पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टकरसाहेब यांच्या मिनिटाविषयीं गुणावगुणविवेचन ( ३ ) तेराव्या कलमांत त्यांनीं, जेणेकरून इच्छित हेतु सिद्धीस जाईल असे उपाय कोणते ते सांगितले आहेत. जोपर्यंत दुसऱ्या सुगम उपायांची योजना केल्याने राज्यांत सुधारक होण्याची सवड आहे, तोपर्यंत राज्याधिकारी यानें वाईट राज्य चालविलें - णून तें सार्वभौम या नात्याने ब्रिटिश सरकारच्या राज्यास जोडून देणे अथवा कांहीं मुद- तीपर्यंत राज्यकारभार आपल्या हातांत ठेवणे हे कृत्य न्याययुक्त होणार नाहीं. यास साधारण आणि योग्य उपाय हा आहे कीं, राज्यकारभार कोणते रीतीने चालविण्यांत येईल याबद्दल एक राजकरण नियमांचा लेख लिहून प्रजेस देण्याविषयीं राजास भाग पाडावे आणि त्या लेखाप्रमाणें त्याणें वागणूक केली नाहीं तर त्या राजास गादीवरून काढून टाकून त्याच्या वारसास राज्य द्यावें; अशी अट ठरवावी. हा लेख तयार करणे कठीण पडणार नाहीं. या लेखांत प्रजेच्या हक्काचा आणि राजाच्या कर्तव्यकर्माचा उल्लेख करून त्यांत ज्या पद्धतीवर राज्यकारभार चालवावयाचा त्या जरूरीच्या मूलतत्वाचा समावेश करावा. आणि कायदे कसे करावे व ते अमलांत कसे आणावे, हें आणि दुसऱ्या ज्या कांही महत्वाच्या गोष्टी असतील त्या व्याजमध्ये उल्लेखित कराव्या. चौदाव्या कलमांत ते ह्मणतात कीं, अशा प्रकारची सूचना पूर्वी कोणीं केली होती असें मला स्मरत नाहीं. ह्यास्तव ही माझी सूचना केवळ नवीन ह्मणून चमत्कारिक आणि अग्राह्य वाटेल, परंतु याबद्दल ज्यांनी हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांतील दोन मोठा संस्थानांमध्ये कारभार केले आहेत, आणि त्यांजमध्यें ज्यांस मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे अशा एका प्रसिद्ध एतद्देशीय कामदाराची मी सल्ला विचारिली. तेव्हां त्यांजकडून मला असे कळविण्यांत आले की, सार्वभौम सत्तेच्या संबंधाने जेव्हां एतद्देशीय संस्थानांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रसंग येईल तेव्हां जे उपाय आपण योजिले आहेत ते अगदीं योग्य आहेत असें माझ्या मनांत फार काळापासून आले आहे. पंधराव्या कलमांत त्यांनी असें लिहिलें आहे कीं, माझ्या विनंतीवरून त्या सद्गृह- स्थाने राजकरणनियमांचा एक मसुदा मजकडे तयार करून पाठविला त्यांत कांहीं फेरफार केला पाहिजे. परंतु एकंदरीने त्यांतील नियम फार उत्तम आहेत. सबब तो मसुदा मी माझ्या मिनिटास जशाचा तसाच जोडला आहे. त्याप्रमाणे देशी राजांमध्यें राज्यकारभार चालविण्याची पद्धत घालून द्यावी अशी माझी शिफारस आहे ; यास्तव गव्हरनर जनरल यांणीं अथवा स्टेट सेक्रेटरी यांणी तो मसुदा आवश्य ध्यानांत घेतला पाहिजे. या संबंधानें दुसऱ्याही देशी सद्गृहस्थांचे विचार घेतल्यावरून माझी अशी खात्री झाली आहे की, अशा प्रकारची राज्यव्यवस्था विद्वान् लोकांस पसंत पडेल इतकेंच नाही, पण एकंदरीने ती सर्वांस मान्य होईल. फक्त राजे, त्यांचे कारभारी आणि राज्यांतील बेबंद कारभारामुळे ज्यांत द्रव्य मिळविण्याची सवड सांपडते ते लोक मात्र या राज्यव्यवस्थेस असंतुष्ट होतील. सोळाव्या कलमांत त्यांनी असें लिहिलें आहे कीं, देशी राज्यांचा लय होऊ न देतां ती कायम ठेवण्यासाठी आणि त्यांचा मुलूख ब्रिटिश सरकारच्या