पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करसाहेव यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुणविवेचन. (१५) १८०१ चें पत्र मारकीस वेल्स्ली यांनी सीक्रेट कमेटीस तारीख १४ नवंबर सन लिहिले आहे, त्यांत तहनाम्यांतील सहावे कलमापासून कंपनी सरकारास वजिराकडे जो मुलख राहूं दिला त्यांतील राज्यव्यवस्थेमध्ये दरम्यानगिरी करण्यास पूर्ण हक्क प्राप्त झाला आहे म्हणून लिहिले आहे.* यावरून स्पष्ट होतें कीं, मुद्दाम करार करून घेतल्यावांचून परकीय राष्ट्रास दुसऱ्या राष्ट्राच्या राज्यकारभांत हात घालण्याचा मुळींच हक्क प्राप्त होत नाहीं. आतां दोन्ही राष्ट्रांमध्ये चालू वहिवाट कोणत्या प्रकारची आहे, व त्यावरून इंग्रज सरकारास जरूरीच्या प्रसंगी गायकवाड सरकारच्या राज्यकारभारांत मध्यस्थी करण्याचा हक्क प्राप्त होतो की काय याविषयीं विचार केला पाहिजे. कारण जर एकाद्या बलिट राजाने निर्बळ राष्ट्राच्या आंतील राज्यव्यवस्थेत ढवळा- ढवळ केली, आणि त्याबद्दल त्याने ज्या वेळेस तक्रार करण्याची त्या वेळेस पूर्ण मौन्य धरिलें तर तो सोसिकपणा कांही काळांतराने गर्भित मान्यतेच्या रूपास येतो, आणि तेणेकरून जबरदस्ताचा जेरदस्तावर एक कायदेशीर हक्क उत्पन्न होतो. वाद करण्याचा ज्याचा हक्क आहे त्यानें स्वस्थ मौन्य धरल्यामुळे फार काळाच्या वहिवाटीने जर एकादा हक्क उत्पन्न होणार नाहीं तर मनुष्याच्या आणि त्यांत विशेषेकरून राष्ट्राच्या व्यवहारास दा कधीही येणार नाहीं. इंग्रज सरकारानी गायकवाड सरकारचे सावकारांस कर्जाचे फेडीबद्दल व इतर लोकांस त्यांच्या नेमणुकीबद्दल जामिनगिऱ्या पत्करल्या होत्या तोपर्यंत कांही काही प्रसंगी इंग्रज सरकार या राज्यांतील व्यवस्थेत देखरेख ठेववीत असत, परंतु ती गोष्ट देखील त्यांस मनापासून आवडली नाहीं. गायकवाडीच्या आंतील राज्यव्यवस्थेत दरम्यानगिरी कर- ण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून त्यानी कितीएक कामांत तर मुद्दाम कांहीं तरी सबब शोधून जामिनगिरींतून आपली मुक्तता करून घेतली, आणि गायकवाडांस अगदी स्वतंत्र केलें. अशा प्रकारची त्यांची पूर्वीची राजनीति होती, आणि गायकवाडांचा राज्यकारभार चांगला चालत नाहीं या सबबेने तर त्यानी कधीही मध्यस्थी · नव्हती, व गायकवाड सरकारास नेथे जेथें असें दिसून आले की, इंग्रज सरकारास तहनाम्याने जो हक्क प्राप्त झाला आहे त्याची मर्यादा सोडून त्यांचे अधिकारी आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये मध्यस्थीगिरी करूं पाहतात तेथें तेथें त्यानी ही तक्रार घेतलेली आहे. याप्रमाणे वहिवाटीवरून देखील गायकवाड सरकारच्या राज्यकारभारांत मध्यस्थी करण्याचा इंग्रज सरकारास हक्क प्राप्त झालेला नाही. केली तहनाम्याअन्वये इंग्रज सरकारचा आणि गायकवाड सरकारचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे व सार्वभौम नात्यानें, संरक्षक नात्याने आणि चालू वहिवाटीवरून इंग्रज सरका गायकवाड सरकारच्या आंतील राज्यकारभारांत हात घालण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे की काय याविषयीं पृथक पृथक विचार केल्यावरून आमची तर पक्की खात्री झाली Your honourable committee will further remark that by the operation of the 6th article of the treaty, the Company's Government has reserved the positive right of interference in the internal management of that part of the country retained by the Nabab Vazir. " (See the Despatches of Marquis Wallesley, K. C., Vol. II., Page 608, Section 13.)