पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कर्नल फेर यांची पराकाष्ठेची स्तुति, त्यांच्या पूर्वीच्या रेसिडेंटावर दोषारोप आणि बडेोद्याच्या राज्यकारभाराची निंदा, या मजकुरांनीच ती कलमे व्यापली आहेत. गव- रनर जनरल यांनी चौकशी करण्याविषयीं कमिशनास जी मर्यादा घालून दिली होती ती टकरसाहेब यांस पसंत पडली नसून, भाऊ शिंदे यांचे मरणाबद्दल मल्हारराव महाराजांवर जो संशय आला होता त्याबद्दल व दुसऱ्या तशाच प्रकारच्या कृत्यांबद्दल चौकशी करण्याविषयों इंडिया सरकारांनी कमिशनास परवानगी द्यावयाची होती असे त्यांचें मत होते. त्याविषयीं विस्तारपूर्वक सांगत बसण्यांत कांही अर्थ नाहीं. परंतु या मिनिटांत कर्नल फेर साहेब यांची त्यांनी जी स्तुति केली होती त्या स्तुतीस ते किती पात्र होते हैं शेवटी निदर्शनास येईलच. अस्तु ; त्यांच्या मिनिटाच्या दहाव्या कलमा- पासून शेवट पर्यंतचाच मजकूर काय तो महत्वाचा आहे. दहाव्या कलमांत त्यांचे म्हणणे असे आहे कीं, सन १८७१ मध्ये राणी जमना- बाईसाहेब यांस इंग्रज सरकारच्या आश्रयाखाली आणून ठेवण्यासाठीं मी बडोद्यास गेलो तेव्हांच मला कमिशनाने प्रसिद्धीस आणलेल्या बडोद्याच्या वाईट स्थितीपेक्षां देखील जास्त वाईट स्थितीविषयी, त्या दरबाराशी ज्यांचा संबंध होता त्यांजकडून समजलें होते. आणि तेव्हांपासूनच माझी पूर्णपणे अशी खात्री झाली होती कीं, जर वाईट राज्य कारभाराचा अंत करण्यासाठी योग्य उपाय योजण्याचे नाकारण्यांत येईल तर हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारच्या राज्याविषयीं अविश्वास उत्पन्न होईल. राज्यांत सुधारणूक करण्यासाठी कमिशनाने जे उपाय सुचविले आहेत ते अपुरते आहेत. यासाठीं बडोद्याच्या दरबाराशी आपला जो संबंध आहे त्याला अनुसरून ज्या उपायांची योजना करितां येईल, असे दुसरे उपाय योजिले पाहिजेत. ह्या संबंधाला अनुसरून उपायांची योजना करण्याविषयीं टकरसाहेब यांचे ह्मणणें होतें तें अगदीं रास्त आहे. परंतु जे उपाय योजण्याविषयीं त्यांनी गवरनर जनरल यांस शिफारस केली, त्यांचा या ह्मगण्याशी अर्थार्थी कांहीं देखील संबंध राहिला नाहीं ; असे आपणास पुढें कळून येईल. बारावे कलमांत ते असें ह्मणतात की, दरबारचे पहिले अधिकारी काढून टाकणे, यांच्या ऐवजी दुसरे नेमणे, आणि ब्रिटिश सरकारच्या अनुमताने नव्या दिवाणाची नेमणूक करण्याचें राजास भाग पाडून त्यास त्यांच्या हुकुमावांचून दूर न करूं देणें, हे उपाय प्रथमदर्शनीं चांगले दिसतात. परंतु महाराजांच्या स्वैरसत्तेस कांहीं मर्यादा केल्यावांचून ते सर्व उपाय निष्फळ होतील. राजाचा अधिकार तसाच • कायम ठेविला आणि त्याच्या आणि दिवाणाच्यामध्ये मध्यस्थी करण्याविषय रोसेडेंट यास अधिकार दिला तर मल्हारराव महाराजांसारख्या राजाबरोबर अधिका- राच्या संबंधानें रोसेडेंटाची हंमेश घांसाघांसी चालेल. आणि याबद्दलचा परिणाम गायक- वाडांच्या दुर्दैवी प्रजेस भोगावा लागून, अशा प्रकारच्या व्यवस्थेने हिंदुस्थान सरकार मध्यस्थी करण्यापासून दूर रहाण्यास इच्छिते, ती मात्र वारंवार करावी लागेल.