पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २१० ) यांस, त्यांचे मित्र मंडळीस व सोबत्यांस कडक रीतीने व अन्यायाने छळले होते. त्यांजकडे जेव्हा अधिकार आला तेव्हां वैरप्रतिक्रिया करणे हे दोषास्पद होणार नाहीं, असें त्यांस वाटल्यावरून त्यानी भाऊ शिंदे यांस तात्काल दिवाणगिरीवरून काढून तुरुंगांत टाकिलें. तेथें तो अठरा महिन्यानंतर मेला. त्याच्या मरणाविषयी मोठा संशय आहे. खंडेराव महाराज यांचे नाशाविषयी जी मसलत करण्यांत आली होती त्याबद्दलची चौकशी भाऊ शिंदे याणी केली होती; कारण तो त्या वेळेस फीनदारीचा मुख्य अधिकारी होता. या चौकशीचा परिणाम असा झाला की, मल्हारराव यांस सात वर्षेपर्यंत कैद भोगावी लागली, आणि त्यांच्या मंडळीस कडक शासने झाली. मल्हारराव यांजपासोन ज्यांस पुष्कळ त्रास सोसावा ला- गला त्यांणी मल्हारराव यांचा व त्यांच्या आप्तांचा आणि त्यांच्या अनुयायी लोकांचा छळ करण्यांत व त्यांस उपद्रव देण्यांत कांहीं बाकी ठेवली नवती हें खचित आहे, तेव्हां मल्हारराव त्या सर्वांस आपले शत्रु मानील यांत नवल नाहीं. ह्या गोष्टी मनांत आणून व मल्हारराव यांच्या नैसर्गिक स्वभावाकडे लक्ष देऊन त्या त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल किती जरी माफी दिली तरी त्यांच्या इतर जुलमी वर्तनावरून अशी आशा बाळगितां येत नाहीं कीं, राज्यांत ज्या सुधारणा करणे अवश्य आहेत त्या ते स्वतः होऊन करतील आणि इंग्रज सरकारच्या विश्वासास व आश्रयास आणि आपल्या प्रजेच्या भक्तीस ते योग्य होतील. मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. यदाकदाचित त्यांच्या मनांत तशी गोष्ट आली तरी जेयपर्यंत हल्लींचे मंत्री मंडळ कामावर राहील तोपर्यंत त्यापैकीं कांहीं एक होणे नाहीं; कारण त्यांच्यापैकीं बहुतकरून सर्व अशा महत्वाच्या हुद्यास कोणत्याही रीतीने पात्र नाहींत असें आमचें मत आहे. मल्हारराव स्वतः होऊन राज्यांत सुधारणा करतील अशी आशा बाळगण्यास आधार नवता व त्यांच्या दरबारची सर्व मंत्री मंडळी कामास नालायक होती असे कमिशनाच्या विचारास आले होतें सबब त्याणी राज्यांत सुधारणा करण्यासाठी नामदार गवरनर जनरल यांस अशी सला दिली की, बडोद्याच्या दिवाणगिरीसाठी एका अनुभवी मनुष्याची निवड करावी, आणि योग्य रीतीने राज्याचा कारभार त्यास चालवितां येईल येवढ्या पुरतें त्यास रसिडेंट यांचे पाठबळ असावें, आणि गवरनर जनरलचा मुद्दाम हुकूम घेतल्यावांचून त्यास दूर करितां येऊं नये आणि रसिडेंट यांस असा अधिकार द्यावा कीं, जरूर पडेल तेव्हां महाराज आणि दिवाण यांचे मध्ये त्याणी मध्यस्थी करावी. याप्रमाणे राज्यव्यवस्था निटोप्यास आणण्याविषयों कमिशनाने अभिप्राय दिल्यावर त्यांणी पुढें असें लिहिलें आहे कीं, ब्रिटिश सरकारानीं प्रतिक्षणी मध्यस्थी करण्याचा प्रसंग टाळण्यासाठी आम्ही ज्या उपयांची योजना करण्याविषयीं अभिप्राय दिला आहे त्यांत देखील ज्या अडचणी आहेत त्यांविषयीं आम्हास अज्ञान नाहीं. परंतु बडोद्याची राज्यस्थिति अशा प्रकारची झाली आहे कीं, ब्रिटिश सरकारानी किती मध्यस्थी करावी याविषयी आम्हीं जी सूचना केली आहे त्याहून कमी मध्यस्थी केल्याने कांहीं अर्थ निष्पन्न होणार नाहीं. खंडेराव महाराजांच्या कारकीर्दीतील शेवटच्या सहा किंवा सात वर्षांत राज्यकारभार फारच वाईट रीतीने चालला होता आणि भाऊ