पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीडचे कमिशन. शिंद्या दिवाण झाल्यावर तर त्यांत विशेष भर पडली. (२११ ) हल्लींचे महाराज गादीवर बसल्यानंतर प्रधान मंडळींत फेरफार झाले, परंतु त्यापासून लोकांस कांहीं सुख झालें नाहीं. अन्यायाने द्रव्य मिळविण्याची उत्कट इच्छा जशी पूर्वीच्या मंत्री मंडळींची होती तशीच नव्या प्रधान मंडळींची आहे आणि त्यांत आणखी महाराजांस जुलमी उपाय योजून पहिली जमा वाढविण्याची इच्छा झाली आहे. अशा प्रकारची स्थिति आहे म्हणून ब्रिटिश सरकारानी मध्यस्थी केली तरच राज्यव्य- वस्थेमध्ये सुधारणूक होईल. कमिशनाचे रपोटांतील २०वे कलमांत त्यानी व्हाइसराय साहेब यांच्या सूचनेप्रमाणे दरबाराकडून कमिशनास योग्य रीतीची मदत मिळाल्याबद्दल आपला संतोष दाखविला आहे, व दरबारचे एजंट रावसाहेब वासुदेव जगन्नाथ कीर्तीकर हायकोर्टाचे वकील आणि दुसरे दरबारचे कामदार जे कमिशनापुढे दरबार तर्फे काम चालवीत होते त्यानी मनःपूर्वक आपणास साह्य केले म्हणून कमिशनानीं त्यांची स्तुति केली आहे.. मल्हारराव कमिशनाचे रपोटांत मल्हारराव महाराज यानी भाऊ शिंदे यांस तात्काळ दिवाणगि- रीवरून काढून बंदिखान्यांत टाकिलें म्हणून जे लिहिलें आहे ती चूक आहे. यानीं त्याजवर जुलूम केला होता येवढ्यावरून कमिशनानीं तसा तर्क केला असावा किंवा त्यांस कोणी तशी खोटी माहिती दिली असावी असें दिसतें. भाऊ शिंदे यांस दिवाणगिरीच्या पदावरून खंडेराव महाराज यानींच रेसिडेंट साहेब यांचे सूचनेवरून दूर केलें होतें आणि मल्हारराव यांस राज्याधिकार प्राप्त झाल्यावर पांच सहा महिन्यानंतर त्यानी त्यास तुरुंगांत टाकिलें. कमिशनच्या रपोटाचा दुसरा भाग कंटिजंटच्या तीन हजार स्वाराबद्दल आहे. हल्लींचे बडोद्याचे राजे सयाजीराव महाराज यांस अधिकार देतांना या फौजेच्या संबंधानें इंग्रज सरकार गायकवाड सरकाराबरोबर कांहीं नवा तहनामा करण्याच्या विचारांत आहे अशी वर्तमानपत्रांतून चर्चा झाल्यावरून त्या फौजे- च्या संबंधाची कच्ची हकीगत, या कमिशनापुढे काम चाललें त्याचे स्वरूप, त्याबद्दल कमिशनचा अभिप्राय आणि त्याविषयीं सारासार विचार करून एक नवे निराळेच बूक छापून थोड्या महिन्यावर प्रसिद्ध करण्यांत आले आहे. त्यांत या फौजेची साद्यंत हकीगत आहे, ती लोकांनी कृपा करून अवलोकनांत आणावी म्हणजे या फौजेसंबंधी सर्व हकीगत विदित होऊन त्याबद्दल मि० कर्नल फेर पानी मल्हारराव यांजवर या फौजेंत अव्यवस्था केल्याबद्दल अगदी खोटा आरोप आणिला होता असे कळून येईल, व गुण दोष काय आहेत याविषयी लोकांस विचार करण्यास साधन होईल. आतां या भागाचा उपसंहार करितांना या कमिशनांतील अधिकारी लोकांच्या योग्यते- विषयीं दोन शब्द बोलल्यावांचून हे प्रकरण संपवितां येत नाहीं. या कमिशनांतील अधिकारी खरोखर मोठ्या मनाचें, शहाणे, क्षमासंपन्न, दूरदर्शी, नि:पक्षपाती, निर्भिड, न्यायी आणि अनुभवी होते. देशी राजांच्या रीतीभात