पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आहे की, तसे करण्याचा इंग्रज सरकारास हक्क नसून आजपर्यंत तसा हक्क त्यांनी सांगितला देखील नव्हता पण त्याहून उलट असे वारंवार बोलून दाखविलें होतें कीं, आपणास गायकवा- डांच्या आंतील राज्यकारभारांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाहीं. इंग्रज सरकारास जर गायकवाडांच्या आंतील राज्यकारभारांत हात घालण्याचा हक्क प्राप्त झाला नाहीं तर मग त्याजबरोबर केलेले तहनामे बाजूस ठेवून बेधडक आपण राज्यकारभारांत हात घालावा हे टकर साहेब यांचे म्हणणे वाजवी कसे होईल. तहनामे आणि दिलेलीं वचने मोडण्याचे प्रसंग आहेत, परंतु एका पक्षकाराने तहना- म्यांतील कराराचे उल्लंघन केल्यावांचून दुसऱ्या पक्षकारास तहनामे अथवा त्यांतील अमुक करार रद्द आहेत असे म्हणतां येत नाहीं. गायकवाड सरकार तहनाम्यांतील सर्व करार मोठ्या तत्परतेने पाळीत असतां त्यांचा राज्यकारभार चांगला चालत नाहीं या निमित्ताने तहनामा मोडणें मोठें विलक्षण दिसते. एकंदरीने आमची अशी दृढ समजूत आहे की, तहनाम्यांतील एका पक्षकाराने दुसऱ्या पक्षकारास कांहीं उपद्रव दिल्यावांचून व त्या तहनाम्यांतील शर्तींकडे अलक्ष्य केल्यावांचून दुसन्या पक्षकारास तहनाम्यांतील करारापासून व दिलेल्या वचनापासून कधींही पराङ्मुख होता येत नाही. तहनामे व दिलेली वचने मोडणें हैं एक मोठे पातक मानिले आहे. राष्ट्रांनी परस्परांशी कसे वागावे याबद्दल युरोपांतील महापंडितांनी ग्रंथ केले आहेत, त्यापैकीं व्हाटेलकृत राष्ट्राच्या धर्मशास्त्राचा तहनामे व वचने मोडणारावर मोठा कटाक्ष आहे. त्यानी असे म्हटले आहे की, * राष्ट्रांनी आणि त्यांचा राज्यकारभार चालविणारांनी तहनामे आणि दिलेली वचने मोठ्या दक्षतेने पाळली पाहिजेत, राजकीय व्यवहारांत या गोष्टीकडे वारंवार जरी दुर्लक्ष्य करण्यांत येते तरी त्यांचे महत्व सर्व राष्ट्रास मान्य आहे. बेइमानी- पणाबद्दल राजांची निर्भर्त्सना केली म्हणजे त्यांस आपला अतिशय अपमान केला असे वाटते; परंतु जो आपले इमान मोडतो तो खरोखर बेइमानी होय. दिलेली वचनें पाळण्याने जशी राष्ट्राची अब्रू वाढते व त्यास वैभव प्राप्त होते तसे कोणत्याही गोष्टीनें वैभव वाढत नाहीं व त्यास अब्रू मिळत नाहीं. + या धर्मशास्त्रांत कितीएक ठिकाणी तहनामे आणि वचने मोडणाराविषयीं लिहितांना

  • Nations, therefore, and their conductors, ought inviolably to observe their promises and their treaties. This great truth, though so often neglected in practice, is generally acknowledged by all nations: The reproach of perfidy is esteemed by so- vereigns a most atrocious affront; yet he who does not observe a treaty, is certainly perfidious, since he violates his faith. On the contrary, nothing adds so great a glory to a prince, and to the nation he governs, as the reputation of an inviolable fidelity in the performance of promises. (Vattel's Law of Nation, Chapter XII,, Book II., Page 196),

+He who violates his treaties, violates at the same time the law of nations, for he disregards the faith of treaties,-that faith which the law of nations declares sacred; and, so far as depends on him, he renders it yain and ineffectual. Doubly guilty, he does an injury to all his ally, he does an injury to all nations, and inflicts a wound on the great society of mankind. "On the observance and execution of treaties," said a respectable sovereign, "depends all the security which princes and states have with respect each other: and no dependence could hence forward be placed in future conventions, if the existing ones were not to be observed, " (पुढे चालू.)