पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

8 ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास राज्यांत सामील करण्याचा प्रसंग टाळण्यासाठी हळू हळू राज्यांची स्वैरसत्ता कमी करून त्यांस नीतीनें राज्य करण्यास लावणें हें अगदीं आवश्य आहे. अतिशय सुधा- रलेल्या राष्ट्रांत ही गोष्ट एकंदरीने मान्य झाली आहे कीं, स्वच्छ राजा किती जरी सकरुण असला व ज्यांजवर आपण राज्य मिळविले त्या लोकांसाठी आपले कर्तव्य कर्म कोणते याविषयीं त्यास चांगले ज्ञान जरी असले तरी, जर त्याच्या सत्तेला कांहीं मर्यादा नसेल तर तशा राजाचें राज्य देखील कधींही चांगले होणार नाहीं. आणि असे समजण्याचा हा अगदी योग्य समय आहे कीं, हिंदुस्थानांतील अशा प्रकारची राज्यव्य- वस्था हळू हळू बंद झालीच पाहिजे. प्रत्येक गोष्ट जेथें राजांच्या इच्छेने घडावयाची तेथे चांगली सुधारणुक होण्याची आशा करणे व्यर्थ आहे. जुलमी राजांच्या जुलमा- पासून मुक्त होण्याकरितां त्यांच्या प्रजांनी फितूर करण्यास उठावे हा राजांवरील स्वाभाविक दाब ब्रिटिश सरकारच्या राज्यापासून नाहींसा झाला आहे. कारण, ब्रिटिश सरकार दुष्ट आणि नालायक राजांचे देखील त्यांच्या प्रजेच्या फितुरापासून संरक्षण करते. हल्ली देशी संस्थानांच्या भोवतालच्या राज्यांत हळू हळू पण खरोखर सुधारणा होत असून तेथील लोकांचे विचारांत फेरबदल झाले आहेत. त्यांजमध्ये आतां देशी राजांस पूर्वस्थितींत राहणे कठीण आहे. आणि जर ते होऊन सुधारणा करण्याविषयीं कांह उपाय न योजतील तर, या इलाख्यांतील जीं राज्ये ब्रिटिश सरकारच्या देखरेखीखाली नसल्यामुळे. त्यांची जशी दशा झाली तशी यांचीही होईल. आणि हा प्रकार, त्यांचा लय होण्याचा समय जवळ येऊन ठेपेल आणि सर्व देश हांका मारूं लागेल तोपर्यंत चालेल. सत्राव्या कलमांत साहेब महसुफ यांचे असें ह्मणणे आहे कीं, देशी राजे आपण होऊन अशा प्रकारची सुधारणा करतील तर त्यापासून जास्त फायदा होईल. आणि वरिष्ठ सरकार, हल्लींच्या प्रसंगाप्रमाणे जेव्हां जेव्हां प्रसंग येईल तेव्हां तेव्हां उघडपणें असे दाखवील कीं, टिकाऊ सुधारणा करण्याविषयीं आमची इच्छा आहे, आणि जेव्हां योग्य संधी मिळेल तेव्हां संस्थानच्या प्रजेच्या हितासाठी आम्ही राज्यामध्ये पूर्वीच्या स्थापित नियमांत असा फेरफार करणे भाग पाडूं कीं, तेणेंकरून चांगले राज्य असावे हा मुख्य मतलब साधेल; तर ब्रिटिश सरकारच्या ह्या आचरणापासून अशा प्रकारच्या योजनेस उत्तेजन येऊन ती गोष्ट विशेष सुगम होईल. एतद्देशीय राज्यांम- ध्यें अव्यवस्था झाली असतां तें राज्य आपल्या राज्यास जोडून देऊन आपले राज्य वाढ- विण्याची इच्छा नाहीं अथवा दुसऱ्या प्रकारचा फायदा करून घ्यावयाचा नाहीं ; असे जर आपण स्पष्टपणें प्रसिद्ध केलें आहे, तर आपल्या अशा प्रकारच्या कृत्यापासून कांहीं गैर समजूत होणार नाहीं. आणि बडोद्याच्या राज्यांत सुखकारक आणि टिकाऊ सुधारणूक करण्याविषयीं आपण भाग पाडलें असतां विचारी लोकांस-मग ते युरोपियन असोत किंवा एतद्देशीय असोत, ती गोष्ट पसंत पडेल; आणि योग्य काळामध्ये ज्यांच्या हितासाठी एक महत्वाचा फेरफार केला जाईल ते आपल्यावर ईश्वराचा मोठा प्रसाद झाला असे मानतील.