पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. हल्लींच्या राज्यकारभार चालविणारानी जुन्या कामदार लोकांचीं जन्म चरित्रे तयार करून ठेविली आहेत. त्यांत त्यांस जितका हलकेपणा आणवेल तितका आणिला आहे व त्यांजविषयीं जितके वाईट लिहितां आलें तितकें लिहिलें आहे, आणि त्यांच्या शेवटी . अशा प्रकारचे जरी ते लोक आहेत तरी त्यांजवर आम्ही दया करून त्यांस दरबारांतून नेमणुका देण्याचा ठराव करीत आहोत, असा सदयपणा मिरवून त्यांस वर डोके करण्यास मार्ग राहू दिला नाहीं. बरें खंडेराव महाराज यानी ज्यांपासून दंड घेतला ते लोक इंग्रज लोकांस खत नाहीत असेही नाहीं. गणपतराव महाजन यांजवर जवाहीरखान्याच्या कामांत लबाडी करून पैसा मिळविल्याचें शाबीत होऊन त्यांपासून खंडेराव महाराज यानी ऐशी हजार रुपये दंड घेतला असतां सर लुईस पेली यानी बडोद्याचे राज्यसुत्र हातांत घेतल्याबरोबर जवाहीरखान्याच्या * किल्लया अगोदर त्यांच्या स्वाधीन करून त्यांस खानगीचे दिवाण केले. गजानन विठ्ठल यांचे ते व्याही आणि गजानन विठ्ठल मल्हारराव महाराज यांजवर विषप्र- योगाचा आरोप शाबीत करण्यांत अग्रेसर असल्यामुळे महाजन यांच्या दुष्ठ कृत्यांचे परिमा- र्जन होऊन सर लुईस पेलीच्या परमकृपेस पात्र झाले. टिपेत जे वाक्य लिहिलें आहे त्याजवरून जवाहीरखाना स्वतंत्रपणे गणपतराव महाजन यांच्या ताब्यांत किती- एक दिवसपर्यंत होता व त्या गृहस्थाने सर लुईस पेलीच्या विश्वासाला पात्र असेच वर्तन केलें असेल यांतही संशय नाहीं, परंतु वशिला असला म्हणजे कशा अद्भुत गोष्टी घडतात त्या लक्षांत घेण्यासारखे आहे. ज्या मनुष्याने जवाहीर खान्याच्या कामांत लबाडी करून द्रव्य मिळविले आणि त्याबद्दल त्यास दंडाचे शासन होऊन त्या कामावरून त्यास खंडेराव महाराज पान काढलें असतां सर लुईस पेली यानी त्यास तोच अधिकार देऊन ज्याच्या हिशेबाला कांहीं ताळमेळ नाही अशा पराकाष्ठेच्या किंमतदार वस्तु महाजन यांच्या स्वाधीन केल्या. यावरून गजानन विठ्ठल यांच्या सर लुईस पेली अगदीं मुठींत होते असें दिसतें. अस्तु, कसेही असो, जुन्या कामदार लोकांनी अपराध केले आहेत की नाहींत हैं सर्वसाक्षी परमात्म्यास माहित आहे. त्यांस छळणारांचा न्याय येथें नाहीं झाला तरी ईश्वरापुढे होईलच. अविचारी लोकांचे मन त्यांजविषयीं कितीही अपवित्र असो बडोद्याच्या राज्याचे कायदे त्यांस श्रुतीप्रमाणे मान्य आहेत. राज्याच्या रीतिभाती त्यांस मनुप्रणीत शास्त्राप्रमाणे मान्य आहेत. बडोद्याचे राष्ट्र हें आपलें गृह, त्याचा राजा हा आपला जनक, त्यांची राणी तो आपली जननी आणि राष्ट्रांतील लोक हे आपले बंधुवर्ग असे ते मानतात. मल्हारराव महाराज राजा असतांना त्यांच्या ठिकाणीं त्यांची जी भक्ति, श्रद्धा आणि अनुराग होता तसाच त्यांचा हल्लींच्या महाराजांविषयीं आहे. त्यांस बडोद्यास येऊ दिल्याने ते कांहीं कारस्थान

  • On this date the Gaikwar's State the jewarkhana or jewel rooms were handed over by order to the charge of Ganpatrao Mahajan, former state jewel keeper, who was directed to collect the jewels into one room, for which purpose he was allowed to fix his own seals to the rooms during the time necessary for this operation (Blue book No. VI. Page 112 S. V.)