पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६) . मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. राज्यांत टिकाऊ सुधारणा घडवून आणण्यासाठी जे उपाय उघडपणे अपुरते आहेत ते टाकून योग्य उपायांची योजना केली पाहिजे असे सिद्ध होतें. बाविसाव्या कलमांत त्याणी दुसऱ्या हरकतीचा उलगडा केला आहे. त्याविषयीं त्यांचे म्हणणे असे आहे की, जुलूम आणि वलात्कार याजपासून मुक्त होण्याची सत्ता आपण गायकवाडांच्या प्रजेच्या हातांत ठेविली नाहीं, म्हणून त्यांच्यासाठी आपण जे कर्तव्य कर्म करण्यास बांधलो गेलो आहोत त्या कर्तव्यकर्मापासून माजी राजांनी जी आपली चाकरी केली, त्या कृतज्ञतेमुळे आपली सुटका होत नाहीं, आणि जेव्हां दोन कर्तव्यकर्मे पर- स्परांशी विरोधी असतात तेव्हां दोहोंपैकीं जें अति उत्तम असेल त्यास अग्रगण्यता देणें अवश्य आहे. तुलना करून पाहतां ब्रिटिश सरकार याणी नेटिव राजांबरोबरच्या मागील वर्तनांत नेटिव संस्थानिकांच्या प्रजेच्या हिताकडे फारच थोडे लक्ष दिले असून निर्बळ आणि दुराचरणीं राजांविषयीं ज्यास्त करुणा दाखविली आहे. सव्विसाव्या कलमांत दादाभाई नवरोजीविषयीं त्याणी असे मत दिले आहे कीं, बडोद्याच्या राष्ट्राला जर राजनीतीबद्दल लेख लिहून देविण्यांत आला तर मग मल्हारराव महाराज, त्यां- च्या स्थितीत अशा प्रकारचें स्थित्यंतर झाल्यावर दादाभाई यांस दिवाणगिरीवर कायम ठेवि - यास इच्छितील, तर दादाभाईची परीक्षा पाहण्यास काही हरकत नाहीं. दादाभाई अनुभवी नाहीत, परंतु ते कांहीअंशी सुधारलेले आणि बुद्धिवान आहेत. एकाच्याही हा- तांत खरी सत्ता नाहीं असे हल्ली आहेत तसे दोन प्रधान राजास असणे मला अगदी अभिमत नाहीं. दादाभाई यांची इंडियन फिन्यान्स कमेटीपुढे साक्ष झाली तेव्हां मी हजर होतो. ज्या विषयावर त्यांची साक्ष घेतली तो विषय उत्तम रीतीने त्यांस अवगत होता अथवा जें माहित होतें तें बरोबर सांगण्यांत आले असे दिसलें नाहीं. यावरून जरी त्यांची विलक्षण बुद्धि आहे असे म्हणतां येत नाहीं तरी त्यांखेरीज दुसऱ्या कोणाविषयीं शिफारस करावी असा मला कोणी आढळत नाही. सदहूप्रमाणें टकर साहेब यांच्या मिनिटांतील तात्पर्य आहे. टकर साहेब यानी निर्मळ अंतःकरणाने ही गोष्ट कबूल केली आहे कीं, गायकवाडांस त्यांच्या आंतील राज्यव्यवस्थेच्या संबंधानें सल्ला देण्यापलीकडे इंग्रज सरकारानी कोणतीही गोष्ट केली असतां त्यांजबरोबर जे तहनामे केले आहेत त्यांस विरोध येणार आहे. परंतु त्यानी असे गृहित केलें आहे की, गायकवाड सरकारच्या प्रजेचे हित पाहणे हेही आपले कर्तव्यकर्म असून तहनाम्याअन्वयें सल्ला देण्याचा जो आपणास हक्क आहे तेवढ्याने तो कार्यभाग उरकत नाहीं. यासाठी तहनाम्यांतील कराराचे उल्लंघन केलें असतां आपल्याकडे कांहीं दोष येणार नाहीं. दुसरे त्यांच्या म्हणण्यांत असें आलें आहे कीं, सन १८५७ चे सालांत बंडाच्या वेळीं गायकवाड सरकारानों आपणास मनःपूर्वक साह्य केलें हेंही एक कारण आपण त्यांच्या राज्यकारभारांत मध्यस्थि न करण्याविषयीं दाखविण्यांत येईल, परंतु जुलूम आणि बलात्कार यांपासून मुक्त होण्याची सत्ता आपण गायकवाडांच्या प्रजेच्या हातांत ठेविली नाहीं म्हणून त्यांच्यासाठी आपण में कर्तव्यकर्म करण्यास बांधलो गेलो आहों त्यापासून गायकवाडानी आपणास बंडाचे वेळी सहाय्य केलें येव्हढ्याने आपली सुटका होत नाहीं.