पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(e) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वचनांची योग्यताही तशीच मोठी आहे. तहनाम्यांमध्ये देखील वचनांचा समावेशकरतां येईल; कारण त्यांत तरी राजांनी परस्परांस वचनेच दिलेली असतात, परंतु तहनाम्पाविषय व वचनाविषयीं निराळे सांगण्याचें प्रयोजन असें आहे कीं, इंग्रज सरकारानीं आपल्या देशांतील राजांबरोबर तहनामे के- ल्यानंतर विशेष प्रसंगी वारंवार वचने दिली आहेत, व टकर साहेबानी द्वारांत- रांनी तहनाम्याबरोबर इंग्रज सरकारानी दिलेल्या वचनांचा निकाल लाविला आहे.. बंडाच्या वेळेस ज्या राजांनी आपणास सहाय्य केले त्यांची सत्ता कमी केल्याने आपणाकडे अकृतज्ञतेचा दोष येणार नाहीं, अतें जें त्यांचें म्हणणे आहे तें विशेषेकरून राणी साहेब यांनी सन १८५८ च्या जाहिरनाम्यांत राजे लोकांस जी अभिवचने दिली आहेत त्यांस अनुलक्षून आहे. हा एक ठरीव नियम आहे कीं, एकाने दुसऱ्यास त्याच्यासाठी अमुक एक गोष्ट मी करीन असें विधिपूर्वक वचन दिले ह्मणजे त्या दुसऱ्यास वचन देणारावर त्या वस्तूच्या संबंधाने पूर्ण हक्क उत्पन्न होतो. वचन देणाराने जर वचन पाळले नाहीं तर त्याज- कडे दुसऱ्याच्या हक्काचें उल्लंघन करण्याचा दोष येतो. एकाद्याची मिळकत लुटून आणल्याने जसे पातक घडते तसेच वचन मोडल्याने घडते.* मनुष्य जातीचा निर्भ- यपणा, शांति आणि सुख सर्वथैव न्यायावर म्हणजे दुसऱ्याचे हक्कास मान्य करण्याचे मनुष्याचे कर्तव्यकर्म आहे त्यावर अवलंबून आहे. मनुष्यांनी व राष्ट्रांनी आपण परस्परांबरोबर इमानाने वागण्यास बांधलो गेलो नाहीं असें मनांत आणले तर या जगांत कोणताही व्यवहार चालणार नाही. राष्ट्रांची राष्ट्र एक- दम लयास जातील, आणि पृथ्वीवरील सर्व व्यवहार एकदम बुडेल. लार्ड मेकाले यानी लार्ड क्लाइव्ह यांच्या जन्म चरित्रावर एक निबंध लिहिला आहे. त्यांत सत्याची थोरवी किती मोठी आहे याविषयीं फार सुंदर लेख लिहिला आहे. लार्ड क्लाइव्ह यानीं उमियाचंद यांस एक बनावटी तहनामा करून फसविलें हें त्या सत्यवादी पुरुषास आवडलें नाहीं. त्यांचे म्हणणे असे आहे की, प्रामाणिकपणा ही एक उत्तम राजनीति आहे. एकाद्या मनुष्याने विश्वासघात करून कांही इच्छित अर्थ कधी साधला असेल, परंतु विश्वासघात केल्याने सर्व प्रकारचे फायदे अमुक राष्ट्राने संपादन केले आहेत असे उदाहरण दाखवितां येणार नाहीं. बेइमानाबरोबर बेइमानीपणा करणें हें कांहीं शहाणपण नाहीं. लबाडास सत्याने जिंकावें ह्या नीतीपासून किती चांगले परि- णाम होतात यास हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारचें राज्य हे एक मोठे प्रमाण आहे. आमचे राज्य वाढविण्यासाठी व त्याचें संरक्षण करण्यासाठी इंग्लिश लोकांच्या पराक्रमाने ब बुद्धीने जितके केलें नाहीं तितकें त्यांच्या इमानाने केले आहे. ज्यांच्या वचनावर

"It is a settled point in natural law, that he who has made a promise to. any one, has conferred upon him a real right to require the thing promised, and, consequently. that the breach of a perfect promise is a violation of another person's right, and as evidently an act of injustice as it would be to rob a man of his property. The tranquility, the happiness, the security of the human race, wholly depend on justice,on the obligations of paying a regard to the rights of others. ” ( See Vattel's Law of Nations, Page 196, Book II., Chapter XXII.)