पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सुधारणूक करणे भाग पाडले पाहिजे असा टकर साहेब यांच्या विचारांत एक मुद्दा आहे. टकर साहेब यांनी सदई मिनीट लिहिले त्या वेळेस महाराणी साहेब याणी आपल्यास हिंदुस्थानाची चक्रवर्तिनी ही पदवी विधिपूर्वक धारण केली नव्हती तरी इंग्लिश लोक आपणास सार्वभौम म्हणवीत होते. या देशांतील राजांवर त्यांची सत्ता फार मोठी आहे. देशी राजांनी कोणाबरोबर लढाई करूं नये. इंग्रज सरकारच्या दरम्यानगिरी- वांचून कांहीं करार मदार करूं नयेत, आणि दोन संस्थानांमध्ये जर कांहीं वाद उत्पन्न झाला तर त्याबद्दल इंग्रज सरकार न्याय करतील तो मान्य करावा असे देशी राजांनी इंग्रज सरकाराशी करार केले आहेत. त्या योगानें ब्रिटिश राष्ट्राचें तेज फारच वाढले आहे; तसे मान मरातब्याच्या संबंधाने देखील इंग्रज सरकारास पराकाष्ठेचें श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. सार्वभौमपदाचा महाराणी साहेबानी विधिपूर्वक स्वीकार केला त्या प्रसंगी दिल्ली येथें जो ता० १ जानेवारी सन १८७७ रोजी व्हाइसराय साहेब याणी दरबार भरविला होता, त्या दरबारांत त्यानी राजे लोकांस स्पष्टपणे जाहीर केलें आहे कीं, त्यांजबरोबर जे कांहीं इंग्रज सरकारानी कौल करार केले आहेत त्यांत आणि त्यांच्या पूर्व स्थितीत ही पदवी राणी साहेब यानी धारण केल्यापासून कांहींएक फेरबदल झाली नाहीं. त्याच- प्रमाणे पार्लमेंट सभेपुढे देखील इंग्लंडांतील प्रधान मंडळीनाही बोलून दाखविलें आहे. याप्रमाणें आमच्या देशांतील राजांबरोबर केलेले कौल करार कायम राहिले आहेत, व राजे लोकांच्या पूर्व स्थितीत कांहीं अंतर पडलें नाहीं, आणि सन १८५८ च्या सालांत राणी साहेब यानी प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यांतील " ज्याप्रमाणें आम्ही आपला अधिकार, आपला दर्जा, व आपला मर्तबा राखतो त्याप्रमाणे हिंदुस्थानांतील राजे रजवा- ड्यांचा अधिकार, दर्जा, व मर्तबा राखूं." हे वाक्य कायम राहिलें आहे, तर मग सार्वभौम नात्याने इंग्रज सरकारास आमच्या देशांतील राजांच्या राज्यकारभारामध्ये दरम्यान- गिरी करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे, ह्या टकर साहेबांच्या म्हणण्यास आधार तरी काय ? आणि साम्राज्य पदविशी तहनामे व दिलेली वचने पाळणे याचा द्वैतभाव तरी कोणता ? इंग्रज सरकारच्या तर्फे त्यांच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार असे उद्गार निघतात की, देशी राजांच्या राज्याचे संरक्षण ब्रिटिश सरकार करतात म्हणून त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्यांस मध्यस्ती करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे, आणि त्याचप्रमाणे टकर साहेब यानी आपल्या मिनिटांत लिहिलें आहे. वरील म्हणण्यांत तथ्यांश काय आहे याचा विचार करतांना आमच्या देशांतील राजांची राज्ये सुरक्षित ठेविण्यासाठी इंग्रज सरकारास असें कोणतें अपूर्व कर्म करावे लागतें कीं, ज्याच्या योगानें त्यानी आमच्या देशांतील राजांच्या राज्यकारभारांत दरम्यानगिरी करण्याचा हक्क सांगावा ? ईश्वराने मनुष्य प्राणी असा निर्माण केला आहे कीं, त्यास दुसऱ्याच्या सहाय्याची