पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेब यांच्या मिनिटा विषयों गुणावगुणविवेचन. (१७) इतक्या कठोर शब्दांचा उपयोग केला आहे कीं, त्यांतील तात्पर्य देखील येथे लिहिलें असतां ब्रिटिश राष्ट्राची आम्ही अमर्यादा केली असा दोष आपलेकडेस येईल की काय यावरून तहनामे आणि दिलेली वचने मांडणे किती अन्यायास्पद याचें भय वाटतें. आहे ते पहा. 1 टकरसाहेब यांचे म्हणणे असे आहे की, देशी राजांच्या प्रजेच्या हितासाठी व राजांचीं राज्ये टिकावी यासाठी आपणास त्यांच्या आंतील राज्यकारभारांत मध्यस्थी करावयाची आहे, सबब त्या कारणाने तहनामे आणि वचने मोडलीं असतां आपल्यास कोणी दोष देणार नाही. देशी राजांच्या प्रजेचें हित व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. आमचें असें मुळींच म्हणणे नाहीं कीं, राजानें तिजवर हवे तसे जुलूम करावे, आणि तिने ते निमुटपणे सोसावें, परंतु प्रजेचें हित साधण्याकरितां तहनामे आणि दिलेली वचने मोडलीच पाहिजेत असें जें म्हणणें आहे ते आम्हास अनुमत नाहीं. यापासून काय अनर्थापात होणार आहे आम्हास आन डोळ्यांसमोर दिसते. राष्ट्रांचे हक्क, त्यांची सत्ता आणि त्यांचे सामर्थ्य जे कांहीं अवशेष ठेविलें आहे तें कायम राखून प्रजेचे हित करतां येईल असे जे कांहीं उपाय असतील ते योजावे अशी आमची इच्छा आहे, आणि तसे घडवून आणण्यास दुसरे उपाय मुळीच नाहीत असेही नाहीं. आणखी आम्ही दृढ निश्चयाने असे सांगतों कीं, देशी राजांच्या प्रजेस देखील असें आवडत नाहीं कीं, त्यांच्या राजांची सर्व सत्ता रेसिडेंटाकडे व दिवाण यांचे हातांत देऊन त्यांच्या राजास बाहुल्याप्रमाणे करून ठेवावे; आणि दकरसा- हेब यांच्या मिनिटास जोडलेल्या मसुद्याचा झोक तर अगदी तसा आहे. आपणास कोणी शासन करील असें ज्यास भय नाहीं, आणि जुलूम करण्याची शक्ति आहे तर त्यास जुलूम करण्याची इच्छा आहे व त्याच्या मनाचा झोक तसा आहे अशी हमेशा बहुतकरून कल्पना करण्यांत येते हें मनुष्य प्राण्याचे मोठे दुर्दैव आहे. आज ही गोष्ट निर्विवाद कबूल आहे की, इंग्रज सरकार या देशांतील राजे रजवाडे यांची राज्ये व संस्थाने यांचा लय करण्याचे मनांत आणितील तर त्यांस शस्त्र धरून प्रति- बंध करण्यास शक्तिमान असा राजा या देशांत उरला नाहीं. फक्त त्यांजपाशीं काय ते तहनामे आणि त्यांस मिळालेली वचने हीच काय ती त्यांच्या बचवाची साधने आहेत. ती जर आज त्यांजपासून हरण करून घेतली तर त्यांची राज्ये टिकणार कोणत्या अधारावर ? हळू हळू एकसत्ताक राजांचे अधिकार कमी केले पाहिजेत, असें म्हणणे या देशांतील सर्वदेशी राज्ये हळू हळू लयास नेली पाहिजेत, असे म्हणण्याच्या परिणामावर शे- वटी गोष्ट येणार. आमच्या देशांतील राजे रजवाडे यांच्या राज्याचा आधार काय तो इंग्रज सरकारच्या (मागील पृष्ठावरून.) As all nations are interested in maintaining the faith of treaties, and causing it to be every where considered as sacred and inviolable, so likewise they are justi- fiable in forming a confideracy for the purpose of repressing him who testifies a dis- regard for it,-who openly sports with it,-who violates and tramples it under foot, ( Vattel's Law of Nations, Book II, Chapter XV., Page 229.)