पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकर साहेब यांच्या मिनिटाविषयों गुणावगुण विवेचन. (99) गरज आहेच. त्यावांचून त्यास कधींही सुख होणार नाहीं, व त्याचा आत्मा त्यास गुणोत्कर्ष स्थितीस आणता येणार नाहीं. * मनुष्याला जशी दुसऱ्या मनुष्याच्या सहाय्याची गरज आहे तशीच एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राच्या सहाय्याची गरज आहेच. + रोमन लोकांमधील महाविख्यात राजनीति विशारद सिसरो याने असे म्हटले आहे की, " + सर्व राष्ट्राच्या फायद्यासाठी आणि संरक्षणासाठी दुष्कर आणि कष्टकर असे श्रम करण्याचा पत्कर घेणें सृष्टीधर्माला जसे अतिशय अनुकूल आणि समाधानकारक आहे तशी दुसरी कोणतीही गोष्ट नाहीं. 19 $ दुसरे एक वाक्य टिपेत लिहिले आहे त्याचे तात्पर्य असे आहे की, बलाढ्य राजाने कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करितां निर्वळ राष्ट्रास गोष्ट सृष्टीधर्माला जशी आवडते तशी दुसरी कोणतीही गोष्ट धानकारक नाहीं. सहाय्य करणे ही पराकाष्ठेने समा- या न्यायाने पाहिले असतां ब्रिटिश सरकारासारख्या राष्ट्राने आमच्या देशांतील राजांचे संरक्षण केल्याबद्दल कांहीं मोबदल्याची इच्छा करणे हे देखील उचित नाहीं, मग त्या योगाने आम्हास अमुक एक हक्क प्राप्त झाला झाला आहे असे म्हणणे तर केवळ अश्लाघ्य होय. इंग्रज सरकारानी या देशांतील सर्व संस्थानिकांपासून एकमेकांनी एकमेकांशी लढाई करूं नये असा करार करून घेतला आहे आणि दुसऱ्या शब्दानी हाटले तर आमच्या देशांतील राजानी तसा करार करून आपआपल्यांत निर्धास्तपणा करून घेतला आहे. तेव्हां शिंद्यापासून होळकरास आणि निजामापासून गायकवाडास काही उपद्रव होण्याचा संभव नाहींच परदेशांतून कोणी शत्रु पेऊन इंग्रज "The nature and essence of man, who without the assistence of his fellowmen is unable to supply all his wants, to preserve himself, to render himself perfect, and to live happily, plainly shows us that he is destined to live in society, in the inter- change of mutual aid; and, consequently, that all men are by their very nature and essence obliged to unite their common efforts for the perfection of their own being and that of their condition." (See Vattel's Law of Nations, Book II., Chapter I., Page 135, Section 3.) † " The offices of humanity are those succours, those duties, which men owe to each other, as men, that is, as social beings formed to live in society, and stand- ing in need of mutual assistance for their preservation and happiness, and to en- able them to live in a manner conformable to their nature. Now the laws of na- ture being no less obligatory on nations than on individuals whatever duties each man owes to other men, the same does each nation, in its way, owe to other nations. ( See Vattel's Law of Nations, Book II, Chapter I., Page 134 ) 29 ↑ "Nothing, ” says he “ is more agreeable to nature, more capable of affor- ding true satisfaction than in unitation of Hercules, to undertake even the most arduous and painful labours for the benefit and preservation of all nations.' (Vattel's Law of Nations, Chapter I., Book II., Page 133.) § "On the other hand, nothing is more conformable to the law of nature than a generous grant of assistance from the more powerful state, unaccompanied by any demand of a return, or, at least, of an equivalent. ( Vattel's, Law of Nations, Chap- XII., Book II., Page 203. )