पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. (२०९) पर्यंत धरून राहिले, व शेवटी त्यांच्या शेवट परिणामाचे वाटेकरी झाले त्यांत त्यांस ने कांहीं भूषणास्पद होतें तें त्यांनी केले आहे असे वाटते. आज सामान्य मनुत्र्यास देखील कळते कीं, नेटिव राजांची राज्ये कोणत्या उपायांनी सुरक्षित राहतील आणि कोणत्या दुराचरणांनी ती लयास जातील आणि खरोखर हें मल्हारराव महाराजांस व नानासाहेब खानवेलकर व दामोदरपंत नेन्या यांस देखील कळत नव्हतें असें म्हणवत नाहीं, परंतु त्यांच्या मनोवृत्ति त्यांस अनावर झाल्यामुळे ते त्यांच्या स्वाधीन झाले होते. नेर्णेकरून मल्हारराव महाराज यांचे राज्य बुडेल तशी मसळत त्यांस दरबारी लोकांनीं देऊन आपणास भिकेस लावून घेतले असे म्हणणे परम असमंजस होय. नेटिव राज्यांतील प्रधान मंडळी आणि लोक यांजकडे अशी सत्ता असती की, त्यानी, जुलमी राजाला पदच्युत करून त्याच्या जागी योग्य राजा नेमावा तर टर्कीच्या प्रधान मंडळीने जसा त्यांस अनावर झालेला सुलतान पदच्युत करून दुसरा बसविला तर्फे बडोद्याच्या कारभाऱ्यांनी जेव्हां मल्हारराव त्यांस अनावर झाला तेव्हां लागलीच कांहीं. एक गडबड न होऊं देतां मल्हारराव यांस त्यांच्या दुष्ट दिवाणासह अधिकारावरून काढून दुसरा राजा नेमिला असता, व राज्यव्यवस्था उत्तम निटोप्यास आणिली असती; पण असा अधिकार त्यांजकडे होता कोठें. त्यानी असा कांहीं उपक्रम केला असता तर त्यांस फितुरी ठरवून इंग्रज सरकारानी मल्हारराव महाराज यांजकडून त्यांस तोफेचे तोंडीं देवविलें असतें. एकंदरीने सांगण्याचे तात्पर्य इतकेंच आहे की, विचारपूर्वक पाहिले असतां बडोद्याच्या कामदार मंडळीस शेवटपर्यंत मल्हारराव महाराज यांचा पक्ष धरून राहणें हाच काय तो उपाय होता आणि तो त्यांनी शेवटास नेला यामुळे आज त्यांजवर विपत्ति पडली आहे तरी ती त्यांस भूषणीय आहे... मल्हारराव महाराजांच्या चाहड्या. त्यानी रेसिडेंट यांस सांगितल्या असत्या तर आज त्यांस मोठ्या पगाराच्या जागा देऊन. अथवा नेमणुका करून देऊन त्यांच्या घरी सुखाने राहूं दिलें असतें, व त्यांचा मच्छर केला नसता व त्यांस देशोधडी लाविले नसते, परंतु स्वामिद्रोहाचा कधींही पुसून न. जाणारा डाग त्यांच्या कपाळीं लागला असता. कमिशनाने मल्हारराव महाराज यांजविषयों आणि दरबारांतील प्रधान मंडळीविषयी जें कांहीं लिहिले तेवढ्यानेंच पूर्तता झाली असें त्यांस वाटले नाहीं, म्हणून त्यानें आपल्या रिपोर्टाच्या बारावे कलमांत विशेष टीका केली आहे. त्याचे म्हणणे असे आहे कीं, महाराजांस राज्य प्राप्त झाले तेव्हां त्याच्या पूर्वीच्या वर्तणुकीवरून तो चांगला व शहाणा. राजा निवडेल अशी आशा करण्यास कांहीं आधार नवता... आणखीं ते असें म्हणतात कीं, त्यांस राज्याधिकार मिळाल्यावर खंडेराव महाराज यांच्या आप्तवर्गांस आणि त्यांच्या आश्रित लोकांस त्याणीं अति निर्दयपणाने वागविल्यामुळे त्यांच्या अब्रूस मोठी काळिमा लागली आहे. तथापि आपलें करणें न्यायानुसारी होतें असें त्यांस वाटण्यास निमित्त होते. माजी राजाने, त्याच्या नौकरांनी व प्रीतींतील लोकांनी महाराज.