पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेब यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुणविवेचन. (१३) जे कांहीं काम केले असेल ते इंग्रज सरकार गायकवाड सरकारचें संरक्षक या संबंधाचे नाहीं, आणि त्या फौजे खेरीज गायकवाड सरकारचे कामासाठी इंग्रज सरकारास आपली दुसरी फौज उपयोगास लावावी लागली असेल तर ( असा प्रसंग मुळीं आलाच नाहीं ) तहनाम्याने गायकवाड सरकारास हटकून हक्क सांगण्याचा अधिकार आला आहे, त्या संबंधाचे ते काम होय. त्यांत आपण कांहीं विशेष केले असे इंग्रज सरकारास मुळींच मानतां येत नाहीं व त्यावरून आम्ही संरक्षक आणि गायकवाड सरकार आमचे संरक्ष्य असा हक्क सांगतां येत नाहीं; कारण एकदा एकाने दुसऱ्या बरोबर करार केला म्हणजे त्या करारापासून विमुख होतां येत नाहीं. गायकवाड सरकारानी कराराप्रमाणे इंग्रज सरकारास सहाय्य करण्याचें नाकबूल केले तर त्यांजवर बलात्कार करून करार पुरा करविण्याचा जसा त्यांस अधिकार * आहे तसाच त्याबद्दल गायकवाड सरकार यांस हटकून हक्क सांगण्याचा अधिकार आहे. यांत आम्ही तुमचे संरक्षक असे म्हणण्यासारखे इंग्रज सरकार ज्यास्त ते कान करितात. इंग्रज सरकारास गायकवाडाच्या सहाय्याबद्दल पूर्ण हक्क प्राप्त झाला नव्हता त्यापूर्वी गायकवाडानीं त्यांस उत्तम प्रकारचे सहाय्य केलें होतें अशी प्रमाणे आहेत. बडोद्याचे पहिले रेसिडेंट कर्नल बाकर यानी गायकवाड सरकारापासून तहनामा करून घेतला त्याबद्दल मुंबई सरकारास ता० २३ एप्रिल सन १८०५ रोजी पत्र लिहिले होते, त्यावरून असे कळते कीं, इंग्रज सरकारांनी तहनाम्याच्या मसुद्यांत असे एक कलम लिहिले होते की, गायकवाड सरकारानी इंग्रज सरकारच्या मदतीसाठी गुजराथेच्या सिमे- बाहेर देखील आपली फौज पाठवावी ही आट गायकवाड सरकारच्या प्रधानाने कबूल केली नाहीं, कारण पैशासंबंधीं या राज्याची स्थीति चांगली नव्हती, म्हणून गुजरायेच्या सरहद्दीपर्यंत मात्र गायकवाडांनी इंग्रज सरकारच्या सहाय्यासाठी आपली फौज द्यावी असें ठरले. या संबंधाने कर्नल वाकर यानी आपल्या सरकारास हकीकत कळविताना असे लिहिलें होतें कीं, कायदेशीर कराराने गायकवाड सरकार सहाय्य करण्याविषयीं बांधले गेलें नव्हतें. तेव्हां देखील दोन उदाहरणाने आपल्या अनुभवास असे आणून दिले आहे कीं, इंग्रज सरकारच्या हिताविषय त्यांस मोठी कळकळ आहे, आणि आपण अशी खात्री ठेविली पाहिजे की, जेव्हां जेव्हां आपल्यास त्यांच्या मदतीची जरूर लागेल तेव्हां तेव्हा त्यांच्या अनुकुलतेप्रमाणे ते आपणास मदत करण्यास तयार रहातील. t वर जें निरूपण केलें आहे त्यावरून गायकवाडसरकार कराराने बांधले गेले नव्हते तेव्हां देखील त्यानी इंग्रज सरकारास मदत केली आणि परस्पर राष्ट्रांचे असे धर्मच आहेत, मनुष्यपणाला उचित त्याहून ज्यास्त असें तें काय करावे लागते, की त्याबद्दल कोणी "Treaties contain promises that are perfect and reciprocal. If one of the allies fails in his engagements, the other may compel him to fulfil them:-a perfect promise confers a right to do so." (Vattel's Law of Nation, Chapter XIII., Book II., Page 213). † “ ( 32 ) This sincerity of their attachment to the interest of the English Government and this readiness to afford the co-operation of their troops had evinced in two instances without the necessity of formal engagements, and we could not doubt their readiness to repeat their assistance whenever our occasions required " ( See the Despatches of the Marquis of Wallesley, K. C., Volume IV., Page 593. ) ३.