पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( २०७ ) करतील अशी ज्यांची समजूत आहे ते पराकष्ठेचे अविचारी, व दुर्बळ मनाचे लोक आहेत; व त्यांचा राज्यकारभार जितका न्यायाचा असावा तितका नाहीं हें त्यांच्या या आचरणाव- रूनच सिद्ध होतें. . नाहीं तर त्यांस इतकें भय कां ? मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभा- राशी त्यांचा संबंध होता इतक्याच कारणाने त्यांजवर जो प्रसंग गुजरला आहे तो त्यांस असह्य झाला असून त्यांची जगापुढे जी फटफजिती करण्यांत आली आहे ती त्यांस पराकाष्ठेची वेदना देत आहे असें असतां आपल्यावर आणखी संकट आणण्याकरितां ते कांहीं कारस्थान करतील असे दुष्ट विचार शहाण्या लोकांच्या मनांत येतात तरी कसे • हें कांहीं कळत नाहीं. नेवि दरबारच्या कामदारांवर ते बदसलागार व लांच खाऊ असा आरोप ठेविण्याची एक ठरीव पद्धतच आहे याविषयीं आम्ही येथपर्यंत उदाहरणासह निरूपण केले आहे. आतां बडोद्याच्या कामदार मंडळीनीं मल्हारराव महाराज यांची चाकरी पत्करण्यांत कांहीं अविचार केला होता की काय याजबद्दल थोडासा विचार करून हे प्रकरण संपवूं. मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील कामदार मंडळीपैकीं रावसाहेब बापूभाई दयाशंकर व डेप्युटी कमिशनर नारायणभाई ललुभाई हे दोन गृहस्थ खेरीज करून बाकी सर्व बडोद्यांतील रहिवासी असून बडोद्याच्या राज्याचे एक एक दोन दोन पिढींचे जुने नौकर होते. बडोद्याच्या दरबारचा आश्रय करून राहिल्यावांचून त्यांच्या कुटुंबाच्या पोषणास दुसरी कांहीं एक उपजीविका नव्हती यामुळे मल्हारराव महाराज यांच्या दरबारची चाकरी करून राहणे हाच काय तो त्यांस उपाय होता. मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांतील अव्यवस्थेपासून कामदार लोकांवर येणाऱ्या बदनामीतून मुक्त होण्यास काय तो येवढाच उपाय होता की, त्यानी राजीनामे देऊन आपल्या घरी बसावे; कारण मल्हारराव यांस त्यांनी जे जे उपदेश केले ते ते सर्व निष्फळ झाले होते. नानासाहेब यानी पाहिजेल तसें वाईट कर्म केलें तरी तो महाराजांस पाहिजे होता, आणि तो जोपर्यंत दिवाणगिरीवर राहील तोपर्यंत राज्यांतील अव्यवस्था कमी होण्याची आशा नव्हती. कामदार मंडळीनी राजीनामे दिले असतां मल्हारराव महाराज यानी त्यांस सुखी राहूं दिले असतें कीं काय याविषयीं विचार करितां ती गोष्ट फार संशयित वाटते. काम- दार यांचे मनांत कांहीं दुष्टभाव असो अगर नसो. मल्हारराव महाराज पानी अशी कल्पना केली असती कीं, हे कामदार लोक विरुद्ध पक्षाच्या कटांत शिरून मला पदच्युत करण्याच्या मसलती करण्याकरितां राजीनामे देतात. त्यानी पुष्कळ वेळा असे देखील बोलून दाखविलें होतें कीं, माझ्या विरुद्ध कोणी कांहीं आचरण केलें तर त्याबद्दल त्यास फार दुःख सोसावें लागेल. तेव्हां कामदार मंडळीस काय ते तीन मार्ग होते. एक तर शेवटपर्यंत मल्हारराव यांचे चाकरीत राहून त्यांच्या बरोबर राज्यकारभारांतील अव्यवस्थेच्या दोषांचे विभागी व्हावे किंवा त्यांचा राग डोक्यावर ओढून घेऊन आपलें व आपल्या कुटुंबाचे अनहित करून घ्यावे किंवा रेसिडेंट साहेब यांचा आश्रय करून