पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २. मल्हारराव महाराज यांचें प्रजेच्या हिताकडे अलक्ष- त्याचें कारण-खंडेराब महाराज यांच्या कृपेंतील मंडळीवर जुलूम-भाऊ शिंदे याचें विडंबन त्यांच्या ऐश्वर्याचें व स्वभावाचें संक्षिप्त वर्णन-हबिबुल्ला मुनसी व रावजी मास्तर यांचें विडंबन. मल्हारराव महाराज यानी राजसूत्र हातांत घेतल्यावर अगर्दी अल्प काळांतच असे दिसून आले की, त्यांचे लक्ष्य प्रजेच्या हिताकडे नाहीं, आणि त्यांत राणी साहेब जमनाबाई गरोदर असल्यामुळे त्या प्रसूत होईपर्यंतच कायती आपल्या सत्तेची मर्यादा आहे असे त्यांस वाटले. अर्थात प्रजेच्या हिताविषयों ते सहजच विशेष उदासीन झाले, आणि अल्प अवकाशांत ज्यांनी आपणास अपकार केले, त्यांस शासने करावीं, आणि खंडेराव महाराज यांच्या मेहरबानीतील मंडळींची मालमत्ता हरण करून त्यांस उपद्रव द्यावा आणि आपल्या पूर्वाश्रमांत ज्यांनी आपले उपार्जन केले त्यांस मोठी मोठीं इनामें व बक्षिसे देऊन आपण त्यांचे अनृणी व्हावें, हेच काय ते आपले कर्तव्यकर्म आहे असे त्यांस वाटले. त्यांचे हे सर्व विचार शेवटास नेण्यास राज्यकारभारांत वहिवाटलेल्या मनुष्याची त्यांस गरज होती. त्यांच्या खानगी मंडळींत तसा कोणी नव्हता. जुन्या मंडळीपैकी अक्तिंग दिवाण निंबाजीराव ढवळे हे अगदी आपल्या तंत्राने वागतील असे महाराजांस वाटले नाही. कारण खंडेराव महाराज यांच्या पक्षाचे होते, सबब महाराज हरीबादादा गायकवाड यांच्या हातें राज्यकारभार घेऊं लागले. महाराज यानी ही निवड मोठ्या शहाणपणाने केली असे म्हटले पाहिजे. सौम्योपायें करून राजाचें मन वळविणे अशक्य झा तर मग आपण अगदी राजाचें मनच बनून जावे हा हरीबादादा यांचा नैसर्गिक स्वभाव होता; आणि त्यांच्या ऊर्जित दशेस तोच गुण काय तो विशेष कारणी- भूत होता. भाऊ शिंदे व हबीबुला मुनसी हे दोघे खंडेराव महाराज यांचे जिवलग मित्र होते. त्या खेरीज गणू व चिमा वाघ व मल्हारबा शेळके हे महाराजांचे परम विश्वासुक खिज- मतदार होते. या लोकांस मल्हारराव महाराजांची जितकी भीति होती तितकी दुसऱ्यांस नवती; कारण त्याणी खंडेराव महाराज यांस बरे वाटावे म्हणून मल्हारराव महाराज यांस मनस्वी त्रास दिला होता आणि ते मल्हारराव महाराज यांचे मनांत जाचत आहे असे त्यांस माहित होतें. हरीबा गायकवाड हेही खंडेराव महाराज यांच्या पूर्ण मेहेरबानींतील होते यामुळे मल्हारराव यांजपासून त्यांस अपाय होईल असें भय होतें, परंतु हरीबादादा यांचा दूरदर्शीपणा या वेळेस त्यांस फार उपयोगास मल्हारराव महाराज पादस असतां त्यांजबराबर हरीबा यांस जरी शक्य नवतें कोणताही सलगीचा संबंध तरी मल्हारराव महाराज यांस त्याणी असे वाटू दिले नाहीं कीं, आपण त्यांस प्रतिकूळ आहोत. हरीबा आणि भाऊ शिंदे यांजमध्ये जे पराकाष्ठेचें वैमनस्य होते तेंही हरीबा याच्या बचावास कारण झाले. भाऊ शिंदे याणी शेवटी शेवटी हरीबाविषयीं खंडेराव आला. ठेवणें हें