पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंडेराव महाराज यांच्या कृपेंतोल मंडळीवर जुलूम. महाराज यांचे मन अतिशय दूषित केले होते व त्यांचे कामगार नारायणभाई यांजवर लांच घेतल्याचा आरोप आणिला होता, परंतु खंडेराव महाराज एकाएकी मरण पावल्यामुळे भाऊ शिंदे यांचे कारस्थान सर्व व्यर्थ जाऊन भाऊ शिंदे यांचा शत्रूपणा उलटा हरीबा व नारायणभाई यांचे हितास कारणीभूत झाला. खंडेराव महाराज यांच्या दहा दिवसांतच सरकार वाड्याच्या एका भागास आग ला- गली होती ती मुद्दाम वर लिहिलेल्या खंडेराव महाराज यांच्या मंडळीपैकी गणू वाघ आणि मल्हारबा शेळक्या यांणी लाविली असा त्यांजवर आरोप आणिला होता व त्याबद्दल कांहीं पुरावाही मिळविला होता असे म्हणतात, मग तो खरा किंवा खोटा हें सांगवत नाहीं. खंडेराव महाराज यांचा खाजगी ऐवज मल्हारबा शेळक्या याचे ताब्यांत असे. त्याचे हिशेबाचे कागद जळून गेले अशी सबब दाखविण्यासाठी त्याणे हे कृत्य केले असा त्या अपराधाचा हेतु कल्पिला होता. सदर दोन्ही इसमांस बेड्या घालून तुरुंगांत टाकिल्यावर ते थोडेच महिन्यांनी मेले, परंतु त्यांच्या मरणासाठी कांही उग्र कर्म करण्यांत आले होतें अशी लोकवदंता नाहीं. त्यांची घरे लुटून मिळकत सरकारांत आणिली व घरें महारा- जानी आपल्या मेहेरबानीतील मंडळीस दिली. मल्हारराव महाराज खंडेराव महाराजांच्या मरणाच्या दुसरे किंवा तिसरे दिव- शी बाहेर फिरावयास जातांना भाऊ शिंदे यांस आपल्या गाडीत बरोबर घेऊन गेले होते. हा उभयतांचा मित्रपणा सारखा संबंध पाहून लोकांस मोठे नवल वाटले, परंतु त्यांत खरोखर कांहीं अर्थ नवता. एक तर भाऊ शिंद्याविषयों रोसडेंट साहेब यांचे मन चांगले नवते आणि दुसरे मल्हारराव महाराज यांस त्याणी मनस्वी उपद्रव दिला होता, यामुळे मल्हारराव महाराज त्याजवर दया करितील असा संभव नव्हता. एके दिवशी कर्नल बार साहेब मल्हारराव महाराज यांचे भेटीसाठी राजवाड्यांत आले तेव्हां त्यांस असे समजले की, भाऊ शिंदे वाड्यांत आहेत तेव्हां त्याणी तात्काळ महाराजांस अशी सूचना केली कीं, त्यांस वाड्यांतून काढून द्यावे. नंतर दुसरे दिवशी याद लिहिली त्यांत “ भाऊ शिंदे यांजवर आरोप आल्यावरून दिवाणगिरीच्या कामावरून दूर केले असतां त्यांजबरोबर महाराज निकट संबंध ठेवितात हें उचित नाहीं, यासाठी त्यांस राजवाडा बंद. करून त्यांजवर पाहारा ठेवावा " असे लिहिले होतें. A मल्हारराव महाराज यांस ही सूचना फार आवडली. अगोदर त्यांचे मनांत त्या दु- दैवी मनुष्याची विटंबना करावयाची हातीच, आणि त्यांत आपणास रेसिडेंट साहेब यांची अनुकूलता आहे असे त्यांस वाटल्यामुळे त्याणी त्यास अतिशयच दुःख दिले. काही महिनेपर्यंत भाऊ शिंदे यांजवर पाहरा ठेविला होता, व त्यांची सर्व मिळकत त्यांचेच वाड्यांत जप्त करून ठेविली होती. नंतर त्यांजवर असा एक आरोप आणला की, खंडेराव महाराज याणी त्यांचे तैनातीस जी पागा सोपविली होती त्यांत त्याणीं कांहीं पैसे खाल्ले. या आरोपाचे चौकशीसाठी त्यांस त्याचे वाड्यांतून फौजदारी कोर्टात गाडीत बसवून नेत आणीत असत. याप्रमाणें कांही दिवस लोटल्यावर रावसाहेब बापूभाई दयाशंकर, माधवलाल गंगाधर, आनंदराव लक्ष्मण ऊर्फ भाऊ खेडकर, आणि सखाराम