पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ear साहेब यांच्या मिनिटाविषयीं गुगात्रगुण विवेचन. ( ५ ) मल्हारराव महाराजानी संतोषाने जर योजलेली राज्यव्यवस्था कबूल केली नाहीं तर कोणता उपाय योजावा याविषयीं टकर साहेब याणी आठराव्या कलमांत सांगितले आहे. त्यांत ते असें लिहितात की, चांगला दाब घातल्यावांचून आणि निदान आंगबळ दाखवि- ल्यावांचून हल्लींचे गायकवाड यांच्या स्थितीत इतका फेरबदल करण्याविषयीं कबूल होणार नाहींत, आणि अशा प्रकारच्या रीतीपासून शिंदे, होळकर आणि त्याच वर्गांतील दुसरे राजे यांजमध्ये असमाधान उत्पन्न होईल ही गोष्ट खरी आहे. तथापि मला असे वाटतें कीं, मी सुचविलेले बेत सिद्धीस नेण्यास ब्रिटिश सरकारामध्ये पूर्ण शक्ति आहे, आणि अशा प्रकारचे प्रथम शिक्षण देण्यास अशी विशेष अनुकूल संधि पुनः कधीं यावयाची नाहीं. कधी तरी ब्रिटिश सरकारात हा मार्ग स्वीकारावा लागेलच, यासाठी तो आतांच स्वीकारावा. मग त्यापासून कांहीं संकट आले आणि कांहीं जोखम लागली तर लागो, परंतु जर हा बेत हल्ली तहकूब ठेविला तर तो पुढे शेवटास नेण्यास ज्यास्त कठीण आणि विशेष धोक्याचा होईल. एकुणिसाव्या कलमांत टकर साहेब यांचे म्हणणे असे आहे की, हिंदुस्थानांतील बि टिश सरकारच्या राज्यव्यवस्थेहून उलट अशी अंदाधुंदी नेटिव राज्यांत चालू देणें हिंदुस्था- नांतील ब्रिटिश सरकारच्या राज्यास किफायतवार होईल असे म्हणत असत ते दिवस आतां गेले. बडोद्याच्या राज्यांतील अव्यवस्था नाहींशी करण्याचे लांबणीवर टाकिलें तर संकट ज्यास्त वाढेल. वाईट राज्यकारभारापासून अधिक लोकसमुदायांत असमाधान उत्पन्न होईल, आणि त्या दु:खी लोकांस आपल्या प्रजेमध्ये त्यांच्याविषयी कळकळ बाळगणारे पुष्कळ सांपडतील आणि ते त्या दुष्टाचरणाचा सर्व भार ती बंद करण्याकरितां योग्य री- तीचा उपाय करण्याची आपण अळमटळम केली ह्मणून आपल्यावर लोटितील. विसाव्या कलमांत टुकर साहेब याणी आपण केलेल्या सूचनेप्रमाणें अमलांत आणण्यास कोणत्या हरकती घेण्यांत येतील त्या दाखवून त्यांचे खंडन केलें आहे. ते म्हणतात की, कांही लोक अशी हरकत घेतील कीं, मी आ उपायांची योजना केली आहे ते उपाय अमलांत आणिले असतां गायकवाडांच्या पूर्वजांबरोबर आपण जेव्हां निर्जळ होतो, आणि ते जेव्हां हल्लींपेक्षां शक्तिमान होते, आणि बाहुबळाने हरकत करण्यास विशेष सामर्थ्यवान होते तेव्हां जे करार मदार केले आहेत त्यांस व्यत्यय येईल, व सन १८५७ च्या सालांत भोठया बंडाच्या वेळेस कितीएकांनी तिन्हाइतपणाने राहून व कितीएकानी मनःपूर्वक मदत करून आपल्यात सहाय्य केलें त्या राजांच्या एक राजसत्ताक हक्काला हळू हळू मर्यादित करणे कृतघ्नपणाचें कृत्य होईल. या दोन हेतूंपैकी पहिल्यास इंग्रज सरकारानी फक्त सहा देण्यापलीकडे कोणतेही प्रकारची मध्यस्थि केली म्हणजे बाध येणार आहेच, आणि शहाण्या मनुष्याच्याने असा क्वचितच वाद कसेल की, नेटिव राज्यामध्ये वाईट राज्यव्य- वस्था असेल तर असो ; पण इंग्रज सरकारानी सार्वभौम या नात्याने ती बंद करण्याकरितां कांहीं आस्त पाऊल टाकूं नये. ज्यास्त पाऊल टाकिलें पाहिजे असे मान्य केले म्हणजे मग उलगडण्यासाठी येवढाच प्रश्न उरतो की, तसा समय येऊन ठेपला आहे की नाहीं, तसा समय येऊन ठेपला आहे असा प्रश्नाचा उलगडा केला म्हणजे मग त्यापासून २.