पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आम्ही संरक्षक असा दावा करून बसावे. कराराने तसा संबंध स्थापित झाला असेल तर मात्र गोष्ट निराळी. त्रावणकोरच्या राजाबरोबर इंग्रज सरकारानों तारीख १२ जानेवारी सन १८०५ रोजी तहनामा केला त्यांतील करारावरून मात्र इंग्रज सरकार त्या संस्थानाचे संरक्षक होते असे म्हटले पाहिजे; कारण त्यति स्पष्ट असाच करार* आहे की, त्या राजाचे संस्थान इंग्रज सरकाराने संरक्षावे आणि राजाने इंग्रज सरकारास त्यांच्या राज्याच्या संरक्षणासाठी मदत करावी असा मुळींच करार नाहीं. आतां इंग्रज सरकार गायकवाड सरकारच्या राज्याचे व इतर देशी राजांच्या राज्यांचे संरक्षक असे गृहीत करून आमच्या देशी राजांच्या अतील राज्यव्यवस्थेत हात घालण्याचा इंग्रज सरकारास अधिकार येतो की काय हें पाहूं. एकादे राष्ट्र दुसऱ्याच्या जुलमापासून आपले संरक्षण करण्यास शक्त नसेल तेव्हां त्यास एकाया बलिष्ट राष्ट्राचा आश्रय करणे अवश्य आहे. त्याबद्दलच्या करारामध्ये त्याने आपले राज्य आपल्या इच्छेप्रमाणे चालविण्याचा आपला हक्क कायम ठेविला तर अशा प्रकारचा तहनामा फक्त संरक्षणाचा तहनामा होय. त्यापासून त्या आश्रय संपादन करणाराच्या राज्यकार भाराच्या हक्कास कांहीं बाध येत नाही. आणि मैत्रिकीच्या तहनाम्यामध्ये आणि अशा प्रकारच्या तहनाम्यामध्ये योग्यतेखेरीज कोणताही कमतरपणा नाहीं असा राष्ट्रांचे सर्व मान्य धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे आणि गायकवाड सरकार यानी आपल्या राज्याचा राज्यकारभार आपल्या इच्छेप्रमाणे चालविण्याचा हक्क आपलेकडेस राखून ठेविला आहे, याविषयीं तर तिळमात्रही भ्रांति नाही. + राज्याच्या आंतील राज्यकारभारांत परकीय राष्ट्रांस हात घालण्याचा अधिकार प्राप्त हो- प्यास तहनाम्यांत मुद्दाम तसा करार करून घेण्याची अवश्यकता आहे असे अयोध्येच्या वजिरापासून कंपनी सरकारानी सन १८०९ मध्ये तहनामा करून घेतला यावरून दिसते. या तहनाम्यांतील सहावे कलमांत असें लिहिलें आहे कीं, वजिराकडेस जो मुलूख दिला आहे त्यामधील राज्यकारभार वजिराने कंपनी सरकारच्या अम्मलदारांच्या सदासर्वदा - मसलती घेऊन तदनुरूप चालवावा. राहूं "The Honorable the East India Company Behaadur especially engaging to defend and protect the territories of the Maha Rajah Ram Rajah Behaudur of Travan- kore against al enemy whatever." (Minute and Correspondence of the Marquis of Wellesley, Page 638, Appendix, Volume 4.) † “ When a nation is not capable of preserving herself from result and oppres sin, she may procure the protection of a more powerful strength. * * * * But still reserving to herself the right of administering her own government at pleasure, it is a simple treaty of protection, that does not at all derogate from her sovereignty, and differs not from the ordinary treaties of alliance otherwise than as it creates a difference in the dignity of the contracting parties. " ( See Vattel's Law of Nations, Book I., Chapter XVI., Page 93, Section 192, ) "Ilis Excellency engages that he will establish in his reserve dominions such a system of administration (to be carried into effect by his own officers) as shall be conducive, to the prosperity of his subjects, and be calculated to secure the lives and property of the inhabitants, and His Excellency will always advice with and act in conformity to the Council of the officers of the said Honourable Campany." ( Seo the Despatches of Marquis Wallesley, K. O, Vol. II, Page 601, Article VI. )