पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सरकारच्या राज्यास उपद्रव न देतां देशी राजांच्या राज्यावर हल्ला करील हाही संभव नाहीं. परदेशांतील शत्रुंपासून आपले राज्य संरक्षण करण्याकरितां जें कांहीं इंग्रज सरकारास करावे लागतें त्याजबरोबर अनावासें आमच्या देशांतील राजांची राज्ये उपद्रव- रहित आहेत, तेव्हां आम्ही संरक्षक आणि या देशांतील राजे आमचे संरक्षिप असे इंग्रज सरकारास कोणत्या प्रमाणाने म्हणतां येते ते समजत नाहीं. आतां तहनाम्याअन्वये इंग्रज सरकार आणि देशी राजे यांचा अन्योन्य संबंध कोणत्या प्रकारचा आहे याविषयीं विचार करून पाहिले तर त्यावरून देखील इंग्रज सरकार गाय- कवाड सरकारचें संरक्षक आणि गायकवाड संरक्ष्य असा संबंध दिसत नाही. तारीख २१ एप्रिल सन १८०५ रोजी इंग्रज सरकार यानी गायकवाड सरकार यांजबरोबर तहनामा केला आहे त्यांतील दहाव्या कलमाच्या आरंभींच असे लिहिले आहे की, * तहनामा करणार पक्षकार मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांचे संरक्षण आणि बचाव करण्यास बांधले गेले आहेत. या तहनाम्यांतील वाक्यरचनेवरून व यानंतर जे तहनामे झाले आहेत त्यांतील वाक्यरचनेवरून ब्रिटिश सरकार गायकवाड सरकारचें संरक्षक असा भाव तर कोठेही आढळत नाहीं. गायकवाड सरकारचे इंग्रज सरकाराबरोबर परम मित्रत्वाचे नाते आहे हे मात्र तहनाम्यावरून अगदी स्पष्ट आहे, आणि तहनाम्यांतील शब्दार्याप्रमाणे परस्पराचे परस्पर संरक्षक आणि संरक्ष्य असा संबंध दोन्हीकडे सारख्या लागू आहे. गायकवाड सरकारानी इंग्रज सरकारची सबसिडियरी फौज आपल्या चाकरीस ठेविली आहे, त्या संबंधाने गायकवाड सरकारचे आम्ही संरक्षक असे तर इंग्रज सरकारास मुळींच म्हणतां येत नाहीं. पूर्वी एका राजाने दुसऱ्या राजास लढाईचे प्रसंगी पैशाची मदत करणे यास सबसिडी म्हणत असत. आतां कांहीं पैका घेऊन अथवा त्याबद्दल मुलूख तोडून घेऊन एक राजा दुसऱ्या राजाची फौज आपल्या चाकरीस ठेवितो त्यास सब सिडियरी फौज म्हणतात. प्रस्तुत विषय गायकवाडांच्या संबंधाने आहे आणि आपण जी वाटाघाट करीत आहो ती त्यांजबरोबर केलेल्या तहनाम्यावरून जो संबंध स्थापित झाला आहे त्याविषयी आहे. त्या तहनाम्याच्या वर्गांत ज्या संस्थानिकांचे तहनामे येत नाहीत त्याजविषयीं आपण मुळींच विचार करीत नाहीं. अर्थात इतर प्रकारच्या तहनाम्यावरून इंग्रज सरकार संरक्षक आणि ते संस्थानिक संरक्ष्य असा अन्योन्य संबंध असेल तर त्याविरुद्ध आपण कांहीं वाटाघाट करीत नाहीं हे स्पष्टच आहे. गायकवाड सरकारच्या राज्याच्या संरक्षणासाठी इंग्रज सरकारच्या सबसिडियरी फौजेने

"In as much as, by the present treaty the contracting parties are bound in an alliance for mutual defence and protection." (Minutes and Correspondence of the Marquis of Wellesley, K. C., Appendix I., Page 643.) "Sometimes this succour from a potentate who does not directly take part in the war, consists in money: and then it is called a snbsidy. This term is now of- ten taken in another sense, and signifies a sum of money annually paid by one sovereign to another in return for a body of troops, which the latter furnishes to the other to carry on his war, or keeps in readiness for his service." (See Vattel's Law of Na. tions, Book III Chapter VI., Page 323, Section 82.)