पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकर साहेब यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुण विवेचन. ( ९ ) या कीर्तीने जे कांही विश्वास ठेवावा असे काय तें हिंदुस्थानांत आपलेच राज्य आहे. आपण मिळविले आहे ते आपण खोट्या शपथा वाहून, तरकटें रचून, आणि दिलेली वचने पाळण्याविषयीं टाळाटाळी करून मिळवू शकलो नसतो. जर आपण लबाडांशी लबाडी केली असती, खोटे कागद करणारांत खोटे कागद करून फसविलें असतें, आणि वचन मोडणारांशी बेइमानीपणाने वागलो असतो तर आपण आपले राज्य आपल्या धैर्यानें व अकलन शक्तीनें राखून ठेवू शकलो नसतो. लार्ड मेकाले यानीं प्रामाणिकपणाच्या संबंधानें आपल्या लोकांची विशेष प्रशंसा केली असून हिंदुस्थानवासी लोकांची आणि त्यांत विशेषेकरून राजांची विशेष निर्भत्सना केली आहे. इंग्लिश लोकांचे मित्र आणि शत्रु हे बेइमानी असतांही इंग्लिश लोकांनी केवळ सत्याचे अवलंबन करून या हिंदुस्थान देशांत एक मोठें राज्य मिळविले असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांत किती तथ्यपणा आहे याचा आम्हास येथें विचार कर्तव्य नाहीं. कसाही प्रसंग प्राप्त झाला असतां सत्यापासून च्युत होऊं नये हा जो त्यांचा सर्वमान्य सिद्धांत आहे त्याचे आह्मास येथें प्रयोजन आहे. आपण देशी राजांबरोबर केलेले तहनामे आणि दिलेली वचने मोडली असतां आपल्यास कोणी वाईट म्हणणार नाहीं असे जे टकर साहेब यांचे म्हणणे आहे त्यास त्यांच्या देशांतील एका विख्यात पुरुषाची वाक्यें प्रमाणास दाखवून लाजविण्याचे आहे. या प्रसंगी आम्ही असे कबूल केलें कीं, हिंदुस्थानवासी लोकांपेक्षां इंग्लिश लोक विशेष प्रामाणिक आहेत, व या देशांतील राजांपेक्षां त्यांच्या मधील राज्यकर्त्या पुरुषा- मध्ये पुष्कळ लोक विशेष भरंवसा ठेविण्यास पात्र आहेत, तर त्यांत आपणास विशेष भूषण आहे. उगीच दुराग्रह न धरितां खरी गोष्ट कबूल करण्यास सिद्ध असणे हा तरी मनुष्य प्राण्याचा कांहीं सामान्य चांगुलपणा नाहीं. ज्यास आपले दोष कळतात आणि दुसऱ्याच्या गुणाविषयीं परम आदर असतो तोच खरोखर मोठा मनुष्य. ड्यूक आफ वेलिंगटन या महापराक्रमी आणि राजनीति विशारद पुरुषाने एके प्रसंगी असे बोलून दाखविले आहे की, " आपले * राज्यप्रकरणी हरएक मतलब अनेक वेळा गमाविले तरी बेहेत्तर आहे, परंतु इंग्रज सरकारच्या इमानीपणाला मी तिळमात्रही "कलंक लागू देणार नाहीं. " याप्रमाणें तहनाम्यांचे महत्व आणि वचनांची थोरवी या भूपृष्टभागावर जी राष्ट्रे आहेत त्या सर्वांस निर्विवाद मान्य असतां टकर साहेब यांस ते इतके क्षुल्लक कां वाटले, आणि त्यांच्या विचारांत अशी अमोल्य तत्वे ती कोणती आहेत की, ज्यावर तहनाम्याचे आणि वचनांचें तेन पडूं नये याचा आतां आपण प्रशस्तपणे विचार करूं. इंग्रज सरकाराकडे हिंदुस्थान देशाचा सार्वभौम पदाचा अधिकार प्राप्त झाला आहे. सबव देशी राजांमध्ये अशी अव्यवस्था होईल की, इंग्रज सरकारास मध्यस्थी करण्याची जरूर पडेल तेव्हां तहनाम्यांतील करार बाजूवर ठेवून जबरदस्तीने देशी राज्यांमध्ये

  • "I would sacrifice every political consideration ten times over rather than sanction the slightest infraction of British good faith." (Dalhousie's Administration of British India, Chapter XIX, Page 154. )