पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकर साहेब यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुण विवेचन. ( ७ ) टकर साहेब यांच्या वरील म्हणण्याचे तात्पर्य असें दिसतें कीं, बंडाच्या वेळी या दे- शांतील राजांनी इंग्रज सरकारास मनःपूर्वक सहाय्य केल्यावरून त्यांच्या हक्काविषयीं जीं त्यांस अभिवचने दिली आहेत ती देखील नेटिव राजांच्या प्रजेच्या पाळली असतां कांहीं प्रत्यवाय नाहीं. संरक्षणाच्या प्रसंगी न याप्रमाणे आपल्या देशांतील राजांच्या राज्यमंडपास आधारभूत जे कांहीं दोन स्तंभ अवशिष्ट राहिले आहेत त्यांस टक्कर देऊन पाडले असतां त्या राजमंडपास कांहीं धक्का लागणार नाहीं असें त्यांच्या विचारास आले आहे. आपण जेव्हां निर्बळ होतो आणि गायकवाड आतांपेक्षां सबळ होते आणि बाहुबळाने हरकत करण्यास समर्थ होते तेव्हां जे करार केले आहेत त्यांत काय अर्थ आहे असे ते स्पष्ट रीतीनें म्हणतात, नाहीं तर आम्ही आतांपेक्षां निर्बळ होतो आणि गायकवाड आतांपेक्षां ज्यास्त बळवान् होते ह्या लेखाचें कांहीं प्रयोजन दिसत नाहीं. आणि त्यांच्या मिनिटावर आक्षेप घेण्यासारख्या ज्या कांहीं गोष्टी आहेत त्यांत तहनामे आणि वचनें याविषयीं जें त्यांचे म्हणणे आहे त्याजवरच काय तो आमचा विशेष कटाक्ष आहे; कारण आम्ही वर स्पष्ट म्हटलेच आहे कीं, आमच्या देशांतील राजांच्या राज्यांचा टिका- ऊपणा काय त्या दोन वस्तुंच्याच आधारावर राहिला आहे. तहनामे आणि वचने यांचे महत्व फार मोठे आहे. * तहनाम्यांच्या साधनाने अतिशय महत्वाच्या कामाचा निर्णय करितां येतो. त्यांच्या योगाने राजांच्या हक्कांचा नियम करितां येतो. राष्ट्रांचे जे हक्क मान्य केलेले असतात त्यांची आणि त्यांस अति प्रिय जें महत्व त्याची शाश्वती तहनाम्यांवर अवलंबून आहे. ज्यास इतरांचें वर्चस्व मान्य नाहीं त्या राष्ट्रामध्ये त्यांच्या नानाप्रकारच्या हक्कांची तडजोड करणे, त्यांच्यामध्ये व्यवहार कोणत्या प्रकारचा चालावा याविषयीं नियम ठरविणें, आणि त्यांनी कोणत्या हक्कांची अपेक्षा करावी याविषयीं खचिती करणे, यास तहनामे हेंच काय मुख्य साधन आहे. तें राष्ट्राचा सुरक्षितपणा, शांती आणि वैभव विशेषे करून ज्याजवर अवलंबून आहे अशा ज्या कांहीं अनुलंघनीय वस्तु आहेत त्यांत तहनामा ही एक अति महत्वाची आणि पवित्र वस्तु आहे. राष्ट्राचे वैभव, त्याची भरभराटी आणि त्याचे स्वातंत्र्य जसें राजदे - हाच्या सुरक्षितपणावर अवलंबून आहे त्यापेक्षां देखील तहनाम्याच्या सुरक्षितपणावर ज्यास्त अवलंबून आहे. विशेष तर काय पण तहनामे हे राष्ट्राचे पंचप्राण आहेत आणि म्हणून त्यांचें संरक्षण प्राणाप्रमाणें राष्ट्रांनी केलें पाहिजे.

  • "By treaties the most important affairs are determined; by them the preten- sions of sovereigns are regulated; on them nations are to depend for the acknowledge- ment of their rights, and the security of their dearest interests. Between bodies public,-between sovereigns who acknowledge no superior on earth, treaties are the only means of adjusting their various pretensions,-of establishing fixed rules of conduct, of ascertaining what they are entitled to expect, and what have to depend on" (Vattel's Law of Nations, Chap. XV., P. 228,)

+ "Who can doubt that treaties are in the number of those things that are to be held sacred by nations ? " (See Vattel's Law of Nations, Book II., Chapter XV., Page 228. )