पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २०८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्यांस महाराजांच्या चाहाड्या सांगून स्वामिद्रोहाचे पातकी व्हावे. याखेरीज चौथा मार्ग कोणताही नव्हता. आतां, शेवटचा मार्ग देखील फार संदिग्ध होता; कारण रेसिडेंट साहेब यांभोवती मिळालेल्या मंडळीनी मल्हारराव यांच्या कामदारांस रेसिडेंट साहेब यांच्या कृपेचे वाटेकरी होऊ दिले नसते. धार्मिक लोकांच्या विचाराप्रमाणे पाहिलें असतां कामगार लोकांनीं दुसरा मार्ग पसंत क- रून मल्हारराव यांजपासून उग्र शासने सहन केली असतीं व आपआपली कामें सोडली असती तर लोकांत त्यांची फार प्रशंसा झाली असती हें खरे आहे. आतां तें त्यांच्याने झाले नाही येवढ्याबद्दल ते लोकोपवादास पात्र आहेत, परंतु असें करण्यांत देखील त्यांजकडे एक प्रकारचा दोष आला असताच; कारण तसे करणे म्हणजे मल्हारराव महाराज एक दुष्ट राजा आहे अशी लोकांपुढे साक्ष देणें असें होतें. इंग्रज सरकारास येवढीच सबब मल्हारराव यांस पदच्युत करण्यास बस झाली असती; कारण कर्नल फेर साहेब यानी मल्हारराव यांची प्रजा त्यांजवर असंतुष्ट झाली होती अतें ब्रिटिश सरकारच्या मनांत भरवून दिलें होतेंच आणि तशा प्रसंगी मल्हारराव महाराज यांस त्यांच्या कामदारानी सोडलें असतें म्हणजे फेर साहेब यांचे म्हणण्यास विशेष बळकटी आली असती, आणि मग मल्हारराव महाराज यांचे राज्य एक दिवस देखील टिकलें नसतें. याबद्दलचे प्रमाण पाहण्यास लांब जाणे नलगे. दादाभाई नवरोजी वगैरे नवीन प्रधान मंडळी यानी राजीनामा दिल्याबरोबर काय विचार निघाले ते पहा.. ४३१ १२४८ सर लुईस पेली यानी बडोद्याच्या रेसिडेंसीचा चार्ज घेतल्यावर त्यानी नंबर तारीख १८ डिसेंबर सन १८७४ रोजी इंडिया सरकारचे फारिन सेक्रेटरी यांस पत्र लिहिले आहे. त्यांत ते लिहितात कीं, मी येथें आल्या वेळेपासून या वेळपर्यंत महाराजां- विषयीं गाहाणें सांगण्यासारखे कांहीं. एक नाहीं. महाराज सुधारलेली राजव्यवस्था पाहण्यास फार उत्सुक आहेत. त्यानंतर दादाभाई वगैरे प्रधान मंडळीनी राजीनामा दिल्यावर सर लुईस पेली यानी महाराजांविषयी काय लिहिले त्याचा उतारा स्टेट सेक्रेटरी यानी इंडिया सरकारास तारीख ३ जून सन १८७५ नंबर ६ ९ चे पत्र लिहिले आहे त्याच्या सोळाव्या कलमांत घेतला आहे. तो असा कीं, गायकवाडास अटकावांत ठेविण्यापूर्वी कांहीं दिवस राज्यकारभारांत सुधारणा करण्यासाठी आलेले कारभारी यानी आपले हुद्दे सोडले, तेव्हां सर लुईस पेली. यानी तुम्हास गंभीरपणाने शिफारस केली कीं, राष्ट्राचे बचावासाठी मल्हारराव यांनपासून राज्यपद हिसकून घ्यावें.. जुने कामदार मंडळीनी आपले हुद्दे सोडले असते तर त्याच पंथावर गोष्ट आली. असती यांत तिळमात्र संशय नाहीं. त्यापेक्षां त्यानी आपण दरबारचे जुने चाकर हें मनांत आणून मल्हारराव यांस शेवट