पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २१२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- पूर्णपणे अवगत होत्या. मल्हारराव महाराज यांचा जन्म झाल्यापासून त्यांचा अयुष्यक्रम कसा होता. याजकडे त्यानी पूर्ण लक्ष दिलें, त्यानीं बडोद्याची पूर्वीची राज्यकत्यांची रीत लक्षांत घेतली, मल्हारराव महाराज यांच्या अशिक्षित अवस्थेकडे व त्यांच्या नैसर्गिक वृत्तीकडे त्यानीं ध्यान दिलें, आणि त्यांच्याने करवेल तितके त्यांच्या दोषांचे लघुकरण केले आहे. विजापूरच्या ठाकूर लोकांच्या मोकदम्याविषयीं विचार करितांना त्याही सुरत जिल्ह्यातील कांहीं जमीदार लोकांच्या गांवाविषयीं मुंबई सरकारानी जो मार्ग स्वीकारला त्यापेक्षां गायकवाडांचे कृत्य कांहीं जुलमी नाहीं असे स्पष्ट म्हटले. ही माहिती मेहेरबान रेव्हनस्क्राफ्ट यानीं कमिशनास दिलेली असावी असें दिसतें. त्यांस या कमिशनांत मुंबई सरकारानी नेमिले होते. मल्हारराव महाराज यांजवर त्यांचा डोळा होता. त्यांचे दोष उणे करावे असे त्यांच्या मनांत मुळीच नव्हते. हे त्यांचे मनोगत धर्म रेव्हन स्काफ्ट यांस माहित नव्हते असे नाहीं, परंतु त्यानी त्यांच्या मनोगत धर्माची परवा बाळगली नाहीं आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्यांस बरे वाटेल असे करावे असें त्यानीं मनांत आणिलें नाहीं. त्या जमीदार लोकांच्या संबंधाने मुंबई सरकारानी केलेला अन्याय त्यांच्या मनांत जाचत होता तो त्यानी या प्रसंगी बेधडक बाहेर काढला. या मोठ्या मनाच्या आणि न्यायी अधिकाऱ्याच्या योग्यतेविषयी आम्हास आणखी एक मोठें प्रमाण सांपडलें आहे त्याविषयीं येथे उल्लेख केल्यावांचून आमचे मन आम्हा आवरता येत नाही. लार्ड लिटन यांच्या कारकीर्दीत असा एक ऊह निघाला होता की, म्हैसूरच्या राजास राज्याधिकार देण्यापूर्वी त्यांचा कांहीं मुलूख त्याबद्दल काही मोबदला देऊन मुंबई इलाख्यास जोडून द्यावा. असे करण्याचे कारण असे मानिले होते की, म्हैसूरच्या राजाच्या मुलखाचा कांहीं भाग धारवाड आणि कानडा यांच्यामध्ये आल्याने व्यापाराची गैर. सोय झाली आहे, यासाठी सरहद्दीमध्ये सुधारणूक करावी. त्या वेळेस मुंबईचे गवरनर सर रिचर्ड टेंपल होते. त्यांच्या विचारास ही गोष्ट आली यांत नवल कसचें ! परंतु मेहेरबान वनस्क्राफ्ट यानी त्याविषयी आपले मत उलटे दिले. ते म्हणाले की, माझ्याच्याने या मतास पुष्टी देववत नाहीं; कारण एक तर मला असे वाटतें कीं, हिंदुस्थान सरका- रच्या मनांत सरहद्दीची दुरुस्ती करण्याकरितां म्हैसूरच्या राजाचा इतका मोठा भाग घ्यावा असें नाहीं. दुसरे आपण हल्ली त्या राजाचे ट्रस्टी आहोत आणि माझा अभिप्राय असा आहे की, सुधारलेल्या देशांत ट्रस्टीच्या संबंधाने जे न्यायाचे नियम आहेत त्याप्रमाणे वागण्यास आपणही बांधले गेले आहोत, आणि जोपर्यंत म्हैसूरचे तरुण महाराज आपला राज्यकारभार चालविण्यास योग्य होतील तोपर्यंत सरहद्दीची सुधारणा करण्याकरितां त्यांच्या मुलखाचा कांहीं भाग ब्रिटिश राज्यास जोडणे, अथवा सबसीडियरी फौज वाढविणें अथवा दुसरे कांहीं कृत्य करणे याविषयीं राणी सरकारानी स्पष्ट मनाई केलेली आहे. या कारणानें व आपण ट्रस्टी आहोत म्हणून आपल्या हिताकरितां हिंदुस्थान सरकारच्या सूचनेप्रमाणे दोन्ही पक्षांचे पंच नेमून त्यांच्या द्वाराने सरहद्दीसंबंधी कोणतीही गोष्ट करणें मला अभिमत नाही; कारण की, ही गोष्ट पक्की ध्यानांत ठेविली पाहिजे कीं,