पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारराव महाराज गायकवाड यांच्या कारकिर्दीचा खरा इतिहास. उत्तरार्ध. टकरसाहेबांच्या मिनिटाविषयीं गुणावगुणविवेचन. कमिशनच्या रिपोर्टवर टकर साहेब यांनीं तारीख ३ मार्च सन १८७४ रोजी एक लांच मिनिट लिहिले आहे. व त्याजबरोबर देशी राजांनी आपले राज्य कोणत्या पद्धतीने करावे याबद्दल रचलेल्या नियमांचा एक मसुदा जोडला आहे. हा मसुदा कोणी एका देशी गृहस्थानें तयार केला होता असे त्याच्या लेखावरून दिसतें. त्यानें, माझें नांव प्रसिद्ध करूं नका असे टकरसाहेब यांस मुद्दाम सुचविल्यावरून त्यांनी त्याचे नांत्र उघड केलें नाहीं. ढकरसाहेब याचा त्या मसुद्याविषयीं परमादर आहे. त्या मसुदा रचणारास ते मोठा मुत्सद्दी समजून, त्याने दोन देशी राज्यांमध्ये कारभार करून मोठे यश संपादन केलें आहे असे ते म्हणतात. व मी जे उपाय सुचविले आ- हेत ते प्रचारांत आणल्यानेंच देशी राजांचीं राज्ये टिकणार आहेत, असें त्यांचे आग्रहपूर्वक म्हणणे आहे. यास्तव त्यांच्या मिनिटाविषयीं व त्यास जोडलेल्या मसुद्या- विषयीं विचार करणे ही गोष्ट फार महत्वाची आहे. टकरसाहेब यांचा अभिप्राय गव्हरनर जनरल यांस मान्य झाला नाहीं * यामुळे व्या मिनिटाचे व त्यास जोडलेल्या मसुद्याचें कांही महत्व राहिले नाहीं. परंतु मुंबई इला- ख्याच्या एका मोठ्या नामांकित मंत्र्याचा तो लेख आहे, आणि त्यात आपल्या देशांतील एका प्रसिद्ध गृहस्थाने अनुमोदन दिले आहे. यास्तव त्यांत देशी राष्ट्रांच्या हिताचे कोणते उपाय आहेत आणि ते खरोखर देशी राज्यांत हितावह आहेत किंवा घातक व अनर्थोत्पादक आहेत, हें पाहिलें पाहिजे. आणि त्यांत देशी राजे आणि त्यांच्या दरबारांतील मुत्सद्दी लोक यांनी तर त्यांत काय लिहिले आहे, व त्याचें पर्य- वसान काय आहे हें आवश्य समजून घेतले पाहिजे. या मिनिटांतील कलम एक पासून नऊ पर्यंतचा मजकूर कांहीं महत्वाचा नसून,

  • The proposals put forth by the Honourable Mr. Tucker in his Minute of 3rd March go far beyond the measures which His Excellency in council considers it justifiable to adopt. (Blue book No. 1 Page 353)