जर असें मनांत आ. णिलें कीं, आतां आपणास हिंदुस्थानांत प्रतिबंध करणारा कोणी उरला नाहीं, यासाठी तहनामे आणि वचने मोडली असतां आपणास काही अपाय होण्याचे भय नाहीं तर देशों राज्ये लवकरच लयास जातील; कारण कीं, देशी राज्यांतील प्रजेपेक्षां आमच्या राज्यांतील प्रजा विशेष सुखी आहे असे त्यांचे अभिमान पूर्वक म्हणणे असून हिंदुस्थानांतील एक- दर प्रजेचें कल्याण करण्याकरितां नेटिव राजांच्या राज्यकारभारांत हात घालण्याचा आम्हास हक्क प्राप्त झाला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. तेव्हां हिंदुस्थानवासी लोकांचे एकसा- रखें कल्याण करण्याकरितां देशी राजांची राज्ये निर्मूळ केली पाहिजेत. याच पंथावर शेवटी गोष्ट येणार. यास्तव आमचे असे म्हणणे आहे की, जर ब्रिटिश सरकारास देशी राजांची राज्ये कायम ठेवण्याची इच्छा आहे तर त्यानी त्यांजबरोबर केलेले करारमदार आणि दिलेली वचने अक्षरशहा पाळली पाहिजेत, आणि यांतच त्यांस लाभ, यश आणि कीर्ति प्राप्त होईल. देशी राजांबरोबर केलेले तहनामे मोडले असतां इंग्रज सरकारास तो कोणता अ व्हावयाचा आहे, आणि त्यांतही ते कांही आपला स्वार्थ साधण्यासाठी तहनामे मोडीत नाहींत. देशी राजांच्या प्रजेचे हित करावे हा मुख्य उद्देश आहे असे कोणी म्हणेल तर त्याजवर आमचे उत्तर असे आहे की, कोणत्याही कृत्यांत कांहीं स्वार्य असल्यावांचून कोणी कधीही त्या कृत्यास प्रवृत्त होणार नाहीं. स्वार्थाचे प्रकार मात्र निराळे आहेत. आणि कांहीं गोष्टी अशा आहेत की, प्रथम दर्शनी त्या लाभास्पद दिसतात व त्यापासून कांहीं अपाय होईल असे वाटत नाहीं, परंतु भावी परिणाम फार वाईट असतात. यावि- षयीं लार्ड मेकाले यांचे म्हणणे फार लक्ष्यांत ठेविण्यासारखे आहे. ते म्हणतात की, एकाद्या व्यक्तीने केलेला करार मोडून अथवा दिलेल्या वचनांचा भंग करून कांही अर्थ साधला तर तो त्यांस पचेल, परंतु तशी स्थिति राष्ट्राची नाहीं. त्याचे आयुष्य दीर्घ असल्यामुळे त्यांस लांबवर दृष्टी दिली पाहिजे. जुलूम आणि बलात्कार याजपासून मुक्त होण्याची सत्ता आपण देशी राजाच्या प्रजेच्या हातांत ठेविली नाहीं असें टकरसाहेब याणी लिहिले आहे. या म्हणण्याचा भावार्थ असा दिसतो कीं, गायकवाड सरकारच्या प्रजेनी कांहीं फंद फितूर केला असतां इंग्रज सरकारानी गायकवाडांस सहाय्य करावे असा करार केला आहे. यामुळे जुलूम आणि बलात्कार याजपासून मुक्त होण्याची शक्ती प्रजेमध्ये राहिली नाहीं. परंतु इंग्रज सरकारानी केलेले करारच मुळीं तसे नाहींत. तारिख ६ जून सन १८०२ च्या तहनाम्यांतील एके कलमांत असे लिहिलें आहे की, ईस्ट इंडिया कंपनी गायकवाड सरकारास सर्व राजकीय कामामध्ये न्यायाला अनुलक्षून देशाच्या कल्याणासाठी मदत व आश्रय देईल, गायकवाड सरकारास कोणत्या प्रसंगी इंग्रज सरकारानी मदत करावी, याचा वरील तहनाम्यांत स्पष्ट उलगडा केला आहे, गायकवाड सरकारच्या अघोर पातकापासून उद्भ